मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वामन पंडित| रुक्मिणी विलास वामन पंडित अनुभूतिलेश भागवत रामायण ब्रम्हस्तुति द्वारकाविजय श्रीहरिगीता कर्मतत्व वामनपंडित कृत स्फुट काव्यें नाम सुधा साम्राज्यवामनटीका वेणुसुधा राजयोग मुकुंदविलास ध्यानमाळा प्रियसुधा तत्वमाळा शुकाष्टक स्फूटश्लोक गीतार्णव चरमगुरुमंजरी. वामनचरित्र विश्वास वध दंपत्य चरित्र भरत भाव रुक्मिणी पत्रिका सीता स्वयंवर रामजन्म अहिल्योद्धार लोपामुद्रा संवाद यज्ञपत्न्याख्यान कंसवध रुक्मिणी विलास भामाविलास चित्सुधा गजेंद्र मोक्ष वामन पंडित - रुक्मिणी विलास कवी वामनपंडितांचे काव्य वाचन म्हणजे स्वर्गीय सुख. Tags : rukhminivaman panditरुक्मिणीवामन पंडित रुक्मिणी विलास Translation - भाषांतर करुनि नमन देवा रुक्मिणी नायकातें निजपद हरि दे जो कीर्त्तिच्या गायकातें स्मरत पद तयाचें त्याचिया लोकलीला कथिन हरिति गातां वर्णितां ज्या कलीला ॥१॥ चिच्छक्तिला सतत चिन्मय जेविं योग श्री रुक्मिणीस न कधीं हरिसी वियोग मी यास्तव प्रियतमा परमा रमा ते मानी अहंकृति शिवे असि मारमाते ॥२॥ कुनारीसि कीं प्रीति अज्ञा नरा हे अहंकार हा ज्यांत अज्ञान राहे न जें पाहिजे निर्गुणा आपणातें ह्नणे कृष्ण कां हें शिवे मी पणातें ॥३॥ ह्नणवुनि खिजवीतो रुक्मिणीतें हरी तो परम करुणतीच्या मीपणाला हरीतो कथिन चरित तें जें वर्णिलें श्री शुकानें मनिं धरुनि पहावें सज्जनीं हें सुकानें ॥४॥ बोल खोल बहु भागवताचे श्री शुका - परम - भागवताचे पाप - ताप - हर या रसमात्रा त्याचिया कथिन मी रस मात्र ॥५॥ श्रीरुक्मिणीची बहु गोड वाणी ग्रंथास तेथें न करीन वाणी कीं कृष्ण जे शब्द अगाध वाचे वदेल तें वर्णिन माधवाचे ॥६॥ हा प्रेम संवाद सुखी सुजाणा करीतसे नामहि तेंचि जाणा आतां शुकाचार्य परीक्षितीतें सांगे कथा धन्य करी क्षितीतें ॥७॥ पलंगावरी रुक्मिणीच्या सुसेजे वसे कृष्ण ते त्यास सेवीत सेजे उभी सुंदरी ढाळीते चामरातें मनीं जे शिवे मीपणा पामरातें ॥८॥ कर मुद्यावलयांसह चाळितां चवर माधवजी वरि ढाळितां ध्वनि उठे चरणीं मृदुभूषणीं त्दृदय लग्न जिचें यदुभूषणीं ॥९॥ हरि वरि चवरेसी जेधवां हस्त नाचे दिसति सखर - वस्त्रीं कंप कांहीं स्तनाचे चळति कुचयुगाच्या कुंकुमें रत्नहार स्फुरतिच पदराही आड त्यांचे विहार ॥१०॥ बरी साजते मेखळा तीसमाजी ध्वनी ऊठती क्षुद्र घंटासमा जी असी सेविते सन्निध श्रीपतीतें पहातो स्मराचा स्वयें बाप तीतें ॥११॥ चहुंकडूनिहि आनन शोभलें पदक खोलुनि शोभतसे भलें श्रवणिचे नग शोभति दोकडे वरुनि चांचर - केशहि वांकुडे ॥१२॥ गळ सरी दुसरी न धरी गळां प्रतिभवीं न पती हरि वेगळा अवतरे अवतीर्ण जयीं पती स्व अनुरुप परस्पर दंपती ॥१३॥ कसि असीस अहंमति वाटते नरक - जन्म - मृतीसहि वाटते ह्नणउनी खिजवूनि तितें हरी निपुण कृष्ण अहंकृति तें हरी ॥१४॥ वरावे ते राजे निजसम तुवां राजतनये न ये आह्मां ऐसा क्वचिदपि वरुं वो सुविनये दिल्हें बापें भावें त्यजुनि बरवे ते क्षिति - पती पती केला ज्याचे कुळपति समुद्रांत लपती ॥१५॥ घालिती नृपति येऊनि घालेयानिमित्य जलधींत निघालेशत्रु ज्यास नृप दानव रीती ऐसियास नवर्या न वरीती ॥