|
वि. पु. कॉफी नांवाच्या झाडाचें बीं . बुंदाचा चहा - पु . ( कर . ) कॉफीचें बी उकळून केलेलें पेय ; उकळलेल्या कॉफीचें पाणी , अर्क ; कवा . बुंदाचें तेल - न . बत्तम तेल ; कॉफीपासून केलेलें तेल . - अश्वप २ . १०८ . बुंदिन - न . ( शाप . ) चहा , कॉफी , कोको , ही उकळल्यानंतर त्यांत सांपडणारा एक क्षार ; ( इं . ) कॅफीन . न. बूड ; तळ ; खालचा भाग . [ फा . बुन्ना , बुन्याद ; म . बूड ] पु. थेंब ; बिंदु . दुधाचे घागरी मद्याचा हा बुंद । पडिलिया शुद्ध नव्हे मग । - तुगा २८६४ . [ सं . बिंदु ; हिं . बुंदा ] म्ह० बुंदसे गई सो हौदसे नहीं आती . बुंदका - स्त्री . ( कापड , कागद इ० वरचा ) लहान ठिपका ; बुट्टी . बुंदकीचा गजभर चिरा जो तुटला । - ऐपो ५४ . ०घेणें ( उष्णता सहन व्हावी म्हणून ) चुलीवर ठेवावयाच्या ( खापर इ० च्या ) भांड्याच्या बुडाला माती , राख इ० चा लेप करणें . ( सौंदर्य , श्रेष्ठत्व , अप्रतीमत्व दाखविण्यासाठीं प्रमाण म्हणून योजतात ) सुरेख ; गोंडस ; सुंदर ; अप्रतिम . नाजुक रुपडें बुंद मुखोटा नवतीची लाली । - होला १०१ . लाल या विशेषणापुढें त्या रंगाचें आधिक्य दर्शविण्यासाठीं योजतात . पागोट्याचा रंग लालबुंद आहे . बुंदकडा , बुंदखडा - वि . सुंदर व देखणा ( स्त्री किंवा पुरुष ). बुंदडा - वि . बुंदखडा ; सुरेख , भपकेदार ; गोंडस वस्तु .
|