|
पु. ताठरपणा . - वि . दांडगा ; अडदांड ; अडमुठा ; मस्त . दांडभांड गुराखी तुम्ही । - रासक्रीडा २२ . पु. १ वेळूची लांब काठी ; दांडा . २ पट्टा खेळण्याचा सराव करण्याची काठी . ३ शेताची मर्यादा दाखविणारा उंच बांध . ४ टेंकडीचा , डोंगराचा कणा , दंड , रांग . ५ उंचवट्यावरुन सखल प्रदेशाकडे पाटाने पाणी नेण्याची सारणी , प्रणाली , दंड . ६ ( व . ) ( धोतर , लुगदे इ० कांचे दोन तुकडे जोडणारी ) एक प्रकारची जाड व लांब शिवण . ( क्रि० करणे ). ७ ( शेतांमधून , शेताच्या बाजूने ) रहदारीकरितां सोडलेला जमीनीचा लांब पट्टा . ८ जमीनीचा , मार्गाचा लांबलचक , रखरखीत व ओसाड पट्टा . ९ ( फार वेळ एकाच स्थितित बसण्याने अंगाला येणारा ) ताठरपणा ; ताठकळा . ( क्रि० भरणे ). बसून बसून पाठीला दांड भरला . १० ( प्रां . ) ( मळ्यांतील ) वाफा , ताटवा . ११ ( - पुन . प्रा . ) ( शिक्षा म्हणून केलेला दंड ; ( विरु . ) दंड . ( क्रि० मारणे ). १२ चोवीस हात लांबीचा बांध ; चोवीस हात लांबीचे परिमाण . - कृषि २१३ . १३ चित्त्याच्या गळपट्ट्यापासून कंबरपट्ट्यापावेतो पाठीच्या कण्यावरुन बांधण्याची वेणी घातलेली सुताची दोरी . - चिमा १३ . १४ . ( गो . ) ( आट्यापाट्या ) सर्व पाट्यांना मधोमध विभागणारी रेषा ; दंड ; सूर . १५ ( ना . ) पाळण्याचा साखळदंड . १६ एकेक मोती . - शर [ सं . दंड ] ( वाप्र . ) ०काढणे ( मनुष्य , जनावर इ० कांस ) खूप राबवून घेणे ; तांगडणे ; ताण देणे ; पादाडणे . सामाशब्द - ०पट्टा टा पु . १ एका हातांत काठी व दुसर्या हातांत पट्टा घेऊन खेळावयाचा एक मर्दुमकीचा खेळ . ( क्रि० खेळणे ; करणे ). २ सदर खेळ खेळण्याचे हत्यार . [ दांड + पट्टा ] ०पाळे न. लांकडाची मूठ बसविलेले लांकडी पाळे . ०पेंडोळा ळे पुन . १ ( प्रदेश , जमीन इ० कांची ) सीमा ; मर्यादा ; शींव ; हद्द ; परस्परसंबंधीची जागा ; निकटपणा ; संबंध . २ ( ल . ) विवाह अथवा इतर संबंधातील ( दोन्ही पक्षांची ) अनुरुपता ; योग्यतेचा सारखेपणा ; सारखी लायकी . ( क्रि० मिळणे ; पुरणे ; लागणे ). [ दांड + पेंडोळा = हद्द , बांध ] ०मेंड पुस्त्री . सीमा ; हद्द ; शीव ; मर्यादा . त्या गावची दांडमेंड मारुतीच्या देवळापर्यंत आहे . [ दांड + मेंड = मर्यादा , सीमा ] ०यारी स्त्री. ( नाविक कों . ) काठीस ज्या मुख्य यार्या शृंगारवितात त्यांच्या शिवाय आणखीहि बारीक दोरीच्या उपयार्या असतात त्यापैकी प्रत्येक . [ दांड + यारी ]
|