Dictionaries | References

घोळणें

   
Script: Devanagari
See also:  घोळ घोळून , घोळविणें

घोळणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
ghōḷaṇēṃ n A stick with a cloth at the end. Used to stir about grain whilst parching it. See घाटू.
Changingly; by turns; in regular succession; one after another. Ex. नित्य एकच ब्राह्मणास दान देतोस हें काय घोळून घोळून सांगावें म्हणजे सर्वास पोंचेल; पागोटीं घोळून घोळून घातलीं म्हणजे सर्व सारखीं मळतात. 2 Shaking, pulling, pushing &c. backwards and forwards, that way and this: bandying, debating, worrying, sifting &c. See in general the senses above, understanding them as enhanced by this reduplication.

घोळणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   To shake about; to agitate briskly. To pull and push violently. To shuffle (cards). To argue, discuss. To tease, annoy, harass. To question closely and sternly, to cross-examine. Ex. To use; to bring under wear and tear.

घोळणें     

 न. घाटणा ; घाटाणा ; घाटू ; घोळणा अर्थ १ पहा . [ प्रा . घोल ]
उ.क्रि.  १ ( धान्य इ . सुपांत घालून हलके , बारीक , जड मोठे इ० दाणे निराळे करण्याकरितां ) इकडे तिकडे हलविणें ; हिंदळणें ; पाखडणें . २ ( दोन किंवा अधिक पदार्थांचें ) मिश्रण होण्याकरितां ताट , परात ; सूप इ० कांत घालून हलविणें ; खुंदळणें ; ढवळणें ; माखणें ; लेपणें . ऐक्यें घोळिली बुध्दि कैसी । मानु श्रोत्यांसी वाढविला । - एभा ९ . ४६३ . लाडवांच्या कळया पाकांत घोळून लाडू बांधावे . ३ जोरानें ओढणें व ढकलणें ; खुदळणें ; अपाय होईल अशा तर्‍हेनें ओढाताण , हिसकाहिसक करणें ; घोळसावणें . त्या मल्लानें दुसर्‍या गडयास एक तासभर घोळविलें . ४ ( गंजिफांचा खेळ ) गंजिफांची , पत्त्यांची गलत करणें ; पिसणें . ५ ( एखादी गोष्ट ) चिंतनाचा , वादाचा , चर्चेचा विषय करणें ; वाटाघाट करणें ; वादविवाद करणें ; विचार करणें ; ( एखादी गोष्ट ) पुन : पुन : मनांत आणून मनन करणें , घाटणें ; निमुटपणें वर पाहूं लागली म्हणजे असें वाटे कीं कांहीं तरी तिच्या मनांत घोळत आहे . - पाव्ह १८ . त्याच्या मनांत सर्वदा शास्त्र घोळत असतें . ६ त्रास देणें ; छळणें ; जेरीस आणणें ; सतावणें ; जांचणें ; कष्टविणें . यालागीं दुकाळा करितों मनन । आम्हाहि घोळिला बहुता परीनें । - मोद्रोण ३ . ८५ . त्या श्लोकानें मला चार घटका घोळलें तेव्हां त्याचा अर्थ लागला . घोडयानें मला दिवसभर घोळलें तेव्हां सांपडला . त्याला दुखण्यानें दोन महिने घोळलें . ७ ( सुतार - सोनारकाम ) तासून , घासून , घोटून , गुळगुळीत करणें . कुर्‍हाडीचा दांडा अमळसा घोळ , मग चांगला बसेल . ८ खोदून खोदून विचारणें ; उलट सुलट प्रश्न विचारणें ; चोरास जेव्हां घोळघोळून घेतलें तेव्हां कबूल झाला . ९ ( एखाद्या कामांत ) सरावणें ; वहिवाटणें ; राबत्यास पडणें . त्या कामांत मी नवशिका नाहीं , दोन वर्षे घोळलेला आहें . हा घोडा दोन चार दिवस घोळला म्हणजे बसावयास येईल . १० ( एखाद्या गोष्टीशीं , गोष्टीचा ) नेहमीं प्रसंग पडणें ; ( एखादि वस्तु उदा० रुपये , दागिने इ० ) हातांत खेळवणें ; इकडून तिकडे देणें , इकडून तिकडे ठेवणें . हातीं रुपये घोळवण्याजोगा प्रामाणिक माणूस कामावर ठेवावा . ११ चोळामोळा करणें ; वापरणें ; वरदळींत , वापरण्यांत येणें , आणणें . हा आंगरखा खडखडीत लागतो पण दोन दिवस घोळला म्हणजे मऊ होईल . १२ चाळविणें ; छकविणें ; भुलविणें . घातकी न देखो तैसा दुसरा । घोळितो नृपाला पेचुनी । - दावि ४५७ . [ सं . घुण - घूर्ण ; प्रा . घोल = घुमविणें ; हिं . घोलना ] घोळघोलून , घोळून घोळून - क्रिवि . १ आलटून पालटून ; बदल करून ; आळीपाळीनें ; एकामागून एक . ( क्रि० करणें , खाणें , घेणें , देणें ). नित्य एकाच ब्राह्मणास दान देतोस , हें काय ? घोळून घोळून सांगावे . २ वारंवार , पुन : पुन : घोळण्याची क्रिया करून ; पुन : पुन : इकडून तिकडे हलवून , ढकलून , घोळसून , चर्चा करून , मनांत आणून , उच्चारून , घोळणें याच्या त्या त्या अर्थी द्विरुक्तिनें क्रिया करून . हा मंत्र लोकांच्या तोंडीं आपोआप येतो व तोच घोळघोळून पाठ होऊन जातो . - सासं २ . ४०१ . [ घोळणें द्वि . ] घोळीव - वि . १ घोळलेला . घोळणें पहा . २ गुळगुळीत केलेला . सर्वांगानें गोल असा घोंळीव हिरा कोणी गिळल्यास त्यापासून इजा होत नाहीं - पदाव १ . ७० . ३ ( व . ) गाळीव ; निवडक . [ घोळणें ] घोळन - क्रिवि . ( गो . ) एक दिलानें ; श्रमविभागानें . घोळविणें , घोळवणें - सक्रि . घोळणें पहा . भूदेव पदरजांत स्वजनाकरवींहि देह घोळविले । - मोसभा २ . ४४ . [ घोळणें प्रयोजक ]

घोळणें     

१. आलटून पालटून
आळीपाळीने. २. वारंवार
पुन्हां पुन्हां.

Related Words

घोळणें   अटारन्या घोळणें   गोंडा घोळणें   लोळणें घोळणें   घोलमडणें   घोळटीक   घोळटीकाय   घोलावणें   घोळमाडणें   घोळाना   घोळींव   खलबता   वैंचणें   वैचणें   घोळसणें   घोळसावणें   खलबत्ता   होळणी   रुंजी घालणें   घोळण   चघळणें   घोळविणें   घोळाणा   आलोडणें   आलोढणें   आंकडकडवें   आंकणकडवें   गुळणी   घोळणा   बासट   बासूट   विवंचणें   घोळ   गुळणा   घाटणें   आवृत्ति   आवर्त   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   ૦૦૦   ୦୦୦   00000   ০০০০০   0000000   00000000000   00000000000000000   000 பில்லியன்   000 மனித ஆண்டுகள்   1                  1/16 ರೂಪಾಯಿ   1/20   1/3   ૧।।   10   १०   ১০   ੧੦   ૧૦   ୧୦   ൧൦   100   ۱٠٠   १००   ১০০   ੧੦੦   ૧૦૦   ୧୦୦   1000   १०००   ১০০০   ੧੦੦੦   ૧૦૦૦   ୧୦୦୦   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP