या व्रताची कथा योगवासिष्ठ या ग्रथांत ’लिलोपाख्यान’ मध्ये सांगितली आहे. हे व्रत कामदायी आहे. या व्रतानिमित्त सरस्वतीची पूजा व व्रत असे करावे.
हे व्रत मनोभावे करावे. या व्रताची सुरुवात ज्येष्ठ शु ॥ तृतीयेस करावे व सष्ठीस पूर्ण करावे. अशा रीतीने तीन महिने म्हणजे आषाढ, श्रावण, भाद्रपद करावे. नंतर चौथ्या अश्विन महिन्यात पूर्ण करुन अश्विन शु ॥६ याची सांगता करावी व त्या दिवशी उद्यापन करावे.
पूजापद्धत चौरंगावर धान्याचे मंडळ तयार करावे. त्यावर तांब्याचा कळस ठेवावा. त्यामध्ये सरस्वतीरुप स्मरुन करुन जल भरावे तसे केल्यास ते सरस्वतीरुप होते. कळसाच्या मुखावर पाच पिंपळ पाने ठेवावीत. त्यावर तांब्याची लहान ताह्माण ठेवावी, ती मध्ये धान्य ठेवून सरस्वतीची मूर्ती त्यावर ठेवावी. मूर्ती न मिळाल्यास फोटो ठेवावा. चौरंगाच्या समोर एकाची सरस्वती रांगोळीने काढावी. चौरंगाच्या बाजूस केळीची खूंट लावावे. अकरा केळीसमोर ठेवावी. पुजेसाठी शुभ्र वस्त्र, शुभ्र सुगंधी फुले, पांढरा गंध वापरावा. पुजेनंतर १०८ वेळा जप करावा.
पूजा सुरुवात करताना शूर्चिभूत मंगल स्नान करावे. मुक्ताकेशा राहून, नील आकाशी रंगाचे वस्त्र परिधान करावे. पतीदेवाला नमस्कार करुन पूजा सुरु करावी. तीन दिवस उपवास धरावा. फक्त एकावेळेस पंचधान्याचे (गहू, ज्वारी, मुग, हरभरा, उडीद) थालीपीठ व केळाचे शिखरण खावे. चौथ्या दिवशी पारणे फेडावे. अकरा सुवासिनींना बोलावून त्यांना ’सरस्वती व्रत’ कथा व सौभाग्य लेणे देऊन ओटी भरावी व हळदी कुंकू करुन केळांचा प्रसाद द्यावा. पहिल्या तीन महिन्यात फक्त पाच कुमारीकांना प्रसाद द्यावा व चौथ्या महिन्यास हळदी कुंकू करावा.