Dictionaries | References ओ ओटी Script: Devanagari See also: ओंटी Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 ओटी हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : ओटनी Rate this meaning Thank you! 👍 ओटी A dictionary, Marathi and English | Marathi English | | adoption. भरल्या ओंटीनें With full lap; without having suffered any loss of children. Said to or of a married woman returning or returned to her father in law's house from a visit to her parents or mother. ōṭī f The veranda or unwalled space in front or rear of the माजघर or central space; a porch or vestibule. Rate this meaning Thank you! 👍 ओटी Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f The lap of a धोतर or लुगडें or the shoulder-cloth. Udder. The lower portion of the abdomen.ओंटी भरणें To fill (with rice, flowers, &c.) the lap of a married woman (on festive occasion). f The veranda in front of the माजघर.ओंटींत घालणें To commit to the protection and kind care of. To give into the adoption of; alsoओंटींत देणें ओंटीत घेणें To receive in adoption. Rate this meaning Thank you! 👍 ओटी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. ओवरी , ओसरी , पडवी , सोपा ; ना. पदर ( मूल ओटीत / पदरात टाकणे ). Rate this meaning Thank you! 👍 ओटी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun स्त्रीच्या नेसलेल्या लुगड्याच्या ओच्यात तांदूळ, सुपारी, हळकुंड, नारळ इत्यादी घालतात ते पदार्थ Ex. आम्ही सकाळपासून ओटी घेऊन देवळाच्या दारापाशी उभे आहोत. See : ओटीपोट Rate this meaning Thank you! 👍 ओटी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ ( गाय , म्हैसा इ० ) जनावराची कांस . २ बेंबीच्या खालच्या व गुह्मांगाच्या वरचा भाग . ( का . उडि = कंबर , कटिप्रदेश ; तुल० सं . ऊधस् ) स्त्री. १ लुगडें किंवा धोतराचा घोळ , खोळ ; पदराचा किंवा उपरण्याचा घोळ ; खोलगट भाग ; ओंटा . ' फुलें ओंटीत घेऊन ये .' २ स्त्रीच्या नेसलेल्या लुगड्याच्या ओंच्यांत किंवा पदरांत तांदूळ , सुपारी , हळकुंड , नारळ इ० घातलेले पदार्थ ; ओंटीत घालावयाचे पदार्थ . ( का . उडि = ओंचा , ओटी ; प्रा उअट्टी = लुगड्याची गांठ , नीवि .) स्त्री. घराच्या माजघरापुढें किंवा मागें भिंत न घातलेली पडवी ; ओसरी ; सोपा .( ओटा ; गु . ओटली )०भरणें १ सुवासिनीच्या ओटींत फळें , फुलें तांदुळ वगैरे घालणें ; ओंटी - भरणविधि करणे . ' गतधवा स्त्रिया येउनि । ओंटी भरिति मृत्तिका घेउनि । ' ' आजच ओटी भरण्याचा समारंभ कांहींसा मामींच्या हौसेखातर ... ... व्हावयाचा होता .' - झामु . २ वाड्निश्चयाच्या वेळी वधूच्या ओटीचाव विधि करणें . - ऐरापुत्र ३३७ . ३ ( ल .) जीवदान देणें ( मुलास , नवर्यास ). ' वैद्य बोवा माझ्या मुलाला बरें करुन माझी ओटीं भरा . ' भरल्या ओटीनें - १ सुखरूप प्रसृत होऊन मुलासह . २ सवाषणपणीं .०करणें ( गाय इ०कांनीं )- गरोदरपणीं विण्याच्या पूर्वी त्यांची ओंटी ( कांस ) परिपुष्ट होणें . ओटींत घालणें - सक्रि . १ दत्तक देणें . ' ती कशी बरं आपला मुलगा तुझ्या ओटींत घालील ?' २ पदरीं बांधणें . ' हा अन्याया तुम्ही उगीचच्या उगीच माझ्या ओटींत घालीत आहां !' ३ आश्रयार्थें स्वाधीन करणें ; हवालीं करणें . ' पोरीला मी तुमच्या ओटींत घालीत आहे , तिच्या पोटच्या मुलीप्रमाणें सांभाळ करा . आपुलकींचा भाव ठेवणें . ओटींत देणें - सक्रि . १ दत्तक घेणें . २ आपलासा म्हणणें ; आपुलकीचा भाव ठेवणें . ओटीत देणें - सक्रि . दत्तक देणें ; स्वाधीन करणें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP