|
न. समाधान ; मनास वाटणारी स्वस्थता ; आराम ; आनंद , चैन ; अनुकूल अनुभव ; शांतता व विश्रांति ; करमणूक व उपभोग ; शांति . ( समासांत ) आत्म - रति - विषय - इंद्रिय - सुख ( समासांत पूर्वपदीं - विशेषणार्थी ) सुखकर ; सुखसाध्य ; सुखखाद्य इ० [ सं . ] म्ह० सुखंच मे शयनंच मे - चैनींत राहून झोपा ताणणें . ( वाप्र . ) सकलसुखसंपत्तिवसति - सर्व प्रकारच्या सुखाची व समृध्दीची खाण ( खुषमस्करी ) किंवा हितचिंतनाच्या वेळीं उपयोगांत आणावयाचा शब्द ) सुखाचा विचार - पु . समाधानाची कल्पना . सुखाचा भाऊबंद , सुखाचा भागी , सुखाचा वाटेकरी , सुखाचा सोबती - पु . शाळुसोबती ; ताज्या घोडयावरील गोमाशा . केवळ चैनीच्या वेळचा सोबती . सुखाचा शब्द - पु . गोड , सभ्य भाषा ; मनास समाधान वाटेल असें भाषण ; मृदु भाषण . सुखानें सुखें , सुखें = सुखेनैव - क्रिवि . आनंदानें ; तत्परतेनें ; अंतःकरणपूर्वक ; सहजरीतीनें . सुखास पडणें , सुखास येणें , सुखास वाटणें - सोपें , होणें ; बरें वाटणें . सामाशब्द - ०कर दायक सुखावह - वि . सुखदेणारें , ०ढाळ पु. फार त्रास न देणारें जुलाबाचें औषध व त्यामुळें होणारा जुलाब . [ सुख + ढाळ ] ०दुःखभोक्तृत्व न. सांसारिकास किंवा जीवात्म्यास भोगावे लागणारे सुखदुःखाचे अनुभव . ०निद्रा स्त्री. गाढ झोंप . ०प्रसव पु. विनाआयास होणारी प्रसूति . ०भाक् , भोगी - वि . १ सुखी ; सुखें भोगणारा ; सुखाचा वांटेकरी . २ अत्यंत विषयासक्त . , भोगी - वि . १ सुखी ; सुखें भोगणारा ; सुखाचा वांटेकरी . २ अत्यंत विषयासक्त . ०भाग पु. सुखकारक , सोपा वांटा , ठेवा . ०मांस पु. समृध्दीमुळें शरीर सुटणें . ( क्रि० येणें ; चढणें ). ०रीण न. जरूरी नसतां चैनीसाठीं काढलेलें किंवा सुखानें , सोईनें फेडतां येईल असें कर्ज . ०रूप वि. सुखी ; खुशाल ; संकटरहित . - क्रिवि . कांहीं त्रास किंवा अडथळा न होतां ; सुखानें ; सुरक्षितपणें ; सुखेनैव . ०वंत वि. सुखी . ०वस्ती स्त्री. १ कोठेंहि सुखानें राहणें , मुक्काम करणें . २ वतन , जमीन , वतनवांडी , कामधंदा यासंबंधाची काळजी मागें नसून केवळ पूर्वार्जित धनसंचयावर कोणत्याहि गांवीं चैनीखातर राहणें . - वि . सुखवस्तू ; श्रमरहित जीवन कंठणारा ; जीवनाकरितां परिश्रम करावे न लागणारा . ०वास पु. सुखवस्ती अर्थ १ व २ पहा . ०वासी स्त्री. ( व . ) गवती चटई ( बसण्याची ). - वि . सुखवस्ती ( - वि . ) पहा . ०विणें अक्रि . सुख देणें ; आनंदित करणें . ०शयन न. ०शेज स्त्री. १ ( शृंगारिक काव्य ) चांगला पलंग , अंथरूण इ० २ सुखकारक झोप . शय्या - स्त्री . सुखशयन अर्थ १ पहा . २ परलोकीं सुख व्हावें म्हणून ब्राह्मणास दान करावयाचा पलंग , बिछाना इ० ; मृतशय्या पहा . ०संतोष समाधान - पु . न . आनंद आणि शांति ; स्वास्थ्य व सुखोपभोग ; विश्रांति आणि तृप्ति . संतोषानें - क्रिवि . १ आनंदीपणें . २ स्वेच्छेनें ; स्वतःच्या राजीखुशीनें ; अक्कलहुषारीनें ; कोणाच्या जबरदस्ती विरहित . ०सोहळा सुखाचा सोहळा - पु . विवाह ; मुंज इ० प्रसंगी करावयाचें न्हाणे माखणें , मिरवणूक , अलंकारधारण , प्रीतिभोजन इ० ( क्रि० भोगणें ). ०स्पर्श वि. ज्याच्या स्पर्शापासून आनंद मिळतो असा . सुखांगणें - अक्रि . १ केवळ चैनींत गुरफटणें ; सुखांतच मग्न राहणें ( निंदार्थी ); हालअपेष्टा सोसल्यानंतर सुखी बनणें . [ सुख + अंग ] सुखाचा धनी , सुखाचा प्राणी , सुखाचा जीव , सुखानंद - पु . १ सुखासमाधानांत आयुष्य , घालवणारी व्यक्ति ; सुखानें निर्वाह होणारा माणूस . २ दयाळु , स्नेहाळु , पुरुष . सुखाचा वांटा - पु . सुखमय स्थिति , ठेवा . ( क्रि० उचलणें ; घेणें ; भोगणें ). सुखाचा वारा - पु . १ संतोषदायक बातमी , वार्ता . २ गोड , सुखकारक शब्द , बोलणें ; सुखाचा शब्द . सुखाची आईबाई - स्त्री . ऐश्वर्यांतील सहचारिणी ; सुखापुरती झालेली मैत्रीण . सुखाची घडी - स्त्री . सुखदायक वेळ , प्रसंग . ( क्रि० येणें ; उगवणें ; चालणें ). सुखाची भाकर , सुखाची भाकरी - स्त्री . सुखकारक उद्योग ; विनात्रासाचा धंदा , नोकरी किंवा अशा परिस्थितींतील सुख . सुखाचें माहेर - न . सुख मिळणारें ठिकाण ; आजोळ ; आनंद देणारी जागा . वक्षस्थळ तैसें रुंदावलें । सर्व सुखाचें माहेर । सुखाचें शरीर - न . सुखोपभोगानें पोसलेलें शरीर ; निरोगी काया . सुखाड - न . सुख . - वि . सुखकारक . सुखाडणें , सुखांडणें - अक्रि . ( काव्य ) सुख पावणें ; आनंदांत गर्क होणें ; फार संतुष्ट होणें . निजसुखें सुखाडला । सुखादुःखाचा सोबती , सुखादुःखाचा सोबतीण - पु . स्त्री . जिवलग मित्र , नवरा ; जिवलग मैत्रीण ; बायको . सुखानुभव , सुखानुभूती - पु . स्त्री . सुखसंतोषाची जाणीव . सुखानुभव - वि . सुखाचा अनुभव घेणारा . सुखापा , सुखावा , सुखोपा - पु . सुख ; शांति . सुखापुरी - पु . एक गोसाव्यांचा पंथ ; ( निदार्थी ) आनंदी मनुष्य ; चैनी , सुखी इसम . [ सुख + पुरी ] सुखर्थी , सुखैषी - वि . सुख इच्छिणारा . सुखावणें - अक्रि . सुखाडणें पहा ; आनंद पावणें ; सुखाची चट लागणें व त्यामुळें आळस उत्पन्न होणें . सुखावह - वि . सुखकर ; सुख देणारें . सुखाविणें - उक्रि . सुखी व समाधानी करणें ; आनंदी व संतुष्ठ करणें . सुखासंतोषानें , सुखासंतोषें , सुखासमाधानानें - क्रि . वि . सुखसंतोषें पहा . सुखासन - न . सुखानें बसतां येईल अशी पालखी , मेणा इ० वाहन . सुखासुखी , सुखासुखीं - क्रिवि . १ सुखसंतोषें पहा . २ उगाच ; निष्कारण . सुखास्वाद - पु . सुखाचा उपभोग . - वि . स्वादिष्टपणाचा ; चवीचा . सुखिया - वि . १ सुख भोगणारा ; सुखी . २ समाधानी ; संतोषी , आनंदी ; चैनी ; मौजा मारणारा . सुखीस्वभाव - पु . समाधानी स्वभाव . सुखें सुखेनैव - क्रि . वि . १ सुखानें . सुखसंतोषें पहा . २ अनायासें . सुखोत्पत्ति - स्त्री . १ सुखाचा उदय . २ सामान्यतः सुख ; चैन .
|