मोरोपंतकॄत सप्तशती - अध्याय ७

सप्तशतीदेवी माहात्म्य नित्य पठन केल्याने सर्व शत्रूंचा नाश होतो, विशेषेकरून नवरात्रीत पाठ केल्याने जास्त परिणाम जाणवतात.


शुंभ निशुंभ क्षोभे श्रवण करुनि रक्तबीजनाशातें ॥

खळ बळ सर्वाहि खवळे कीं वश होणार काळ पाशातें ॥१॥

वाटे देवीस करुनि कलहा खल हा निशुभ करील गट ॥

त्या मागुनि कराया दुर्गा बळ हानि शुंभ करि लगट ॥२॥

करि शुंभनिशुंमांशीं ती शक्ति परा .सुसुगंर हितातें ॥

साधुनि द्याया शक्रा त्यातें हि परा मुसंग रहितातें ॥३॥

करिती जगदंबेवरि ते दारुण बाण वृष्टि आहित रणीं ॥

सोडी देवी शर जे असुहर तापद जसेचि अहितरणी ॥४॥

छेदुनि शर जालातें द्याया मद हरुनि कंप दोघांत ॥

सर्वांगीं शर हाणी देवी त्या असुरसंपदोघांतें ॥५॥

देवीच्या सिंह शिरीं कोपें चाऊनि अघर अरवालें ॥

असुराधिपें निशुंभे धांवुनि केला प्रहार करवाले ॥६॥

देवी स्वमनांत ह्मणे शीघ्राचे हा निकर वाळविल यातें ॥

ने बाणें व्हाया यत तेजो हानि करवाळ विलयातें ॥७॥

तो शक्ति पुन्हा टांकी भ्यावं; समरांऽगणीं जिला शक्रें \।

तत्काळ भगवतीनें केली तैशी ही ती द्विधा चक्रें ॥८॥

शुल निशुंभ क्षेपी तीं ये जैसा मदांघ तुर्ण करी ॥

त्यासि जसा सिंद्दीचा देवीचा मुष्ठिपात चुर्ण करी ॥९॥

टांकी निशुंभ योजिनि जे साधिला कार्य हो गदा तीतें ॥

तत्काळ चि भस्म करी निज शुलें क्षोभं भोग दातींतें ॥१०॥

न विचारी जड कीं जय साधिल देवी रणांत परशु कसा ॥

केला मग्न शिवेनें दिव्यशुकेने क्षणांत परशुकसा ॥११॥

दुर्गेनें तो मुर्च्छित करितां चि करुनि पराभव निशुभं ॥

युद्ध करी आपण ही जायासि मरुनि पराभवानिं शुभं ॥१२॥

ज्यासे दिव्यायुध धर विश्वांत ख्यात आठ भुजा गानीं ॥

ज्यासि दिली आकारें क्रौर्य ही स्पष्टा पाठ भुजगानी ॥१३॥

दिव्य रथावरि बैसुनि सर्वोऽसुर राज शुंभ आला जो ॥

त्या पाहुनि शंख शिवा वाजवि त्यां कां न चंद्रमा लाजो ॥१४॥

वाप गुण ध्वनिही करुनि बहु आद्या श्क्ति कांपवी जगती ॥

सर्वाऽसुर तेजोवध कर घंटानादही करी मग ती ॥१५॥

हरिणें हि नाद केले पर भट नादासि जे अनादरिते ॥

ज्यांहीं मदपुर्ण महा गज झाले तत्क्षणीं अनाद रिते ॥१६॥

काली उडोनि गगनी स्व कर तळांनी महीतळी ताडी ॥

त्या नांदे पाहिले जे शंखादि निनाद ते उणे पाडी ॥१७॥

ती शिवदुती हि करी जी पण अत्युच साश्वमुरथोर ॥

तेव्हा केले असुर त्रासें सोडुनि सर्व सुर थोर ॥१८॥

अतिशयित क्रोधातें त्या समयीं शुंभ दैत्य तो पावे ॥

चित्तीं ह्मणे शिवेचे घ्यावे कीं स्वाऽसु तीस ओपावें ॥१९॥

त्यासी ह्मणे जगंदंबा असुराऽपसदा रहा रहा नीचा ॥

दिधला तुला वराया हस्तांता उदार हार हानीच्या ॥२०॥

तेव्हा जय जर ऐसें ह्माणती गगनस्थ अमर परमेला ॥

हाहि मरो शीघ्र जसा तो तुजशी करुनि समर पर मेला ॥२१॥

शुंभ ज्वाला माला कुलवदना शक्ति भीषण घाडी ॥

करुनि निरास महोल्का घातें परमेश्वरी तिला पाडी ॥२२॥

राजा तेव्हांव्यापी शुंभामा सिंहनाद विश्‍वास ॥

तेचि न भ्याले बहु दृढ ज्यांसि महा शक्ति पाद वि‍श्‍वास ॥२३॥

निर्घात निस्वनानेंशुंभाचा सिम्हनाद लोपविला ॥

जो पविलें हुंकारें भंगर तो दैत्यराज कोपविला ॥२४॥

शुंभाच्या बाणांतें निज बाणाच्या शिवा महानिकरें ॥

हानिकारें तीच्या ही छेदी असुरेंद्र शत्रु हा निकरें ॥२५॥

मग जगदंबा मुर्छित पाडी शुलें तयासि विंधुन ॥

देवीप्रताप गमला तिळहि न घटजोन तोहि सिर्घुन ॥२६॥

तों तो निशुभ सुर रिपु उठला सोडुनि असावधानपण ॥

करिता इतर शिवेच्या प्रत्यय येतां असा वधा न पण ॥२७॥

देवीतें काळीतें हरितें शर व्हावयासि यश हणी ॥

संम्पन्मदांघमति निज परिनामनिरीक्षणीं नच शहाणी ॥२८॥

होऊनि अयुत भुज असुर झांकी देवीस अयुत चक्राहीं ॥

भ्यावें ज्यासि यम वरुन यक्षप वाताऽर्कवन्हि श कांहीं ॥२९॥

सुर मति सहसा मोहीं चक्र समुहीं जशीच ती लोपे ॥

तेव्हा देवी बहुतईचे समरी दुर्गातिनाशिनीं कोपे ॥३०॥

छेदी त्य चक्रातें स्वशरांही त्याही बाण जाळातें ॥

देवांते स्वोत्कर्ष त्द्दष्ट करी तत्प दैत्य पाळातें ॥३१॥

कुपितानिशुंभ शिवेंचे चुर्ण करायासि उर गदा होतें ॥

पडताळुनि धांवे तो जैसा धृतवैर उरग दाहातिं ॥३२॥

समरांत निशुंभा जी होउनि तदराति यम गदा पावे ॥

तीतें खंगे खंडुनि देवीनें कोण न मग दापावें ॥३३॥

तरि मुढ शुळ घेऊनि धांवे की जीस काळ घेरी ती ॥

मति नुमजे बाळाची प्राज्ञाही होऊनि बाळ घेरी ती ॥३४॥

दुर्गा मनीं ह्मणें मम शुलची या शत्रुंचे उर विदारु ॥

कीं हा अरतीजीवन दृढहि न दहनहि जसा उरविं दारु ॥३५॥

शुल धरुनि शुंभ हृदय शुलचि विदारितां अगा राया ॥

पुरुष निघे त्या भग्ना त्द्ददया सोडुनि जसा अगारा या ॥३६॥

भग्ननिशुंभत्द्दद्गत सुमहाबळ पुरुष युद्ध द्दढ निष्ठ ॥

श्रीमज्जगदंबेतें बाहिर निघतांचि तो ह्मणे तिष्ठे ॥३७॥

तों हांसुनि मस्तक हरि देवि न करुनि एक पल उशिरा ॥

दुर्गाऽसिपुढिन अरि जरि अद्दिपुहुनिहि बाळ मेक पळउ शिर ॥३८॥

ऐसा जगदंबेनें सुर शुत्र निशंभं हरुनि मद वधिला ॥

जो मत्त ह्मणत होता कोण करिल शस्त्र धरुनि मदवधलें ॥३९॥

जें सैन्य निशुभांचे सुर दुःसह बहुत मातलें होतें ॥

कालीनें काळम्खी बाळमुखीं तीवें घातलें होतें ॥४०॥

कांहीं शिवदुतीनें काहीं सिंहे रणांत लोळविलें ॥

कांही त्या मातृगणें स्वर्गाप्रति गौरवुनि बोळविलें ॥४१॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP