Dictionaries | References

उठा काका, तीन तुमचे आणि दोन माझे

   
Script: Devanagari

उठा काका, तीन तुमचे आणि दोन माझे     

एकदां एक चुलता व त्याचा पुतण्या असे गांवास गेले होते. तेथे त्यांनी जेवण्याकरितां स्वयंपाक केला त्यांत लाडू किंवा मोदक केले
ते पाच झाले. तेव्हां जेवावयास बसतांना त्यांतील तीन कोणी घ्यावे व दोन कोणी घ्यावे याबद्दल त्यांच्यात तंटा सुरू झाला. तेव्हां अखेरीस दोघेहि रुसून बसले व जो आधी जेवावयास उठेल किंवा बोलेल त्याने दोन घ्यावे व दुसर्‍याने तीन घ्यावे, असे ठरले. बराच वेळ दोघेहि स्वस्थ न बोलतां बसले. अखेरीस पुतण्यास भूक सहन होत नाहीशी झाली तेव्हां तो म्हणाला
चला उठा काका, आता तीन तुमचे व दोन माझे! याप्रमाणें तो हरला. तेव्हां ज्याला जास्त गरज त्याला नेहमी पडते घ्यावे लागते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP