|
उ.क्रि. १ ( लांकूड इ० ) वाकसाने तासून नीटनेटके करणे ; छिलणे ; कापणे ; तोडणे ; रंधणे . २ जखमी करणे . शरनिकरे पार्षतासि तो तासी । - मो ३६ . ३३ . ३ खरडून हजामत करणे ; भादरणे . ४ ( पत्र , अर्ज , हिशेब , यादी इ० ) खरडून टाकणे ; भरकटणे ; फटकारणे ; झपाटणे . ५ ( एखाद्याची रागाने ) निर्भर्त्सना करणे ; खरडपट्टी काढणे ; हजेरी घेणे ; कानउघाडणी करणे . ६ ( अंकगणित ) भाज्यांक भाजकाने भागून अवशिष्ट राहील तो राखणे . ७ . ( ल . ) ( गो . ) अपरोक्ष निंदा , कुचेष्टा करणे . ८ ( गो . ) हातावर तुरी देणे . [ सं . तक्ष ; प्रा . तच्छ ; पं . तच्छणा ; गु . तासवुं ] ( वाप्र . ) तासून निजणे - बसणे - निश्चितपणे , आरामशीर , निर्वेधपणाने स्वस्थ निजणे , छिलणे वगैरे काम . २ ( ल . ) रिकामटेकडेपणीचा उद्योग ; केवळ वेळ घालविण्याच्या उपयोगाचे बिनमेहनतीचे व बिनफायद्याचे काम , उद्योग . तासीव , ताशीव - वि . तासलेला ; वाकसाने , रंध्याने तासून गुळगुळीत , नीटनेटका केलेला ; तासून केलेली विधवा स्त्री ; बोडकी . [ तासणे + पंत ]
|