Dictionaries | References

कांसोटा

   
Script: Devanagari

कांसोटा

  पु. धोतर , लुगडें यांचा पुढील सोगा किंवा टोक पाठीमागें खोंबतात तो ; काष्ठा . ( क्रि०घालणें ; मारणें ; खोंचणें ; बांधणें ; सोडणें ). ( सं . कच्छ + पट - कच्छट , कच्छुट्टिया - कच्छोटिका ; तुल . का . कच्चे ) - टेकार - वि . लंगोट्या ; लंगोटबंद ; ' कैसी कासोटेकारा भगवंता । वरीपडी जालिऐ । ' - शिशु २११ . - ट्याचा - खबरदार , बळकट - चें पाणी प्यावयाजोगा - वि . ज्याच्या हातुन व्यभिचार कदापि झाला नाही असा . ( पुरुष - स्त्री ). - ट्याचा हलका - वि . विषयीं ; जारकमीं .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP