लीलेने केला निश्चित व्रत करण्याचा निर्धार
देऊन धन्यवाद विप्राते समाधान पावली सत्वर ।
ज्ञाप्ति देवीला करुन नमस्कार रत झाली संसारात ।
प्रीय पतीसह करीत नाना विलास रमली भोगात ।
असे करता काळ मात्र उजाडला ज्येष्ठ मास ।
ज्येष्थ शुद्ध तृतीयेस राणी लीला उठली सुप्रभाते ।
मंगल करुन स्नान केला नमस्कार प्रेमे पतीदेवाते ।
मुक्तकेशा नेसली आकाशी निळी साडी पवित्र वस्त्राते ।
मांडली पूजा विप्राने सांगितल्याप्रमाणे प्रभाते ।
आरास केली मनोभावे विविध सुगंधी शुभ्र फुलाने ।
पूजा बांधली प्रसन्न मनाने बैसली आनंदीत चित्ताने ।
उल्हासित वातावरणात ओवाळीले मंगल आरतीने ।
ऐ वाग्वादिनी वद वद स्वाहा ॥
ओम ऐ र्ही क्ली स्वरस्वत्यै नमः ॥
केला असा जप एकशे आठ वेळा एकाग्रचित्ताने ।
आषाढ श्रावण भाद्रपद या तीन मासी केले व्रत ।
अशा तर्हेने व्रत करण्याचा क्रम चालू ठेवला तिने ।
आश्विन मासी द्वितीयेच्या दिवशी बांधली पूजा ॥
नित्य नियमाने केली तीन दिनी ती पूजा ।
षष्ठीच्या दिवशी पारायणापूर्वी केले पूर्ण व्रत ।
बोलाविल्या पाच कुमारिका पूजिल्या प्रेमाने ।
जेवू घातल्या थालीपीठाच्या पवित्र प्रसादाने ।
सायंकाळी बोलाविल्या हळदीकुंकवासाठी सुहासिनी ।
सौभाग्य लेणे दिले प्रेमभरे सरस्वतीव्रतकथासह ।
सर्वांनीं भावे करावे या व्रताते केली विनवणी ।
मन प्रसन्न झाले पाहून पूर्ण झाले ते व्रताते ।
झोपण्यापूर्वी म्हटले सरस्वती मंत्राते प्रेमभावे ॥
बैसली सरस्वतीच्या पुढे डोळे मिटून ध्यानमग्न ॥
हात जोडीता सरस्वतीच्या पुढे मोठ्या प्रेमभावे ।
आला सुगंध दरवळत अनेक फुलांचा तो प्रसन्नभावे ।
त्या मागूनी आला आवाज प्रसन्न प्रकाशासवे ।
भयभीत होऊन उघडले डोळे तो ते दिपले प्रभावे ।
समोर साक्षात उभी देवी सरस्वती प्रसन्न वदने ।
होऊन तिच्यावर संतुष्ट उभी राहिली अविर्भूत ।
लीलेने प्रसन्नचित्ताने केला प्रेमभावे नमस्कार ।
उभी राहिली अत्यंत नम्र भावे श्रद्धा ठेवून मनात ।
तेव्हा सरस्वती म्हणाली प्रसन्न मनाने वत्से लीला ।
तुझी निस्सिम पतिभक्ती आणि व्रताचरण अखंड ।
पाहून झाले मी संतुष्ट आणि प्रसन्न तुझ्यावर ।
माग वर देईन मी तुला आनंदाने सत्वर ।
घे मागून बेलाशक माझ्याकडून तुझ्या इच्छेनुसार ।
त्यावर लीला म्हणाली नम्रपणे देवता सरस्वतीस ।
देवी ! जन्म मृत्यु या विकारापासून होणारा दाह
नाहीसा करणारी तू चंद्रिका आहेस प्रत्यक्ष सूर्यच ।
हे अंबे तुझा जयजयकार असो । हे जगताची माता ।
या अबला कन्येची दिनस्थितीतून कर मुक्तता ।
तुझ्या इच्छेनुसार हे देवी तू मला उपकृत कर ।
मी करते विनंती तुझ्या चरणी दे मला दोन वर ।
एक वर हा माझ्यापूर्वी जर आले मरण पतिदेवा ।
तरी त्याचा जीव हा रहावा माझ्या अंतंपुरात ।
दुसरा वर दे मला ऐसा जेव्हा करीन मी इच्छाते ।
मजला दर्शन देण्याची कृपा करावी भावे ।
लीलेचे ऐसे ऐकून भाषण सरस्वती कशी म्हणते ।
तुझी इच्छा पूर्ण होईल तुझ्या म्हणण्याप्रमाणे ।
असा देऊन आशीर्वाद पावली अंतर्धान ।
समुद्र लाटेप्रमाणे गेली विरुन सत्वर ।
जैसी होते हरिणी तृप्त पावता जलसरोवर ।
होता ज्ञाप्तिदेवी प्रसन्न होऊन दिला इष्टवर ।
झाला तो अति परमआनंद लीला राणीलाते ।
लीला राणी रमली प्रसन्नपणे आपल्या संसारात ।
॥ इति तृतीय अध्याय लिलापाख्याने समाप्त ॥