Dictionaries | References घ घोकणें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 घोकणें A dictionary, Marathi and English | Marathi English | | To repeat frequently in order to commit to memory; to con. 2 To dwell or harp upon; to be ever mentioning. Rate this meaning Thank you! 👍 घोकणें Aryabhushan School Dictionary | Marathi English | | v t To repeat frequently in order to commit to memory. To dwell or harp upon. Rate this meaning Thank you! 👍 घोकणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स.क्रि. १ पुन : पुन : म्हणून पाठ करणें ; घोष करणें ; पाठ म्हणणें . आम्ही अहर्निशीं नाम घोकूं । - रामदास स्फुट अभंग ४७ ( नवनीत पृ . १५४ . ) गोरक्ष घोकितां सद्विद्येसी । - नव १०४० . २ ( एखाद्या गोष्टीची ) जपमाळ घेणें ; घोष लावणें ; वारंवार सांगणें , उच्चारणें . [ सं . घुष - घोषणा ; हिं . घोकना ] म्ह० ( व . ) घोकंति विद्या खोदंति पाणी = घोकल्यानें विद्या व खोदल्यानें पाणी मिळतें . ( पर्यायानें ) कोणतीहि गोष्ट श्रमानें साध्य होते . घोककाम्या - वि . अर्थाकडे लक्ष न देतां , संदर्भ लक्षांत न घेतां घोकंपट्टी करणारा ( विद्यार्थी ); दुसर्याच्या सांगण्याचा हेतु , मर्म लक्षांत न घेतां सांगण्याप्रमाणें अक्षरश : चालणारा . [ घोकणें + काम ] घोकणी - स्त्री . १ ( एखादी गोष्ट लक्ष्यांत रहावी म्हणून ) पुन : पुन : घोकण्याची क्रिया ; आवृत्ति . ( क्रि० करणें ; घेणें ). अजुनि तरि करि ही घोकणी । - राला ८८ . शको . ३ . २४ . २ त्याच त्याच गोष्टीचा पुन : पुन : उच्चार , निदिध्यास ; एकच गोष्ट धरून बसणें ; आपली इच्छा , हेतु पुन्हां पुन्हां सांगणें . ( क्रि० घेणें ; लावणें ; करणें ; लागणें ; मांडणें ; धरणें ). सुख असल्यावर दिनासारिखे कां भौति फिरते । घोकण्या करिते । - सला २० . त्या मुलानें आईची घोकणी घेतली आहे . [ घोकणें ] घोकंपट्टी - स्त्री . घोकण्याची क्रिया ; घोकणी अर्थ १ पहा . ( क्रि० करणें ). दुसर्या इयत्तेंत फळयावरील शब्द मुलांनी आपल्या वहींत उतरून घेऊं नयेत , कारण या योगानें घोकंपट्टी करण्याची संवय मुलांना लागते . - अध्यापन ७४ . [ घोकणें + पट्टी ] घोकीव - वि . १ पाठ केलेला ; घोकलेला ( धडा इ० ). याचें घोकीव पांडित्य आहे . २ स्मरणांत , ध्यानांत पक्का ठेवलेला ; मनांत पक्का ठसलेला . घोकीव , घोक्या - वि . १ समजूत न घेतां , ध्यानांत न ठेवतां निव्वळ घोकंपट्टी करणारा ; मंद ( विद्यार्थी ). २ पोपटपंची करणारा ; घोकूनच फक्त ध्यानांत ठेवणारा ; ( क्क . ) कोणत्या वेळीं काय बोलावयाचें हें पढविलेला ; लांच घेऊन बनावट साक्ष देणारा ( साक्षीदार इ० ). [ घोकणें ] घोक्या - वि . घोकणारा ; घोकंपट्टीनें अभ्यास करणारा ; घोककाम्या अर्थ १ पहा . [ घोकणें ] Rate this meaning Thank you! 👍 घोकणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | घोकंति विद्या, खोदंत पाणी घोकल्याशिवाय विद्या येत नाही (पाठ होत नाही-पूर्वी सर्व विद्या पाठ करून शिकत असत) व खोदल्याशिवाय पाणी लागत नाही. श्रम केल्याशिवाय फळ मिळत नाही. Related Words घोकणें नचा पाढा घोकणें गोखणें आवर्तणें गुंडिका रटणें घोकींव घोटया आंकडकडवें आंकणकडवें उद्घोष घांसणें घासणें घट घोष अभ्यास न હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP