|
स्त्री. १ आई . तुम्हींहि बळि बांधिला म्हणूनि आमुची माय जी . - केका ८८ . २ ( कों . ) सासू . [ सं . मातृका ; लॅ . मॅटर ; इं . मदर ; प्रा . माउआ ; सिं . पं . हिं . माऊ ( उ ); ते . मम्मा ; उर्दू अम्मा , मा ; का . अव्वा ] म्ह० १ माय मरो पण मावशी उरो . २ ( व . ) माय तशी बेटी गहूं तशी रोटी . ( वाप्र . ) ०मावशी , मावशी पहात - विषयवासना तृप्त करण्यासाठी अगम्यगमन सुद्धा वर्ज्य न करणार्या मनुष्यासंबंधीं म्हणतात . माय विणें - नाहीं , मावशी पहात - विषयवासना तृप्त करण्यासाठी अगम्यगमन सुद्धा वर्ज्य न करणार्या मनुष्यासंबंधीं म्हणतात . माय विणें - आई प्रसूत होणें ; मातेनें विशिष्ट गुणांनीं युक्त अशा पुत्रास जन्म देणें . २ ( ल . ) ( एखादें काम करण्याविषयीं ) छाती , धाडस , हिंमत होणें . मला शिवी देण्याला कोणाची माय व्याली आहे तें पाहतों . सामाशब्द - ०आंग न. १ शरीराचा अतिशय कोमल , नाजूक भाग . २ गुदभ्रंशांतील बाहेर आलेलें आतडें ; गुदभ्रंश . ३ बाहेर आलेला गर्भाशय आणि गर्भाशयभ्रंश . ४ योनि ; स्त्रियांच्या किंवा मादीच्या जननेंद्रियाच्या आंतील जननविषयक अंग , इंद्रिय . तिला बाळंत होतांना फार त्रास झाला व मायआंग बाहेर आलें . [ माय + अंग ] ०आजा पु. आईचा बाप ; मातामह . ०आजी स्त्री. आईची आई ; मातामही . गोसावीण स्त्री . राजरा किंवा राजेश्वरी देवीच्या कुलधर्मांत सवाष्ण म्हणून सांगितलेली विधवा . या कुलधर्मांत एक घरचें मुहूण , एक बाहेरचें मेहूण , एक ब्राह्मण , एक सुवासिनी , एक ब्रह्मचारी आणि एक विधवा अशीं साडेसात माणसें ( ब्रह्मचारी अर्धा माणूस ) भोजनास बोलावतात . विधवेला मायगोसावीण म्हणतात व देवी मानून तिचें पूजन करितात . हा कुलाचार पुष्कळ ब्राह्मण कुटुंबांत आहे . मायचा पूत , मायेचा पूत पु १ खर्या आईचा पुत्र ; पराक्रमी , प्रतापवान , महत्कृत्य करणारा मनुष्य . असे परिणाम उत्पन्न करणारा कायदा कोणत्या मायेचा पूत निर्माण करण्यास तयार आहे ... - टि ४ . ९२ . २ निंदा , उपहास इ० कर्तव्य असतांहि याचा उपयोग करितात . [ माय = आई + पूत = पुत्र ] मायचि मी , मायचि मी चूत उद्गा . ( कों . ) ( अश्लील ) अपशब्द ; एक शिवी . तुझ्या मायचि मी चूत साल्या . ०झवों उद्गा . ( हेट . ) एक शिवी ; आईशीं वाईट कर्म करणारा या अर्थी . ०थळ न. आईचें म्हणजे जन्माचें स्थळ ; जन्मभूमि . असंतुष्ट पक्षानें आपल्या गांवांत किंवा भोंवरगांवीं झालेल्या निकालावर पूर्वग्रहदूषित नसलेल्या निःक्षपातीं अशा परस्थळीं फिरुन चौकशी व्हावी अशी विनंति करतांना योजलेला शब्द . उदा० हें मी मायथळ मानितों . दुसरें थळ मला द्या . ०देश पु. जन्मभूमि . ०पोट न. अतिशय शांततेची व सुरक्षिततेची जागा ; आसरा ; थारा ; लपण्याची जागा ; शरणस्थान . - वि . १ आश्रय देणारा ; रक्षक ; पालक ( देव , राजा , धनी , लोक , राज्य , देश , गांव ठिकाणा इ० ). जें अचिंतां अनाथांचें मायपोट । - ज्ञा ८ . १९५ . २ गरीब ; निरुपद्रवी ( गाय , घोडा , हत्ती इ० ). ०बहीण स्त्री. आदरानें कोणत्याहि स्त्रीविषयीं योजावयाचा शब्द ; आईसारखी किंवा बहिणीसारखी मानिलेली स्त्री . मायबहिणी विठाबाई । लागला छंद तुझे पायीं । [ माय + बहीण ] ०बहिण - ( व . ) आईबहिणीवरुन शिव्या देणें . घेणें - ( व . ) आईबहिणीवरुन शिव्या देणें . ०बाप पुअव . आई व बाप ; आईबापें . म्ह० ( व . ) माय बाप हेल्या लेकरं पाहिले . कोल्ह्या = आईबाप सशक्त व मुलें किडकिडीत . ०भाषा बोली - स्त्री . स्वतःची भाषा . मावली माउली - स्त्री . १ आईस लडिवाळपणें संबोधण्याचा शब्द . २ ( सामा . ) आई किंवा आदरणीय , आवडतें वडील स्त्रीमाणूस . ०मावशी स्त्री. १ मातेसमान किंवा प्रौढ स्त्री . २ मातृस्थानीय किंवा अनुल्लंघ्यवचन असलेली नातेवाईक स्त्री . ( क्रि० ओळखणें ; जाणणें ; मानणें ; पाहणें इ० ) गोमांस व शिवस्व . हे शब्द पहा . [ माय + मावशी ] ०माहेर न. १ आईचें घर ; माहेर . २ आश्रय ; थारा . ३ आश्रयदान ; ( क्रि० करणें ). ०मूर्ति वि. दिसण्यांत संभावित परंतु महा लुच्चा मनुष्य . ०मायेराणी राणी - स्त्री . १ स्त्रिया व खालच्या जातींतील लोक यांनीं पूज्य मानलेली पिशाच देवता ; एक क्षुद्र देवता . जाखमाता मायराणी । बाळाबगुळा मानविणी । - दा ४ . ५ . १६ . २ जलदेवता . जळीच्या मेसको मायेराणी । - दा ३ . २ . २७ . ३ ( व . ) एक देवी . हिची पूजा दिवाळीत होते . आमच्या घरीं मायराणीचा कुलाचार आहे . ४ ( निंदेनें ) करंजी नावाचें पक्वान्न . म्ह० अडक्याची मायराणी सापिक्याचा शेंदूर . मायराणीचे दिवे - पुअव . आंत तेल घालून व वात लावून मायराणीस समर्पण केलेले कणकेचे लहान लहान दिवे . बायकांचा हा आषाढांतील एक कुलाचार आहे , या दिव्यासारखे कणकेचे दिवे करुन बायका खातात म्हणून - मायराणीचे दिवे खाल्ले फिरफिरुन घरास येते - असें एखाद्या धीट , लचाळ व त्रासदायक स्त्रीसंबंधीं रागानें म्हणतात . ०वणी स्त्री. १ कुलीन स्त्री . २ गर्भार स्त्री . मायवणीं धाल्या धाय । गर्भ आंवतणें न पाहे । - तुगा २३४८ . [ प्रा . ] ०वत न. महारांस आई किंवा पालक यांच्या ठिकाणीं असलेल्या गांवच्या सर्व दुसर्या जाती ; या जातीपैकीं एक व्यक्ति . ०वाण न. ( व . ) नवर्या मुलाच्या आईला द्यावयाच वाण . मायवाणासाठीं लुगडें द्यायला हवें .
|