१६॥ त्यजियेलें अजिहि स्वनृपासना करिल त्याचिहि कोण उपासना प्रगट गोष्टिहि हे जनिं हो कसी कळत तूं ठकलीस अहा कसी ॥१७॥ ज्याचा मनांतिल अगम्यचि पंथ वाटे जे लौकिकासम न चालति लोक वाटे ऐशाचिया कुळसुता बसतील पाटीं दुःखाचिया निघति दाटुनि त्या कपाटीं ॥१८॥ आह्मीं अकिंचनचि हे तरि गोष्टि साची आह्मांसि आवड बहू जन तो तसाची आह्मीं स्वयें प्रियहि त्याचि अकिंचनातें आढ्यासि आमसि न सेवक सेव्यनातें ॥१९॥ ऐश्वर्यवंत वय आकृतिही समान स्वार्थार्थ होतिल परस्पर त्या समान मैत्रीविवाह नघडे अधमोत्तमातें तूं भाळलीस नृपनंदिनि काय मातें ॥२०॥ येथें सुजाणपण जाण तुझें बुडालें कीं दीर्घदृष्टिगत तें अवघें उडालें ज्याला न लेशगुण तो पति काय केला ज्याकारणें जन अकिंचन वो भुकेला ॥२१॥ अटन करित भिक्षा भक्षणें ज्या समाजीं गगन वसन वारा सूत्रही त्या समा जीं अगुण पण जयाचें ऐसिया स्वादु लागे तुज नृपति सुते तो कायसा दादु लागे ॥२२॥ आतां तर्हीं क्षत्रिय तूं भला गे वरीं जयाचा तुज लोभ लागे जेणें तुला साधिति लोक दोन्हीं आह्मीं वृथा काय बहू वदोनी ॥२३॥ आह्मीं न आणूं जरि तू जलागे हें दावितां आनन लाज लागे चैद्यादि - रायां तव अग्रजाला म्यां जिंकितां पौरुष उग्र जाला ॥२४॥ तर्हीं उदासीन पणीं न कामीं नहो कधीं स्त्री धन पुत्र कामीं पूर्ण स्वलाभें असतों उगेही देहीं जगीं ही जसि ज्योति गेहीं ॥२५॥ हें यानिमित्य वदनें गदपूर्वजाला कीं मी प्रिया पतिस हा तिस गर्व जाला नाहीं वियोग ह्नणऊनि असी अहंता राहे उगा हरुनि ते भव - भाव - हंता ॥२६॥ झाली असे परिसतांच अनाथ वाणी ठावी नसे जिस कधीं असि नाथवाणी त्रैलोक्यनाथ तिस गमे करितो पणातें ॥२७॥ शुक ह्नणे स्त्रवली नयनां बुजीं धुक धुकी मनिं कंप त्दृदंबुजीं स्वपवनें निज - बिंबफळा - धरा करुनि शुष्क पदें उकरी धरा ॥२८॥ कुच सुकुंकुम - चर्चित चांगले नयन बिंदु पडों वरि लागले गिरियुगीं अतसी कळिका जळें स्तनतटी तसिं वाहति काजळें ॥२९॥ नयनिं होऊनि शोक पयोधरा स्रवति लक्षुनि अद्रिपयोधरा चपळ वीज गमेच मनाचि कीं मुख सकंप चळे मणि नासिकीं ॥३०॥ हसित बाष्प तिच्या मिर वेगळां नर न ज्यास शिवे हरि वेगळा शुक ह्नणे असुखास न अंतरे उपजतां स्वतनू स्मृति अंतरे ॥३१॥ दाटूनि कंठ पडली वदनास मुद्रा शोकें भरे जग जसें भरितें समुद्रा घेऊनि चामरचुडासह मुद्रिकांहीं भूई पडे उरि नुरे तनुमाजि कांहीं ॥३२॥ पडे केळि जैसी महाचंड - वातें असें देखतां ये कृपा माधवातें उडी शीघ्र टाकी पलंगावरुनी धरी उत्तरीयांबरा सांवरुनी ॥३३॥उचलिलि चहुंहस्तीं श्री स्वयें श्रीधरानें पुसि नयन जळातें त्यांत ऐक्या करानें कुच युगुलिं हरीचे गुंतले दोन्हि पाणी सदृढ धरि चतुर्थे पोटसीं चक्रपाणी ॥३४॥ उदासीन काळत्रयीं त्या सतीचें करी बंधन प्रेम तें त्यास तीचें समाधान आतां त्दृषीकेश वाचे करी आयका शब्द ते केशवाचे ॥३५॥ ह्नणे हरी रुक्मिणिला अहाहा अनर्थ कां मांडियला महा हा निर्दोष आम्हीं परि ठेवि लागे हा दोष आह्मांवरि ठेविला गे ॥३६॥ मजविण न सुखाचा तूज तो हेतु कांहीं समजत तुझिया या पाहतों कौतुकांहीं निज - वचन - विनोदें बोलिलों तूजला गे नकळत गति याची खेद हा तूज लागे ॥३७॥ जसें नीर सेतास नेती तयाचें तुवां योग्य अर्था नुसंधान याचें वदावें असें शब्दही बोलिलों कीं तुझी होय विख्यात टीका त्रिलोकीं ॥३८॥ वदें मी तुझे बोलते आयकाया तुवां टाकिली हे मृतप्राय काया विनोदार्थ तो साच चित्तांत भारी तुवां मानिला वो ह्नणे कैटभारी ॥३९॥ तुवां या विनोदार्थ रीती खिजावें खर्या गुत्दृ अर्थास वर्णीत जावें पहावें मुख प्रेम - कोप - प्रभावें तुझें तेधवां बोलिलों याच भावें ॥४०॥ नयनशर - धनुष्यें भोंवयांच्या प्रतापें श्रवण वरिहि येती तांबडे कोप - तापें अधर थरथरीती रक्तवर्ण - स्वभावें असिस तुज पहावें बोलिलों याच भावें ॥४१॥ प्रियासी वृथा दीसते ती उगे ही गृहस्था जना लाभ तो हाचि गेहीं विनोदें अशा जो अवो काळ जातो करीतो सुखी दुःखिता काळजा तो ॥४२॥ अलभ्य हा लाभ शतक्र तूतें तो वाटला नेम अवक्र तूतें हें जाणती ज्या अति - धीट भारी भ्याडे ह्नणे नेणसि कैटभारी ॥४३॥ बोधी असा सांत्वनदक्ष तीतें म्हणे शुकाचार्य परिक्षितीतें टाकी प्रिया त्यास भयास देवी बोलेल तें आइकिजे सदेवीं ॥४४॥ लक्षी अपांगें मुख कृष्णजीचें स्वमान भंगें मन उष्ण जीचें स्नेहें सलज्जें नयनेंचि पाहे टाकूनि चिंता कळतां कृपा हे ॥४५॥ श्रीरुक्मिणी ह्नणतसे पुरुषोत्तमातें कीं जी न साम्य मज तूज ह्नणोनि मातें जे बोलिलास हरि ते तरि गोष्टि साची येते जडास समता कसि चिद्रसाची ॥४६॥ सत्तानुभूति तुझि जे सतएव सिद्धा मी तो गुण - प्रकृति या करितां प्रसिद्धा तूं चित्समुद्र अजि मी लटिक्या तरंगा हें तों नव्हे अनृत जाणसि अंतरंगा ॥४७॥ दिसे केविं मी त्वत्प्रकाशाविनाही अजी वस्त्र तंतूविना जेविं नाहीं स्वयें ब्रह्म तूं मी तुझी स्वैर माया जगीं जन्मलों तैंच दोघें रमाया ॥४८॥ तूजही जन जनाऽधिप सारे सेविताति पसरुनि पसारे नीच केविं ह्नणवे तव देहा हें ह्नणे झणि अनंत वदे हा ॥४९॥ म्हणउनी म्हणते अजि केशवा गणिति आत्मपणें जितके शवा अबुध इच्छुनि भाग्य नृपासना करिति माझिच काम्य - उपासना ॥५०॥ मृग जळा मृग धांवति बापुडे श्रमतिं तों जळ साचचि सांपडे तहि मनीं अनृताऽमृत वासना फलद तूंचि वृथा मदु पासना ॥५१॥ रजत श्रुक्ति वरील तथास्तव श्रमति नेणति जे सुख वास्तव असुख तें सुख मानुनि वासना धरिति ते करिती मदुपासना ॥५२॥ तनुस मी ह्नणुनी अभिमानिती विषय दुःखहि जे सुख मानिती धरुनि ते दृढ दुर्भर वासना करिति यज्ञ असे मदुपासना ॥५३॥ न अभिमानिति या तितके शवा भजति केवळ ते तुज केशवा मृग जळा सम भाग्य - नृपासना गणिति ज्यांस चिदर्क उपासना ॥५४॥ तुतें सेविती सूज्ञ सर्वोत्तमातें असे अज्ञ ते मागती वित्त मातें स्वयें थोर तूं येरिती श्रीनिवासा असें मी पदी श्लाघ्य मानूनि वासा ॥५५॥ असमता मज तूज असे खरी परि असें वदली तुझि वैखरी शरण केविं भयें वरुणालया तदपि उत्तर घे करुणालया ॥५६॥ लोकीं नियामक गुणत्रय जेविं राजे रज्जू फणींत हरि त्यांत असा विराजे सर्वांस दोर न दिसे अति - भ्याड साच त्रासें ह्नणे भिसि गुणाप्रति तूं तसाच ॥५७॥ या राजयांसिच भितों जरि हे स्ववाणी जी स्थापिसी तरि गमेलचि मंद वाणी कीं ते तुवां पळउनी हरिलेंचि मातें बोलेल हें स्फूट पुढें पुरुषोत्तमातें ॥५८॥ व्यापिलें जग पदें त्रिविक्रमा भें तया न ह्नणवे उरुक्रमा हाचि अर्थ सकळांपरी खरा रुक्मिणी विनवि वृष्णि - शेखरा ॥५९॥ भिऊनियां याचि खळा नृपाला या सागरीं कोण ह्नणे लपाला मनीं समुद्रीं वसतोसि देवा गुणासि जाणों भिसि वासुदेवा ॥६०॥ बलाऽढ्यासवें द्वेष हाही तसाची तुझा भाव हे गोष्टिहि होय साची बळी इंद्रियां दुर्भराचीच सेना खरा द्वेष त्यांसी तयां जें दिसेना ॥६१॥ म्हणसि टाकियलें स्वनृपाऽसना तरि जयां तव - पाद - उपासना नृप - पद त्यजिलेंचि तिहीं असे भरत अंग गयादि किती असे ॥६२॥ ज्याच्या मनांतील अगाध रीती न लोक मार्गासि कधीं धरीती आह्मीं असे हें वदलासि मातें वदेन तेंही पुरुषोत्तमातें ॥६३॥जे सेविती रस तुझ्या पद - सारसाचा त्यांचा कळे न कधिं मार्ग विचार साचा जे आत्मया प्रियतमा तुज आयत्यातें ध्याती द्विपाद पशु जाणति काय त्यातें ॥६४॥ तूझा अगम्य पथ हें न अपूर्व कांहीं कां जे अगम्य निगमा - विधि - पूर्वकांहीं निर्मूनि पाळुनि जगा निमिषे हरीतो कर्त्ता नव्हे करुनि केवळ तूं हरी तो ॥६५॥ तूझें अलोलिक कथाऽमृत गाति जेणें जे लौकिकास अजि हाणति लोक जेणें ऐशाचि ही तुझि न केविं अलोकरीती आश्चर्य कोण जन येविषयीं करीती ॥६६॥ मी निष्किंचन आणिखी प्रियहि मी निष्किंचनाचा खरा ते निष्किंचनही जन प्रिय मला तैशाचिया शेखरा हें मातें वदलेत अर्थ तुमच्या निष्किंचनत्वीं असा कीं त्यापासूनियां न किंचिदपि कीं जे ते तुह्मीं जी असा ॥६७॥नव्हेचि ज्यापासुनि कर्म कांहीं तया अकर्त्या अज - आदिकांहीं तुह्मीं प्रिय प्रीति तुतें तयांची जगांत पूजा हुतभुक्तयांची ॥६८॥ दारिद्र निष्किंचन शब्द दावी तयांसि हे गोष्टि कसी वदावी तुझ्या प्रिया तूं प्रिय ज्यांस देवा ते पूज्य लोकां सकळां सदेवा ॥६९॥ बहु धनाढ्य मला भजतीच ना म्हणुनि मी प्रिय - शुद्ध अकिंचना जरि असें ह्नणसी सुखदायका धन तया किति जी यदुनायका ॥७०॥ कुबेरासम द्रव्य तो बोलवेना धनाच्या मदें मान ज्याची लबेना धनाढ्यत्व तें आढ्यतानामकां जी घडे त्यास होते सुधा जेविं कां जी ॥७१॥ पदरिं नधनदाच्या कोटिवा अंश कांहीं मद तरि न असा जो त्य कुबेरादिकांहीं अमित विभव ज्याला गर्व त्याला दिसेना तुजचि भजतसे हो श्रीविरिंच्यादि सेना ॥७२॥ तया तुझा प्रेमविलस देवा जी बोलिजे आढ्य जया सदेवा दरिद्र जो तो तुजला भजेना पाषाण सत्संग जळीं भिजेना ॥७३॥ धन गज रथ तूझे सर्व सर्वोत्तमा ते न कळत ममतेनें देखतां चित्त माते तुज शरण न येतां दुर्जना अंतकाला गिळि विषय विषाचा त्या मदें भ्रांत काला ॥७४॥ न भजुनी मज आढ्य असी खरी तुझिच हे न घडे हरि वैखरी जरि तदंतर भाव न सांबरी अमृत - अर्थ कलिप्रद सांबरी ॥७५॥ विवाह मैत्री बरवी समासीघडू नये ते अधमोत्तमासी भावार्थ या श्रीपति भारतीचा दावूनि बोले परिहार तीचा ॥७६॥ तूं राजकन्या परि उग्रसेना मी सेवितों जेविं समग्र सेना बात्द्यार्थ हा व्यर्थ जळो जळाला डोळां पुन्हां आणिल तो जळाला ॥७७॥ अति श्रेष्ठता तूज सर्वोत्तमातें उणी मी जर्ही सेविती मत्त मातें खरें हे तर्हीं योग्य होतें वराया अजी आयकावें बरें देवराया ॥७८॥ जरि निपट - दरिद्री जो न लाहेचि कांजी तरि अमृत मिळाल्या त्यास सोडील कां जी तसि बहुत उणी मी लभ्य झालासि मातें ह्नणउनि वरिलें म्यां तूज सर्वोत्तमातें ॥७९॥ निज - तनू नर लाउनि सार्थकीं करितसे भलता पुरुषार्थ कीं सफळ पौरुष देह तुझा खरा कवण तूजसम प्रभुशेखरा ॥८०॥ साधूं नयेचि तरि जी पुरुषार्थ कांहीं तूझें समत्व न सुरां न अजादिकांही जो तो करील पुरुषार्थ असी प्रसिद्धी तेव्हां मला उचित हे तव - पादसिद्धी ॥८१॥ फळ चहुं पुरुषार्थी तूं निजानंद - सारा तरि सकळ फळात्मा तूंचि कीं सर्व सारा म्हणुनि सुख समस्त त्यागुनी वासुदेवा उचितचि वरिलें म्यां तूज जी देवदेवा ॥८२॥ सद्बुद्धिटाकुनि गृहक्रतूतें जे सेविती साधु अवक्र तूतें तूं स्वामि ते सेवक सत्क्रियांसी संबंध ऐसा उचित प्रियांसी ॥८३॥ मिथुन सुख - रतातें तूंचि आनंद साचा मृग मृगजळिं मानीं स्वाद सत्या रसाचा पिउनि सलिल मूढ ध्यात मिथ्याच पाणी गृहसुखनिरतातें दूरि तूं चक्रपाणी ॥८४॥ म्हणुनि टाकुनि सर्व यदूत्तमा भजति नीचपणें तुज उत्तमा उचित अर्पियली तनु हे तुतें जर्हि उणी सुख हें वरिलें तुं तें ॥८५॥ आतां स्वयें न वदिजे मज निर्विकारी कीं श्लाघ्य मानिति मला जन जे भिकारी ते तों यती त्यजिति राज्य समग्र सारें भक्षूनि भैक्ष्य चरितें तुझिं गाति सारें ॥८६॥राज्यादिकें टाकुनि निर्विकारी त्वदर्थ होताति असे भिकारी राज्यांत दुःखें सुख तूजमाजी म्हणूनि तूं श्लाघ्य तयासमाजीं ॥८७॥ निष्काम काय वरिला पति निर्विकारी कीं श्लाघ्य मानिति जय जन हो भिकारी तूझें सुजाणपण याकरितां बुडालें जें दूर दृष्टिपण तें ह्नणसी उडालें ॥८८॥ आणीक आपण वृथा गुणहीन साचा तो वाटला तुज कसा प्रिय - मानसाचा नेणोनि हे मजचि ते उचलोनि घाली माळा न दृष्टि तिचि दूरपथीं निघाली ॥८९॥ वदसि येरिति तूं यदुनायका परिस तेविषयीं सुखदायका अजि वृथा ह्नणिजे न करी क्रिया सहज ज्यास न इंद्रिय - विक्रिया ॥९०॥ जर्ही तूं न होसी त्दृषीकादि सेना तयां तूजवांचूनी काहीं दिसेना वृथा ज्याविना इंद्रियांदीक सारे प्रिया आत्मया व्यर्थ होसी कसारे ॥९१॥ स्फुरसि आत्मपणेंचि निरंजना परम तो प्रिय तूं सकळां जना तुज निमित्त समस्तहि आवडी जन यदर्थ धनादिक सांवडी ॥९२॥ विषयभोग जया प्रति बिंबतो तवं चिदंश जळ प्रतिबिंब तो तुज भजेल तंई परमा गती ह्नणुनि संत तुतें गति मागती ॥९३॥ निरसुनि भजत्याच्या त्या जला मीपणातें परम - करुण ऐक्यें देसि तूं आपणातें म्हणुनि भजति तूतें टाकुनी पुत्र दारा कळत वरियलें म्यां तूज ऐशा उदारा ॥९४॥ नव्हे नेणती जी नव्हे अल्पदृष्टी नव्हे दोन्हिही माझिया जी अदृष्टीं बहू दूरि आणीकही बुद्धि जाते निवदींतसें नाथपादांबुजातें ॥९५॥ तुझ्या भोंवई पासुनी काळ जाला तया पाहतां कांप ये काळजाला शरीरें पदें ब्रह्म पर्यंत नाना गिळी काय पांराजयांच्या तनाना ॥९६॥ टाकूनि सर्व तुज दीर्घतरा विचारें म्यां येरिती वरियलें न कुबुद्धिचारें अज्ञान आणि अविचार अदीर्घ - दृष्टीं तूझें पद स्मरति त्यांस नसें अदृष्टीं ॥९७॥ वाक्यांत या भावतुझा असाच कीं अर्थ दूजा अजि होय साच स्थापेल अज्ञानचि तूजमाजी तें आयकावें करुनी क्षमा जी ॥९८॥ शार्ड स्वनेंचि पळवूनि नृपाऽधमातें सिंहें मृगांतुनि जसें हरिलेंचि मातें तो सागरीं भिउनि त्यासि ह्नणे दडाला जो हें वदेल मतिमंद म्हणे जडाला ॥९९॥ आणीक एक मन शब्द तुझा न सोसी सक्रोध उत्तर वदेन असी असोसी कीं लोकरीतिरहिता वरतील मातें त्या पावतील बहुतेक बहुश्रमातें ॥१००॥ आईक जी जळधि कंकण ज्या क्षितीचें एकाधिपत्य निरुपद्रव दक्ष तीचें टाकूनिही श्रमति काय अजी वनातें जाऊनि सेउनि तुतें जगजीवनातें ॥१०१॥ आणीक एक मज जें अजि बोललासी चित्तास तो बहु - सखोल कुबोल लासी कीं क्षत्रियर्षभ वरीं अझुनीं भलागे आत्मा तुरुप तुज ज्यावरि लोभ लागे ॥१०२॥ तूजें कथामृत निघेल जिच्या सुकानीं जें वर्णिलें अजि शुकादि पिका शुकानी तें तूज टाकुनि वरील न नश्वरातें मी तों तुझीच वरिलें तुज ईश्वरानें ॥१०३॥ मरणशील असे जरि कामिनी तुझि कथा परिसे दिन यामिनी त्यजुनि तूज अशास बरी न ते तुझिच मी तरि काय वरीन ते ॥१०४॥ अज परम अनादी श्री तदंगें अनादी अज सकळ जनादी श्री तदंगें जनादी निगम वदति ऐसें सर्वही त्यावरुनी तुज निज अनुरुपा धन्य झालें वरुनी ॥१०५॥इह परत्र तुवां निज कामना पुरवितां स्मृतिकुत्सित कां मना उभय - सौख्य तुझ्या पदपंकजीं बुडवणारचि आणिक पंकजीं ॥१०६॥ आत्मा नुरुप वरिलेंचि जरी मला गे तूझें मज प्रिय न रुप न नाम लागे या लागिं जाय ह्नणतों ह्नणसी वराया रायांत यांत तरि आइक देवराया ॥१०७॥ तुज नव्हे किमपि प्रिय हें खरें जरि असे त्यजिलें सुर - शेखरें चरण होत तुझे मजला गती शरण त्यां प्रिय जे मज लागती ॥१०८॥ स्वशरणावरि तूं प्रियचि प्रिया वचनमाळ तथापिहि अप्रिया भय करी तरि हो मजला गती पद तुझे प्रिय जे मज लागती ॥१०९॥ भजति त्यास अनुग्र तूं करीं करिसि जी गुण हा भय हें हरी शरण मीं ह्नणऊनि तुझ्या पदा हरित तें भवसंकट - आपदा ॥११०॥ अनृतही भवसिंधु जसा खरा न भजतां तुज जी सुर - शेखरा शरण मी जरि ये न विनोद ह करिल ये घडि श्रून्य दिशा दहा ॥१११॥ आतां हरी नृपति जे मज बोलिलासी ते तीस होत पति जे अति दुष्ट लासी कानीं जिच्या तुझि कथा न पडे कदापी दुःखी जिताच मरतां यमलोक दापी ॥११२॥ तूझी कथा मृड - विरंचि सभेस देवीं सन्मानयुक्त धरिजेति मनीं सदेवीं कानीं जिच्या पडति त्या जगदेकसारा वोपील ते परिसतां नृपलोक सारा ॥११३॥ स्त्रियांचे ते देवा नृपति खर कीं बैल कुतरे अहा कोण्ही बोले वधिति धन - राज्यार्थ सुतरे नवोढाच्या लाता खरपुरुष सोसूनि रमती वृषस्कंधीं घेती श्वनर अवमानार्ह कुमती ॥११४॥ श्री जों असे तों क्षितिपाळ वर्णी कंटाळली तप्तसुवर्ण वर्णी ओकार - वाणा मुखभाव दावी जे जे वदे गोष्टिहि ते वदावी ॥११५॥ करुनि अंगुळिभंग रमाधवा ह्नणत तें नृप ते अजि माधवा शव जितेच अशाच रमापती बहुत ओंगळ त्या ह्नणती पती ॥११६॥ श्मश्रु रोम नख केश कातडी आंत मांस कफ पित्त आंतडीं मूत्र शेंबुड मळादि वाहती त्यांसि सुंदरपणेंचि पाहती ॥११७॥ मृगजळ पुरुषाचा देह नानाविकारीं रविकरसम त्यांत श्रीपती या प्रकारीं कुलवधु जरि पातिव्रत्यमार्गेचि पाहे भव जलधि तरे ते सर्व तूझी कृपा हे ॥११८॥ तूझा पदान्नमकरंद कथारसाचा हुंगेल जे तिसचि हा सुविचारसाचा ठायीं पडे जग भजे अजि त्या पतीतें मी भोगितें तुज तयाच रमापतीतें ॥११९॥ सुधा मानुनीयां पितो एक कांजी सुधापानकर्त्ता शिवे त्यास कां जी तसी टाकुनी मी जया मंगळाला नृपांला तयां कां भजों वोंगळोला ॥१२०॥ हीं उत्तरें सकळ युक्तचि जेविं झालीं दुःखें भडाग्निसम तीं अवघीं विझालीं तों मी उदास ह्नणऊनि अगाध वाचा आणी स्मृतीस मन तो मधु माधवाचा ॥१२१॥ या गोष्टीनें सर्वहि तें उडालें चिंतार्णवीं चित्त महा बुडालें तो भूमि देखे शरणागतीची ध्यानीं हरीच्या करुणागतीची ॥१२२॥ एकाविणें इतर रक्षक सान वाटे ये तेधवांच शरणागति नीट वाटे ऐसी अनन्य - गुरुभक्ति - उपासना ही दे कृष्ण त्यासिच घडे इतरासि नाहीं ॥१२३॥ दाता सुरद्रुम नमागतियास नाहीं न प्रार्थितां हरि न दे स्वउपासना ही ते दीधल्यावरि जरी बहु तो उदास प्रेमेंस रक्षित असे शरण स्वदास ॥१२४॥ जे आवडी त्यजुनियां पद - संपदांची प्रीतीच मागति सदां हरिच्या पदांची ते त्यांस दे सुरतरु मग ते स्वदास स्वामी न सोडिच कदापि जर्ही उदास ॥१२५॥ हा उदास परि याचि उपायीं लभ्य यास्तव शिर प्रियपायीं ठेवुनी म्हणतसे मृदुवाणी प्रीति दे नकरितां अजि वाणी ॥१२६॥ दे प्रेम याच तुझिया चरणांबुजाचें माथां सदाशिव धरी शिव अंबु ज्याचें कीं तूं उदास सहवास तुझा कराया आणीक यत्न न दिसे जगदेक राया ॥१२७॥ कांता जनास सकळांहुनि थोर वाटे तूं तो न चालसि असेरिति चोरवाटे यालागिं आवडि पदीं स्वसुर द्रुमातें जी मागणें इतर यत्न दिसे न मातें ॥१२८॥ मातें गुण प्रकृतितें जगदेकराया तूं पाहतोसि जनबुद्धिस जैं कराया लोहा जडा चलत चुंबक - सन्निधानें आतां तसेंचि करणें करुणानिधानें ॥१२९॥प्रत्युत्तरें हरिस संमत हें वदोनी दे उत्तरें कथितसें निजभाव दोनी न स्वानुरुप वरिला नृप कां भला गे आतां तरी वरिं जयावरि लोभ लागे ॥३०॥अशाहि स्त्रिया देखती वर्तमानीं म्हणोनी तुझी गोष्टि मी साच मानीं मनीं एक एकीस जें गोड वाटे तिला अन्य नेऊनि ने अन्य वाटे ॥१३१॥ देखोनि अंबा जशि शाल्वराया झाळी मनीं सिद्ध तया वराया भावानिमित्तें हरि भीष्म तीतें आणीक दोघी - बहिणी - सतीतें ॥१३२॥ शाल्वास देखोनि मनोभवार्ता भीष्में असी आइकतांचि वार्ता ते त्यागिली सांप्रत वर्त्तमानीं स्त्रिया अशाही मनिं साच मानी ॥१३३॥ होऊनिही अजि विवाह नवा मनातें स्त्री पुंश्वळी सरस देखुनि मानवातें चिंत्ती मनीं कुनर संग करी तियेतें त्यागी भला पतनु जीस्तव यास येतें ॥१३४॥ स्त्रिया दुष्टकर्मे असींही करीती ह्नणोनि प्रसंगें असी लोकरीती हरी बोलसी जाणसी पूर्ण मातें वदों कायसी साक्षि सर्वोत्तमातें ॥१३५॥ धरुनियां श्रीपतिपाद पद्मा हे बोलिली बोल सखोल पद्मा या लागुनी तीस वदे हरी तो जो दुःख तीचे अवघें हरीतो ॥१३६॥ भलि भलि अमृताचे घोट हे आयकाया बहुत बहुत होती हे तृषायुक्त काया म्हणवुनि रचिला हो क्षोभ या मानसाचा परि वदसि मुखें हा भाव माझाचि साचा ॥१३७॥ प्रसन्न मी नित्यचि तूजलागे घे तो जरी जो वर तूज लागे परंतु तूतें दिधली स्वकाया जे देतसे सर्व वरादिकां या ॥१३८॥ जें भाग्य वांछित विरिंचि - शतक्रतूतें तें मागती सकळही विधि शक्र तूतें एकांत - भक्ति त्दृदयावरि वास तीतें मोक्षादि सर्व सुख सिद्ध सदा सतीतें ॥१३९॥ सदा चित्समुद्रैक्यविद्यानदी जे नवें काय आतां तिला ज्ञान दीजे स्वतां त्यास जो मीपणा क्षिप्र संगें चढे तो तुवां नासिला याप्रसंगें ॥१४०॥ अहंपणा त्यागुनि तीव्रतत्त्वा झोंबे पुन्हा प्रेम पतीव्रतत्वा साध्वी अशा दाखविलें मतीतें देखोन मी मानवलोंच तीतें ॥१४१॥ वाईट ऐसें तुज बोलिलों कीं तें आइके जे ललना नृलोकीं मानीच ते निश्चय दुष्ट मातें न तूं तसें भाविसि उत्तमातें ॥१४२॥ न अधमासम वो मज मानिलें जरि बहू तुज म्यां अपमानिलें म्हणुनि नासुनि नूतन मीपणा स्थितिहि पूर्विल साधिलि आपणा ॥१४३॥ किमपिही नलगे मज वेगळें म्हणुनि साधिसि सर्वहि मंगळें मज भजोनिही ज्यास मनीं असे विषय भोगचि आइक ते असे ॥१४४॥ ज्या संपदा करिति बंधन दंपतीतें त्या मागती मजहि मुक्तिचिया पतीतें स्वब्रह्मचर्य तप वेचिति जे सकामीं ऐशांस हो सुलभ होइन त्यांस क मी ॥१४५॥ भोग सर्व घडती पशु देहीं त्या तनू नरक शास्त्र वदेही मुक्तिच्या पतिस त्या विषयातें मागती नसमजे विषयातें ॥१४६॥सेवून याही पुरुषोत्तमातें अभाग्य जे मागति भोग मातें परंतु हा शब्द न तूज लागे कीं एक मीच प्रिय तूजला गे ॥१४७॥ घरधणिनि तुवां हे थोर भाग्येंचि वृत्ती धरियलि चरणीं या जे निवृत्ति प्रवृत्ती खळ जन न कधींही या सुबुद्धीस लाहे कपटचि मिरवी स्त्री गोष्टि कैंची तिला हे ॥१४८॥ म्हणुनि तूजसमानचि कामिनी जरि तयांत वसे दिन - यामिब्नी तरिच त्यास तुझा महिमा नसे परिस आणिक निर्मळ मानसे ॥१४९॥ जे पावले स्वनगरा नृपती विवाहीं ते मानले मग मृगांबुनदीप्रवाहीं माझ्या कथा परिसतां मज देवराया केला तुवां परम यत्न अवो वराया ॥१५०॥ लिखित देउनियां द्विजसत्तमा निज रहस्य मला पुरुषोत्तमा लिहुनि धाडियलें असि दूसरी कवण ईसि घडेल तुझी सरी ॥१५१॥ हेंही असो झगडियांत तुझ्या स्वभावा म्या जिंकिलें भगिनिवत्सल सूखभावा केलें विरुप परि लेश तुवां न मातें वाईटवो गणियलें पुरुषोत्तमातें ॥१५२॥ हेही असोन वरणें वर आपणातें कोणी दुजा म्हणुनियां करुनी पणातें केला विलंब जरि म्यां तरि नेम काय पत्रांत या लिहियला स्मर हेम काय ॥१५३॥ ज्याच्या पदांबुजरजें शिव मज्जनातें इच्छीतसे प्रिय समस्तहि मज्जनातें तो तूं प्रसाद न तुझा जरि आज लाहें जन्में शतांत मरणें करणें मला हें ॥१५४॥ गोष्टीस या प्रत्युपकार कांहीं दिसे न आह्मां जगकार कांहीं उत्तीर्ण देऊनिहि आपणातें नव्हें तुझ्या शुद्ध भलेपणातें ॥१५५॥ हा भाव माझा सकळां कळाया बोलोनियां दावितसे कळाया धरी तुवां प्रत्युपकार कांहीं आम्हां दिसेना जगकार कांहीं ॥१५६॥ नृपासि बोले शुक विप्र संगें कीं बोल ऐसे सुरतप्रसंगें अनंगलीळेंतहि माधवाचे सुशब्द ऐसेच अगाध वाचे ॥१५७॥आणूनि कोपोपशमा रमा ते दावी रतिप्रेमहि मारमाते स्वयें निजानंदहि लोकरीती कर्मे करी जेविं गृही करीती ॥१५८॥ स्वरत नित्य विरक्तहि तो रमे सह असा जगदीश्वर तो रमे करि विलास घरोघरिंही हरी चरित तें स्मरतां अशुभें हरी ॥१५९॥ धरिति सुत्दृदयीं हा प्रेमसंवाद साधू म्हणउनि अभिधान ग्रंथही हेंचि साधूं गुणलव कथिले हे वामनें केशवाचे धरुनि चरण चित्तीं श्रीत्दृषीकेशवाचे ॥१६०॥ N/A References : N/A Last Updated : July 04, 2009 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP