|
वि. ( कडक असा मारतांना होणारा आवाज , यावरुन ). १ टणक ( लांकुड , माती ); कमी चिकण . २ महाग ( भाव , दर ). ' विलायती हुंडीचा भाव घसरल्यामुळें सरकार कृत्रिम उपयांनी नाणेंबाजार कडक राखून ठेवतें . ' - के १० . ६ . ३० . ३ शिस्तीचा ; तापट . ' आपले वडील मोठे कडक आहेत .' - विवि . १० . ५ .- ७ . १२४ . ४ .( ल .) कठोर ; उग्र ; रागीट ' त्यांची मुद्रा बरीच कडक दिसत आहे . ' - विवि ८ . १ . ५ . ' ठाऊक नाहीं कडक मर्जी आमची .' - कफा १७ . ५ . जलाल ; प्रखर ( भाषण , लेख , ऊन इ० ). ' उष्ण कटिबंधांत एकादे वेळेस उन्हाळा कडक होऊन सर्व पदार्थाचा सत्यनाश होऊन जातो ' पाव्ह ५५ . ६ तेजस्वी ; पाणीदार . ' कृष्ण पुरःसर पांडव आले हांकीत हय कडक डोहा । ' - मोगदा १ . १९ . ७ वाळलेलें ; आर्द्रता नाहींशी झालेलें ( धान्य , भाकरी ). ८ सणसणीत ; जोराचा . ' अधिकार्यानें त्याच्याविरुद्ध कडक रीपोर्ट केला .' ९ टणक पण ठिसूळ ( लोखंड , सोनें किंवा शिसें यांच्याशीं तुलना करतांना ). १० जहाल ; झोंबणारें ; उष्ण ( तिखट ). ११ कच्चेपणामुळें दडस ( फळ , भाजी ). १२ दणगट ; निकोप ( माणुस , जनावर ). १३ ( ल .) कडू ; तीव्र ( औषध , तपकीर , विडी ). १४ तीक्ष्ण ; बोचणारें ( थंडी ). १५ कर्कश ; कानठाळ्या बसणारा ( आवाज , संभाषणल .) ( ध्व . कड ; तुल०सं . कड्डु = कठिण होणें . हिं कडा = कडक ; किंवा सं . कक्खट - वर्णव्यत्यय होऊन ) - क्रिवि . ( ध्वनि ) झपाट्यानें ; चटदिशीं ; चटकन ; मोकळेपणानें ( उद्योग इ० होणें , करणें ; माणसे इ०नीं धावणें , चालणें ). पु. ( हिं .) ( जंबिया , बांक ) आपल्या हातांतील जंबियानें जोडीदाराच्या पायांच्या बाहेरील घोट्यावर मारणें . पु. ( लाठी .) १ गुढग्यावरील मार . २फरीगदका यामधील गुढग्यावरील वार . - व्याज्ञा . ४ . ३८७ . पु. ( हिं .) समुदाय ; गर्दी ; गोंगाट . ' पायदळ निशाण कडक पुढें उडाला । ' - ऐपो ११० . ( सं . कटक ) कडाका पहा . पु. ( हिं ) हिंदी भाषेंतील एक वृत्त , छंद ह्मा वृत्तांत भाठाचें गाणें असतें . याला वीर असेंहि दुसरें नांव आहे . अमृतरायाची कांही अक्विता या छंदांत आहे . याचें उदा० ' ध्रुवागमन ऐकतांचि भूप हर्ष मानितसे , तट तट तुटसि कसे , पुर्व दिशे पूर्ण चंद्र समुद्रासि जसा दिसे , उंचबळुनि गर्जतसे .' अमृत ११ . ' नाना पदें नाना श्लोक । नाना वीर नाना कडक । ' - अमृत ११ . ' नाना पदें नाना श्लोक । नाना वीर नाना कडक । ' - दा १२ . ५ . ५ ( हिं कडका - खा - यशोगीत , युद्ध गीत ) ०भार - पु . कडका गाण्यार्या भाटांचा समुदाय . ' कडकभार निघाले । ' - वेसीस्व ६ . ५६ . ०झोंप स्त्री. गाढ झोंप ; शांत झोंप ; तब्बल झोंप . ( क्रि०घेणें ). ०बिजली स्त्री. १ कडक वीज . २ ( ल .) चलाख ; चपळ ; तडफदार ; तापट ( घोडा घोडी , स्त्री ). ३ ( ल .) त्वरेनें मारा करणारी तोफ . ०लक्ष्मी स्त्री. लक्ष्मीच्या ( देवीच्या ) उग्र स्वरूपाचें सोंग घेऊन भिक्षा मागणारा ; आसुडवाला भिक्षेकरी . ( हा . आसुडानें कडक असा आवाज काढतो म्हणुन ). ०वीज स्त्री. ( ल .) कडक . तापट ; चपळ ( मनुष्य , जनावर ). ०सावित्री स्त्री. कडक , तापट , तडफदार , चलाख स्त्री . ०हजामत स्त्री. राठ केस असल्यामुळें त्रास होणारी हजामत .
|