|
वि. न. ( कों . ) ( विप्र . ) उडवें ; उडवी पहा . उभा नव्हे तो ; तिर्यग ; क्षितिजसमांतर पातळींतील . रुंद ( उभा = लांब याच्या उलट ). तो अंगानें अडवा आहे . तिरपा ; वांकडा ; आड . विरुध्द ; प्रतिकूल ; उलटा ; नुकसानकारक असा . त्याचें दैव अडवें आलें . प्रतिबंध करणारा . - क्रिवि . बाजूनें ; बाजूवर ; सामोरा . ०करणें आड आणणें ; करणें . ०ठाकणें मध्यें येणें ; अडथळा करणें . ०येणें गांठणें ; भेटणें ; मार्गांत येणें . विरुध्द जाणें ; नाउमेद करणें . प्रतिबध करणें . हा आडवा येईल कोण पाहो । - सारु ८ . २९ . ( विप्र . अडवें येणें ) गर्भांतील मुलानें सरळ न येतां प्रसूतिद्वाराशीं वांकडे होणें ; अडून रहाणें . म्ह० ( ल . ) आडवें आलें असतां कापून काढावें = मार्गांत कोणी जबर दस्त अडथळा आणला तर त्याचा प्रथम नाश केलाच पाहिजे . लोक म्हणती आडवें आलें । खांडून काढा ॥ - दा ३ . १ . ४० . सामोरें जाणें ; स्वागत करणें . ०घेणें १ दौषैकदृष्टीनें पाहणें ; वांकडें घेणें ; शंका घेणें . खरडपट्टी काढणें ( विप्र . ) आडवातिडवा घेणें . मुलाला पाजणें . ०जाणें रस्ता ओलांडून जाणें . सामोरें जाणें . हरकत करणें . ०टाकणें ओलांडणें . त्याचें घर आडवें टाकून जा . ०झेलणें झोकणें टाकणें देणें ,- धोंडा , गोळा , वीट , घागर इ० वस्तू एका रांगेनें उभे राहिलेल्या लोकांच्या हातांतून एकाकडून दुसर्याकडे अशा देणें , नेणें . ( अडवें ) नेसणें लावून घेणें - ( बायकी ) लहान वस्त्र , तात्पुरतें ( स्नान किंवा वस्त्रांतर करतांना ) गुंडाळणें , वेढून घेणें ; उभें घेणें . ०पडणें भांडणतंटा तोडण्यास मध्यें पडणें ; तडजोड करुं पहाणें . लोटांगण घालणें ; दयेची याचना करणें ; उद्दिष्ट कार्य थांबविण्याविषयीं विनंति करणें . विघ - विरोध करणें . ०बोलणें मुद्दा सोडून बोलणें . वांकडे बोलणें ; लावून बोलणें ; विरुध्द बोलणें . म्हणोनि घडलें बोलणें आडवें ॥ - दावि १३५ . ०लावणें परत पाठविणें . वस्त्रांतर करतांना किंवा स्नान करतांना आंखुड वस्त्र नेसणें ; वस्त्र अपुरें व सैल नेसणें ; उभें - आडवें नेसणें . वांकडा अर्थ घेणें ; बोल लावणें ; निर्भत्सना करणें ; अडथळे उपस्थित करणें . ०होणें ( जमीनीवर ) आंग टाकून लोळणें - निजणें ; कलंडणें . ( ल . ) खालीं पडणें ; लठ्ठ होणें . आड येणें ; मध्यें येणें . अडव्या अंगाचा , अडव्या काठीचा , अडव्या बांध्याचा , अडव्या हाडाचा - लठ्ठ . उंचीपेक्षां जास्त रुंद ; आडवा वाढलेला . अडव्या जिभेचा - वांकडेंतिकडें बोलणारा ; दुर्भाषण करणारा ; भांडखोर . अडव्या सुडक्याची बायको , अडव्या सुडक्याची रांड - अत्यंत दीन , दुर्बल ( विधवेबद्दल किंवा एकाद्या बाईबद्दल बोलतांना ग्राम्य शिवी ). तूं लहान झालास तरी पुरुष आणि मी मोठी झाल्यें तरी अ० बायको , माझे हातून काय दरबारांत बोलवेल ? अडव्या हातानें देणें , अडव्या हातीं देणें - लांच देणें . अडव्या हातानें घेणें - ( ना . ) खरडपट्टी काढणें . अडव्यांत शिरणें - वाम मार्गाचा अवलंब करणें ; सरळ रस्ता सोडून जाणें . वांकडें बोलणें ; विषयांतर करणें .
|