Dictionaries | References

अनंत शास्त्रं बहुलाश्व विद्या, अल्पश्व कालो बहु विघ्नताच

   
Script: Devanagari

अनंत शास्त्रं बहुलाश्व विद्या, अल्पश्व कालो बहु विघ्नताच

   शास्त्रीय ज्ञान अपार आहे
   तसेंच अनेक विद्यांचा अभ्यास करावयाचा तर त्याही फार आहेत. पण मनुष्याला वेळ थोडा असतो व त्यांतहि अनेक अडचणी असतात. याकरितां हंसक्षीरन्यायानें त्यांतील सार तेवढें घ्यावें. आयुष्य थोडें विद्या फार. ( इं.) Life is short art is long. लॅ - Ars longa vita brevis. ‘ शास्त्रें फार अपार जीवित तुझें अत्यल्प कीं मानवा । तेंही विघ्नशताभिभूतचि असे नाहीचरे वानवा ’ । ‘ अनेकशास्त्रं बहुवेदितव्यमल्पश्च कालो बहवश्च विघ्नाः । यत्सारभूतं तदुपासितव्यं हंसो यथाक्षीरमिवाम्बुमध्यात्‍ ’ ॥ -सुर. १७३.८७८.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP