|
स्त्री. ( कड्यांत कड्या ; त्यापासून झालेली गुंतागुंत ). १ भाषणांतील डांवपेंच ; ( ज्यांत मुद्दापत्ता लागणार नाहीं असें ) अनिश्चितपणाचें व खाचाखोचींचें भाषण ; दुटप्पी बोलणें ; ( कडोविकडीचा असा षष्ठयंत प्रयोग रूढ आहे ). २ ( कुस्ती ) पेंच ; कौशल्य . ' मल्लविद्येच्या कडोविकडी । जीमूतीं दावितां पडेपाडीं । - मुविराट २ . ६८ . ३ युक्त्या ; खुब्या ; मसलती . ' तेबीं उत्तमोत्तम ज्ञाननिर्वडी । उद्धव कडोविकडीं शृंगारिला । ' - एभा २८ . ६९८ . - वि . उत्तम ; व्यवस्थित ; बंदोबंस्तीचें ' राखण ठेवो कडोविकडी । ' - कथा १ . २ . १७८ . - क्रिवि . १ अति जोरानें ; झपाट्यानें ; निकारानें ; नेटानें . ' शस्त्रें सुटतील गाढीं । वीर भिडतील कडोविकडी ;' - एरुस्व ७ . ७४ . - दा . २० . ८ . १९ . २ नाना प्रकारणीं रीतींनी . - एभा १५ . २५ . पुच्छ नाचवी कडोविंकडो . - रावि . २० . ४९ . ३ दुटप्पी , खुबीदार भाषणें करून ; मोठ्या युक्तीच्या बोलण्यानें . - डीचा - वि . १ कडोविकडीनें भरलेले , केलेलें ( भाषण , अर्थ कल्पना , लिहिणें , गाणें , नाचणें ; वाजविणे इ० ); अन्योक्तिव्याजोक्तिव्यंगोक्तीचा ; उपरोधिक ; औपरोधिक . ' कडोविकडीचे विचार सुचले । ' - ऐपो २१४ . २ युक्त्या ; मसलती ; डावपेंच यांनी युक्त ( क्रिया , हावभाव , वागणुक इ० ); शिताफी इ० नें भरलेलें ' कडोविकडीचीं विवरावीं । अंतःकणें ॥ ' - दा १९ . १० . १० . ३ खुबीदार ; कुशल ; चतुराईनें अंलकृत ; झील , कंप , आघात , छाया , उडणी , झोक इ० नें भरलेलें ( गाणें , नाचणें , वाजविणें ठेंवी कडोबिकडिची ठिवण हो । अक्षरीं मोत्यांची ववण । लय लाऊन करती श्रवण हो । ' - प्रला १२२ . ( कडी द्वि .)
|