Dictionaries | References

घरच्या भयानें घेतलें रान, वाटेवर भेटला मुसलमान, त्‍यानें कापले नाक (आणि दोन्ही) कान

   
Script: Devanagari

घरच्या भयानें घेतलें रान, वाटेवर भेटला मुसलमान, त्‍यानें कापले नाक (आणि दोन्ही) कान

   घरचा जाच होतो म्‍हणून घर सोडून बाहेर पडावे तो त्‍यापेक्षांहि खडतर दुःख भोगण्याची पाळी येणें. [एका स्‍त्रीने घरी जाच होतो म्‍हणून गृहत्‍याग करावाचा ठरविले व आपले सर्व दागदागिने घेऊन ती घर सोडून बाहेर पडली. पुढे वाटेने जातांना रात्र पडली व ती एका जंगलात येऊन पोचली. तेथे तिला एक मुसलमान भेटला, त्‍याने ती एकटी पाहून तिच्याजवळ होते नव्हते तेवढे लुबाडून घेतले व वरती तिचे नाक व कान कापून तिला रडत ओरडत टाकून निघून गेला. याप्रमाणें तिला आपल्‍या कृत्‍याबद्दल पश्र्चात्ताप करण्याची पाळी आली व ती लहानशा आपत्तीला टाळण्याकरितां मोठ्या आपत्तीत येऊन पडली].-नर्स सुंद्राबाई २०७.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP