-
न. १ सुदैव ; कल्याण ; अभ्युद्य ; ऐश्वर्य ; सुखकारक स्थिति . २ ( ज्यो . ) अनुकूलता ; कृपादृष्टि ; कल्याणकारकता ( तिथि , युति वगैरेची ). ३ हितकारकता ; लाभदायकता ( एखाद्या वचनाची अथवा दिग्दर्शक गोष्टीची ) . - पु . ( ज्यो . ) सत्तावीस योगांपैकी तेविसावा योग . - वि . १ मंगलदायक ; लाभदायक ; सुखकारक ; चांगले ; सुदैवी ; सुपरिणामी ( कृत्य , विधि , शकून , चिन्ह , योग ). २ मंगल ; उत्सवरूपी ; समारंभाचे ( विधि , प्रसंग , संस्कार वगैरे ). याच्या उलट अमंगल ; अशुभ , श्राद्ध ; पुण्यतिथि , वगैरेसंबंधी . ३ सामान्यतः चांगले ; बरें ; हवेसें . अशुभस्य कालहरणं शुभस्य शीघ्रम् । [ सं . शुभ् = शोभणें , प्रकाशणे ] म्ह० - शुभ बोल रे नार्या , मांडवास आग लागली .
-
०कर , शुभंकर - वि . शुभदायक ; मंगलकारक ; हितकर ; सुखकर .
-
०कर्म कार्य - न . मंगल समारंभ ; उत्सव ; कल्याणकारक संस्कार , विधि वगैरे ( उदा० लग्न , चौल , मुंज वगैरे ).
-
०कृत्य न. १ ( शब्दशः ) चांगले कार्य ; मंगलकार्य . २ ( सांकेतिक ) मैथून .
Site Search
Input language: