मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय आठवा|

एकनाथी भागवत - श्लोक ३० वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


सन्तं समीपे रमणं रतिप्रदं वित्तप्रदं नित्यमिमं विहाय ।

अकामदं दुःखभयादिशोक मोहप्रदं तुच्छमहं भजेऽज्ञा ॥३०॥

संतपुरुषाची प्राप्ती । जवळी असतां नेणें आसक्ती ।

ज्यासी केलिया रती । कामनिवृत्ती तत्काळ ॥१९॥

काम निवर्तवूनि देख । अनिवार पुरवी नित्य सुख ।

चित्तदाता तोचि एक । अलोलिक पैं देणें ॥२२०॥

सकळ ऐश्वर्य निजपदेंसीं । संतोषोनि दे रतीसी ।

रमवूं जाणे नरनारींसीं । रमणु सर्वांसी तो एकु ॥२१॥

सांडोनि ऐसिया कांतासी । माझी मूढता पहा कैसी ।

नित्य अकामदा पुरुषासी । कामप्राप्तीसी भजिन्नलें ॥२२॥

आपुला पूर्ण न करवे काम । ते मज केवीं करिती निष्काम ।

त्यांचेनि संगें मोहभ्रम । दुःख परम पावलें ॥२३॥

त्यांचेनि सुख नेदवेच मातें । परी झाले दुःखाचेचि दाते ।

भयशोकआधिव्याधींतें । त्यांचेनि सांगातें पावलें ॥२४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP