|
वि. ( प्र . ) लांडा पहा . पु. ०पुच्छ वि. ( अश्लील ) पुरुषाचे जननेंद्रीय ; शिश्न . ( ल . ) खोल मसलतीचा व लुच्चा मनुष्य . लांडा ; शेपूट कापलेला , तोडलेला ; बोखाडलेला . दांडग , उन्मत्त , बेगुमान इसम . ( एका लबाड , शेपूट तुटक्या उंदराच्या गोष्टीवरुन ) मुलांच्या टोळीचा नायक ; लहान पुढारी . लंडोबा - वि . लबाड . खलेल , आतताई मूल इ० . देवधर्माला न जुमानणारा , पाखंडी , विषयी मनुष्य . - वि . स्वच्छंदी ; स्वैर . ठक ; पक्का धूर्त . दांडगा ; उन्मत्त ; उनाड . ऐसा मान्यतेचा पुष्ट गंडु । तो अभिमानी परमलंडु । - ज्ञा १६ . २३६ . ( व . ) धीट ; धीमा ; बेगुमान ; बेफिकीर . [ फा . लन्द , लवन्द ] सामाशब्द - ०पण न. दांडगाई ; उन्मत्तपणा . म्हणवितो दास न करितां सेवा । लंडपणे देवा पोटभरी । - तुगा ८८८ . ०भारती पु. ( निंदार्थी ) नागवा असणारा गोसावी इ ०लंडा पु. ( अश्लील ) पुरुषाचे जननेंद्रिय ; लंड . लंडाई स्त्री . कावेबाजपणाची व लुच्चेगिरीची वर्तणूक . दांड ; आतताई , झोटाईची वर्तणूक ; दंडेली . हट्टीपणा ; खलेली . [ लडं ] लडामुंडी - स्त्री . ( कु . ) भांडण . ( लंड , मुंड इ० शिव्या देण्यावरुन ). लंडी - स्त्री . ( निंदेने ) भित्रा , बायक्या , नामर्द मनुष्य . भवाच्या भये काय भीतोस लंडी । - राम २७ . - वि . भित्रा . लंड ; दांडगा ( मनुष्य . ) असे असुनियां दबली लंडी । - ऐपो २२५ . अविचारी ; लबाड ; लुच्चा . लंडी लटिका लाबाड । - दा २ . १ . ३३ . [ लंड ] लंडीपणा - न . नामर्दपण ; दौर्बल्य . ऊठ टाकूनियां तुच्छ लंडीपण परंतपा । - वामन , गीतासमश्लोकी २ . ३ .
|