|
स्त्री. १ गुदगुली ; हुळहुळण्यासारखी खाज ; कंड ; शिरिरि ( अवयवावरून केंस , माशी इ० फिरल्यानें होणारी ). ३ परद्रव्याच्या किंचित स्पर्शानेम नाजुक किंवा दुखर्या अवयवास वरील अवस्था होणें . [ स्पर्शध्वनि ] हुळहुळणें - अक्रि . १ वरील अवस्था , गुदगुल्या होणें ; कस , मुंगी इ० अंगावर फिरल्यानें असा परिणाम होणें ; तसें होण्यास वरील वस्तू अंगावरून फिरणें . २ ( ल ) अधीर , उत्कंठित होणें ; खाजणें - ( हात , पाय , जीभ इ० मारण्यास , बोलण्यास ). ०पुळपुळ चुळचुळ - स्त्री . अतिशय घाई ; गडबडा ; चुळबुळ . हूळहुळा - वि . १ नाजूक ; कोमल ; परकीय वस्तु जवळ आली असतां अंगावर शहारे उभे राहणार्या प्रकृतीचा ( मनुष्य , कातडी , अवयव ). २ तशा प्रकारची झालेली ( प्रकृति , कातडी ). ३ स्पर्श सहन न होणारा ; प्रक्षुब्ध . ४ बिन विचारानें एखादी गोष्ट करण्यास प्रवृत्त होणारा . हुळहुळाट - पु . अतिशय हुळहुळ . हुळहुळी - स्त्री . ( गो . ) पिसू . हुळहुळी मुंगळी मुंगी - स्त्री . धावरी मुंगी ; जलद चालणारी काळी मुंगी .
|