|
स्त्री. १ ( गाय , म्हैसा इ० ) जनावराची कांस . २ बेंबीच्या खालच्या व गुह्मांगाच्या वरचा भाग . ( का . उडि = कंबर , कटिप्रदेश ; तुल० सं . ऊधस् ) स्त्री. १ लुगडें किंवा धोतराचा घोळ , खोळ ; पदराचा किंवा उपरण्याचा घोळ ; खोलगट भाग ; ओंटा . ' फुलें ओंटीत घेऊन ये .' २ स्त्रीच्या नेसलेल्या लुगड्याच्या ओंच्यांत किंवा पदरांत तांदूळ , सुपारी , हळकुंड , नारळ इ० घातलेले पदार्थ ; ओंटीत घालावयाचे पदार्थ . ( का . उडि = ओंचा , ओटी ; प्रा उअट्टी = लुगड्याची गांठ , नीवि .) ०भरणें १ सुवासिनीच्या ओटींत फळें , फुलें तांदुळ वगैरे घालणें ; ओंटी - भरणविधि करणे . ' गतधवा स्त्रिया येउनि । ओंटी भरिति मृत्तिका घेउनि । ' ' आजच ओटी भरण्याचा समारंभ कांहींसा मामींच्या हौसेखातर ... ... व्हावयाचा होता .' - झामु . २ वाड्निश्चयाच्या वेळी वधूच्या ओटीचाव विधि करणें . - ऐरापुत्र ३३७ . ३ ( ल .) जीवदान देणें ( मुलास , नवर्यास ). ' वैद्य बोवा माझ्या मुलाला बरें करुन माझी ओटीं भरा . ' भरल्या ओटीनें - १ सुखरूप प्रसृत होऊन मुलासह . २ सवाषणपणीं . ०करणें ( गाय इ०कांनीं )- गरोदरपणीं विण्याच्या पूर्वी त्यांची ओंटी ( कांस ) परिपुष्ट होणें . ओटींत घालणें - सक्रि . १ दत्तक देणें . ' ती कशी बरं आपला मुलगा तुझ्या ओटींत घालील ?' २ पदरीं बांधणें . ' हा अन्याया तुम्ही उगीचच्या उगीच माझ्या ओटींत घालीत आहां !' ३ आश्रयार्थें स्वाधीन करणें ; हवालीं करणें . ' पोरीला मी तुमच्या ओटींत घालीत आहे , तिच्या पोटच्या मुलीप्रमाणें सांभाळ करा . आपुलकींचा भाव ठेवणें . ओटींत देणें - सक्रि . १ दत्तक घेणें . २ आपलासा म्हणणें ; आपुलकीचा भाव ठेवणें . ओटीत देणें - सक्रि . दत्तक देणें ; स्वाधीन करणें .
|