|
वि. १ गोरा ; शुभ्र ; निर्मळ ; स्वच्छ ( माणूस , वर्ण , रंगशरीराचा ). २ तेजस्वी ; कांतिमान . गौरकाय व सरकार यांविषयींचें त्यांचें पक्षपातित्व लोकांच्या चांगलें नजरेस आलें - अमृ ७ . २७१ . स्त्री. पार्वती ; भवानी ; देवी ; गौरी . [ सं . ] ( वाप्र . ) प . बडखोर ; गवार लोक ; पुंड . ' कांही जाटाचे स्वार घेऊन गौर इदुखीस आले होते .' - पेद २६ . २० . ' एकून गोहदवाले व गौर त्यास मिळाले आहेत .' - पदे २९ . २०८ . गवार पहा . स्त्री. खोल व पूर्ण विचार . यांची हरएकविशीं गौर करित जाणें - रा३ . २०५ . [ अर . घौर ] पु. विचार ; चौकशी ; वास्तपुस्त . ' पांच कळशांची इनामें चालवूं त्यांचा गौर करुं .' - वसमो .; ' हरएक विसीं गौर केला जाईल .' बाबारो ३ . २०५ . - पेद ४० . १९ . ( फा .) ०काय पु. युरोपीयन माणूस . - केले १ . २६९ . ०आणणें ज्येष्ठागौरीची स्थापना करणें . भाद्रपद शुध्द षष्ठी किंवा सप्तमीस नदी , ओढा , यांच्या कांठाचे पांच किंवा सात खडे घेऊन , धुवून , झारीवरील तबकडींत ठेवून , आणून त्यांची पूजा करतात गौर आणणार्या मुलीनें घरीं येतांना तोंडात पाणी घेऊन मागें न पहतां मुक्यानें देवापाशीं ते ( खडे = गौर ) आणून ठेवावयाचे व मग चूळ थुंकावयाची असतें . ( गाडग्यांची ) ०उभी तपेलें किंवा तसलें भांडें घेऊन त्यास नवें लुगडें नेसवून वर मुखवटा ( किंवा खापराची वेळणी ) बसवून मग दागीने घालून मूर्ति तयार करणें . ( गाडग्याची ) ०खर पु. रानगाढव . करणें तपेलें किंवा तसलें भांडें घेऊन त्यास नवें लुगडें नेसवून वर मुखवटा ( किंवा खापराची वेळणी ) बसवून मग दागीने घालून मूर्ति तयार करणें . ( गाडग्याची ) ०उतरविणें भाद्रपद शु॥ षष्ठी - सप्तमीस गौर आणावयाच्या दिवशीं दोरे घ्यावयाचे असतात , ते गणपतीचा व कुमारिका आणि मुंज्या मुलाचा यांचा आठ पदरी , व सवाष्णीचा व गौरीचा सोळा पदरी , असे घेऊन आठपदरी दोर्यास आठ , सोळापदरी दोर्यास सोळा अशा गांठी देऊन त्यांत आघाडा , खोबरें , दूर्वा व रेशमी दोरा बांधून मग ते दोरे हळदीनें पिंवळे करून गौरीपुढें ठेवून , त्यांची पूजा करून गळयांत बांधतात . नंतर दहिभाताचा नैवेद्य दाखवून गौर ( सुगड ) एकीकडे ठेवतात . ०जागविणें गौरीच्या सन्मानार्थ जागरण करणें . ०जेवणें सासरहून माहेरीं आलेली सवाष्ण जेवूं घालणें ; यावेळीं गुळाची पोळी , गव्हल्याची खीर व करंज्या करतात . ०बोळविणें ( ज्येष्ठा गौर ) दहिभात , करंजी ही शिदोरी व पूजेचें सामान घेऊन , जेथून गौरी ( खडे ) आणल्या तेथें जाऊन त्यांची पूजा करून ओटी भरावी व शिदोरी आणि गौरीचे खडे पाण्यांत सोडून कांठची वाळू घेऊन घरीं आल्यावर ती वाळू सर्वत्र फेकणें इ० विधि . ( गाडग्याची ) ०बसविणें श्रावणांतल्या पहिल्या शुक्रवारीं एका सुगडांत तांदुळ , हळकुंड घालून वर वेळणी झांकून त्यास सोवळयाचा खण किंवा चोळी पांघरविणें . ०लिहीणें प्रथम सुगड व मातीची वेळणी यांस कांव लावून ती वाळल्यावर चुन्यानें नाक , डोळे , कान , तोंड इ० आकृति काढून कोळशाच्या पुडीनें केसाचा भाग काढणें , मग हळदींचा रंग करून त्याचे दागीने चितरावे . शेवटीं सुगडाचे तोंडावर रंगविलेली वेळणी बसविणें .
|