|
( कों . नाविक . ) एक प्रकारचें जाळें . न. लोखंड , तांबें इ० ठोकण्याचा , घडण्याचा लोखंडी मोठा हातोडा . घणाचें घाईं पिटे तैसा । - विउ २ . ७ . जैसे ऐरणीवरी घण । तैसे हाणिती उसणपण । - कथा १ . १३ . ९८ . [ सं . घन = लोखंडी गदा ; प्रा . घण ] म्ह० १ हिर्याची परीक्षा घणावांचून होत नाहीं . २ घणाचे घाव मारल्यानेंहि तो फुटत नाहीं यावरून )= लोकनिंदेला , संकटांना जो जुमानीत नाहीं तोच थोर होय . [ वै . सं . घन = हन . - मसाप राजवाडे - निरुक्त भाषांतर ७८ . ] वि. १ दाट ; घट्ट ; पाण्याचा अंश , द्रवांश कमी असलेलें ) ( द्रवपदार्थ , मध इ० ) या मधापेक्षां हा मध घण आहे . सांभारें घण झालें आहे . घण ताक = दाट ताक . २ अविरल ; जोराच्या सरीचा अतिशय ( पाऊस इ० च्या ). ३ दाट विणीचा ( कपडा , कापड इ० ); घट्ट ; विणलेला . ४ किर्र ; निबिड ; गहन ( अरण्य झाडी इ० ). ५ जाड ; जाडसर ( लांकडाची फळी इ० ). ६ गर्दीचा ; दाटीचा ; खेंचाखेंच झालेला ( मनुष्यांचा जमाव , गर्दी इ० ). ७ हट्टानें मौन धारण केलेला , स्तब्ध . घन पहा . [ सं . घन ; प्रा . घण ; गु . घणो ; सिं . घणि ] ०दाट स्त्री. ( काव्य . ) गर्दी ; खेंचाखेंच ; जमाव ; समुदाय . त्या यमुनातिरीं यादवांची हो घणदाट . - वि . १ अतिशय दाट ; संकीर्ण ; गडगच्च . जैसे जे क्षेत्र पिकत । तों तों कणसें घणदाट दिसत । २ ( सामा . ) दाट ; घट्ट ( द्रवपदार्थ ); निबिड ; गहन ; गर्द ( झाडी , अरण्य ); भरगच्च ; भरींव ; ऐवजदार ( देणग्या , इनाम इ० ). जोराचा ( पाऊस ). ०करी पु. ( लोहाराच्या दुकानांतील ) घण मारणारा मनुष्य , गडी . [ घण + करणें ] ०दाट दाटी - स्त्री . ( काव्य . ) जीवश्चकंठश्च स्नेह ; दाट परिचय , मैत्री . आतांशीं त्याचें व यांचें घणदाट आहे . [ घन + दाट ] ०कोरा वि. १ घणाखालून नुक्ताच निघालेला ( रुपया , मोहोर इ० नाणें ). २ ( ल . ) अगदीं कोरा , कोराकरकरीत ; कारागिरींतून नुक्ताच बाहेर पडलेला ; [ घण + कोरा ] - णाखालचा - वि . १ घणकोरा ; टांकसाळींतून नुक्ताच बाहेर निघालेला ( रुपया , नाणें इ० ). २ कोराकरकरीत ( जिन्नस ); कारागिराच्या हातून नुक्ताच तयार झालेला ( जिन्नस , दागिना इ० ). ०सर वि. १ दाटसर ; बरेंच दाट ( ताक इ० ) २ राकट ; कणखर ( मनुष्य इ० ). जाडाभरडा ( कपडा ); भक्कम ; ऐवजदार ; मजबूत ; [ घण + सर प्रत्यय ]
|