-
वि. १ जागृत ; झोपेंत नसलेला . २ ( ल . ) सावध ; दक्ष ; सावधान . तन्मत मान्य मला , कीं नय तच्चित्तीं असे सदाजागा । - मोसभा ४ . १०३ . ३ ताळयावर , शुध्दीवर आलेलें ( मन , वृत्ति ). भरतजननि जागी होय रामप्रतापें । - वामन , भरतभाव ८९ . ४ स्वस्थ ; शांतचित्त . ? [ जागणें ]
-
स्त्रीपु . १ स्थळ ; स्थान . २ खाली , रिकामें स्थळ ; अवकाश ; बाब . ३ हुद्दा ; नोकरी ; अधिकाराचें ठिकाण ; दर्जा मुलगी देणें ती चांगली जागा पाहून द्या . फडणविसाची जागा रिकामी आहे . ४ बदला , ऐवजीं स्थळ . ५ स्थळ ; पाया ; आधार ( प्रमाण , पुरावा , समर्थन या साठीं ). ती आसामी चालत होती तों आमची पांचशें रुपयांची जागा असे . ६ साधन ; कारण ; निमित्त ; सवड ( कृत्यासाठीं ). धनी उठून जातांच चाकरास खेळावयास जागा झाली . ७ उभें राहण्याचें ठिकाण ; आधार ; साधन ; युक्ति ; बल ; सामर्थ्य . त्यापाशीं पांचपन्नास रुपयांची जागा आहे . ८ किल्ला ; ठाणें . तो जागा सुरुंगानें बुरूज उडवून घेतला . - चित्रगुप्त ८७ . - मराचिथोरा ४२ . [ फा . जाय - गाह ]
-
०जागचे क्रिवि . १ त्याच स्थळीं ; असलेल्या जाग्यावर महामारीनें माणसें जागचेजागीं मरतात . २ आपण होऊन ; दुसर्यानें न सांगतां ; मनाचे मनांत . कोणी त्याला न बोलतां तो जागचे जागीं रुसला तर रुसो . म्यां तर कांहीं सांगितलें नाहीं तो जागचे जागीं कल्पना काढतो . जागां , , जागें - क्रिवि . ठिकाणीं ; - च्या ऐवजीं , बद्दल . त्यांना आम्ही वडिलांचे जागीं मानितों .
-
जागीं क्रिवि . १ त्याच स्थळीं ; असलेल्या जाग्यावर महामारीनें माणसें जागचेजागीं मरतात . २ आपण होऊन ; दुसर्यानें न सांगतां ; मनाचे मनांत . कोणी त्याला न बोलतां तो जागचे जागीं रुसला तर रुसो . म्यां तर कांहीं सांगितलें नाहीं तो जागचे जागीं कल्पना काढतो . जागां , , जागें - क्रिवि . ठिकाणीं ; - च्या ऐवजीं , बद्दल . त्यांना आम्ही वडिलांचे जागीं मानितों .
Site Search
Input language: