Dictionaries | References

दाणा

   
Script: Devanagari

दाणा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A lump of cochineal. 7 A square or division of the coating of the custard-apple.
   Wise, sensible, shrewd, sagacious. 2 Used freely in the sense of Excellent, superior, fine, capital;--esp. of men or animals.

दाणा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  Grain. A single grain; single pearl, &c. A piece or single article (of a bale of cloths or stuffs).
   Wise, sensible, excellent, superior, fine.

दाणा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  धान्यकणाप्रमाणे असणारे मोती, मणी, डाळिंबाचे बी इत्यादी   Ex. डाळिंब सोलून दाणे काढून ठेवले
HYPONYMY:
मणी
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdबेगर
gujદાણો
kasپھوٚل
kokदाणे
nepदाना
oriଦାନା
sanकणः
telవిత్తనము
   See : अन्नाचा कण, शेंगदाणा

दाणा

  पु. १ धान्य . २ धान्याच्या समुदायापैकी , कणांपैकी प्रत्येक कण , नग , व्यक्ति . ३ धान्यकणाप्रमाणे असणारे मोत्ये , मणि , बीज , डाळिंबाचे बी इ० . ४ बरफी इ० काच्या ठिकाणी साखर जमून जे कण होतात त्यापैकी प्रत्येक . ५ ( कागद , चामडे इ० काच्या गुळगुळीत पृष्ठभागावर येणारी बारीक कणासारखी फुगोटी , टेंगूळ , नक्षी . खरार्‍याच्या आकाराच्या एका हत्याराने कातडे उभे , आडवे , किंवा चोहोकडून घासतात ; म्हणजे त्याव्र दाणा उमटतो . - ज्ञाको क २६३ . ६ ( कापड इ० कांच्या गांठीतील ) प्रत्येक नग . ७ उत्कृष्ट व एकेक नगाने विकले जाणार्‍या आंब्यांपैकी प्रत्येक नग . आम्बे मुरण्यास दाणे शुमार पन्नास . - रा २२ . १०५ . ८ किरमिजी रंगाचा कण . ९ सीताफळाच्या सालीवरील डोळ्यांपैकी प्रत्येक . १० एक प्रकारची जाडी साखर . [ सं . धान्यक - दाणअ - दाणा . तुल० फा . दाना ] ( वाप्र . ) दाणे टाकून कोंबडे झुंजविणे - पदरचे खर्चून मुद्दाम भांडणे लावणे . म्ह ०उतरंडीला नसेना दाणा पण दादला असावा पाटील राणा . सामाशब्द -
 वि.  १ धूर्त ; शहाणा ; चतुर ; दूरदर्शी ; चाणाक्ष . २ ( व्यापक . ) उत्कृष्ट ; गुणवान ; उत्तम ; फार चांगला ( मनुष्य , जनावर ). मुलगा दाणा आहे . पादशाहीस वर्तमान कळले तेव्हां बोलिले की दुस्मान दाणा गेला . - मराचिथोशा ८५ . [ फा . दाना ] दाणावणे - अक्रि . ( घोड्याने ) फार दाणा खाल्यामुळे ( तो ) कांही विकाराने , आजाराने युक्त होणे . [ दाणा ]
   प . ( ग्राम्य .) मदनछत्र .
०गल्ला  पु. धान्य ; धान्याचा सांठा , कोठार .
०गोटा  पु. ( व्यापक ) धान्यधुन्य ; धान्य , डाळी आणि इतर तत्सदृश जिन्नस .
०पाणी  न. १ निर्वाह ; पोट भरणे ; आमचे दाणापाणी तुमचे पदरी आहे म्हणून आम्हांस तुम्ही पोशितां . ३ दाणागोटा ; चारापाणी . ४ मृताकरिता एक वर्षपर्यंत ब्राह्मणांस पोचविण्याचे धान्य व पाणी . [ दाणा + पाणी ]
०साखर  स्त्री. फुल साखर काढून घेतल्यावर खाली राहणारी तांबूस साखर . कृषि ४८२ . दाणेआळी स्त्री . १ धान्याच्या दुकानांची पट्टी , गली . २ ( पुणे ल . ) दाणेबाजारांत वेश्यांची वस्ती आहे यावरुन . दाणेकरी पु . घोड्याच्या पागेला दाणा पुरविणारा मराठ्यांच्या अमदानांतील लष्करी अधिकारी . - वि . १ संसाराच्या निर्वाहास पुरुन विकण्यास उरेल इतके धान्य ज्याच्या जवळ आहे असा . २ धान्य विकणारा ; दाणेवाला ; धान्यव्यापारी . दाणेदार वि . १ ज्यांत दाणा उत्पन्न झाला आहे , भरला आहे असे ( कसणी इ० ). २ कणीदार ; रवाळ . ३ ज्याच्या पृष्ठभागावर दाणे उठले आहेत असा ( कागद , चामडे इ० ). [ फा . दानादार ]

Related Words

दाणा   टपकाळ दाणा सोडणें   दोस्त नादान, दाणा दुसमान   खाते दाणा, करते तनाना   खाई शेर दाणा   kernel   घोडा आपल्‍या गुणानें दाणा खातो   खाई शेर दाणा, चालतांना ठणाणा   माझा मुलगा दाणा, घरोघरीं माझ्या सुना   घरांत नाही दाणा पण मला बाजीराव   घरांत नाही दाणा पण मला श्रीमंत म्‍हणा   घरांत नाही दाणा पण मला हवालदार   घरमें नही दाणा, अम्‍मा गई पिसनेकू   नाचणी नाचणीचे राशींतून मोहरीचा दाणा शोधणें   grain   घरचा दाणा   घोड्याचा दाणा   अन्नाचा दाणा   दाणा काढणें   दाणा दाणा टिपती, पक्षी पोट भरती   बीं दाणा शिळटणें   बी दाणा शिळटणें   हत्तीच्या दाढेमध्यें मिर्‍याचा दाणा   घोडा आपले गुणावर दाणा वाढवितो   अवघा गल्ला दाणा, नसे कोंड्यावांचून   उडीद म्हणे मी कठीण, माझा दाणा काळा   एक दाणा दोन फोडी, खाणाराची खोड मोडी   कोंबडा कोंबडीला दाणा टाकून तमाशा पाहतो   अक्कल नाहीं पण मुलगा तर दाणा आहे   घरांत नाहीं दाणा आणि मला पाटलीण म्‍हणा   शंभरांत फूल, हजारांत काणा, सर्वात अंधळा दाणा   जेथें नाहीं दाणा, तेथें लेंकरांचा भरणा   जों चोंच देईल तो दाणा देईलच   ज्‍याच्या घरी दाणा, त्‍याचे नांव नाना   दुश्‌मन असावा पण दाणा (शहाणा) असावा   बाळ दाणा आणि त्याला चाबूक नजराणा   उतरंडीला नसेना दाणा, पण दादला असावा पाटील राणा   असा लेक (मुलगा) दाणा तर घरोघर (माझ्या) सुना   wrinkled grain   दाणें टाकून कोंबडी झुंजविणें   sound grain   टपकाळ   दाणोडा   टोकणणें   बेकटा   भातकूट   निखोड्या   निपळंजी   पळंजी   concentrates   चिंबपोल   एकदाणा   कोती   कुंकडाक सोपन पळ्यार, तांदळा दाणो मोतिं जाइतवे?   गांवांत दाखवी मिजाशी, घरांत उंदीर उपाशी   भीमसेनी बाजरी   मुल्हन   धोणके   पोटरीस येणें   मुगाणा   घांटा   रकाणा   granule   खातेंतोंड   उरदाणा   आसॉ   खडगुत   अडदाणा   गुडगुडां   चिंघरा   तांदळी   डंखीक   म्हैस बसली सखलीं, दोन्ही खळीं चुकलीं   महाडी   बडगी   नाज   पडणीस येणें   पाणी कोंडणें   पेवली   coarse grain   सिमुर   सिमुरी   बनशी   खरचिंब   चिंभ   चिकीं भरणें   मुकण   मुकणा   मुगाण   बनसी   नागाणा   आपली चंदी वाढवून खाणें   आपल्या गुणें, घोडा खाई दाणे   करबड   करबाड   कोंबिआ, कोंबो   किरमीजी   घोटवाल   वाटाण्याच्या अक्षता लावणें   शेवरा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP