इन्द्रियाणि जयन्त्याशु निराहारा मनीषिणः ।
वर्जयित्वा तु रसनं तन्निरन्नस्य वर्धते ॥२०॥
आहार वर्जूनि साधक । इतर इंद्रियें जिंतिलीं देख ।
तंव तंव रसना वाढे अधिक । ते अजिंक न जिंकवे ॥८१॥
इंद्रियांसी आहाराचें बळ । तीं निरहारें झालीं विकळ ।
तंव तंव रसना वाढे प्रबळ । रसनेचें बळ निरन्नें ॥८२॥