|
स्त्री. चौदा विद्या . चौदाजणींची ठेव । नचले स्वरूप वर्णावया । - ह ३ . ३ . - वि . १४ संख्या ; दहा आणि चार . [ सं . चतुर्दश ; प्रा . चउद्दाह ; हिं . चौदह ; बं . चौद्द ; उ . गु . चौद ; पं . चौदा ] सामाशब्द - ०इंद्र पु. ब्रह्मदेवाच्या एका दिवसाच्या कालांत जसे पृथ्वीवर एकामागून एक चौदा इंद्र त्या कालांत राज्य करून जातात . म्ह० - चौदा इंद्र झाले तरी इंद्राणी एकच ( सभोंवतें अनेक फेरफार होत असतांना देखील जी एकच व्यक्ति , वस्तु , संस्था , विधि , चाल इ० टिकून राहते तिचें वर्णन करतांना या म्हणीचा उपयोग करतात ). गोत्रें - नअव . ( कोंकणस्थ ब्राह्मणांचीं ) अत्रि , कपि , काश्यप , कौंडिण्य , कौशिक , गार्ग्य , जामदग्न्य , नित्युंदन , बाभ्रव्य , भारद्वाज , वत्स , वासिष्ठ , विष्णुवृध्द व शांडिल्य . ०चौकडया वि. चौदा चौकडयांचें राज्य असणारा . चौदा चौकडिया लंकापति । त्याची कोण झाली गति । - तुगा ०चौकडयांचें न. कृत , त्रेता . द्वापार व कलि हीं चार युगें मिळून एक चौकडी होते . अशा चौदा चौकडया होईपर्यंत केलेलें राज्य ; अतिशय दीर्घकाल केलेलें राज्य ; रावणाचें राज्य . सर्व देवांना बंदींत टाकणारा व चौदा चौकडया राज्य करणारा रावण स्वत : च्या प्रतापासंबंधाच्या ... ... चुकीच्या कल्पनेला बळी पडला . - कीचकवध . राज्य न. कृत , त्रेता . द्वापार व कलि हीं चार युगें मिळून एक चौकडी होते . अशा चौदा चौकडया होईपर्यंत केलेलें राज्य ; अतिशय दीर्घकाल केलेलें राज्य ; रावणाचें राज्य . सर्व देवांना बंदींत टाकणारा व चौदा चौकडया राज्य करणारा रावण स्वत : च्या प्रतापासंबंधाच्या ... ... चुकीच्या कल्पनेला बळी पडला . - कीचकवध . ०तंतुवाद्यें वीणा , बीन , रुद्रवीणा , एकतारी , सारंगी , सतार , सारमंडळ , तुंबरी ( तंबुरी ), सरोद , कोंका , रखब , मदनमंडळ , ताउस व तुणतुणें . ०ताल ताळ - वि . चौदा मजले उंच ; फार उंच ; गगनभेदी . [ चौदा + ताल ] ०नारू पु. चौदा अलुते - अलुतेदार पहा . [ चौदा + नारु = अलुतेदार ] ०ब्रह्में नअव . शब्द , मीतिकाक्षर , खं , सर्व , चैतन्य , सत्ता , साक्ष , सगुण , निर्गुण , वाच्य , अनुभव , आनंद , तदाकार व अनुर्वाच्य ब्रह्म . - दा ७ . ३ . ५ ते ९ . ०भवनें भुवनें - नअव . चौदा लोक , सप्तस्वर्ग आणि सप्तपाताळ मिळून चौदा लोक . भू :, भुवर , स्वर , महर , जन , तप , सत्य हे सात लोक आणि अतल , वितल , सुतल , महातल , रसातल , तलातल व पाताल हे सात पाताल लोक मिळून चौदा लोक . ०मनु सात सातांचे दोन वर्ग . ( १ ) स्वायंभुव , स्वारोचिष , औत्तमी , तामस , रैवत , चाक्षुष , वैवस्वत . ( २ ) सावर्णि मनु :- सावर्णि , दक्ष , ब्रह्म , धर्म , रुद्र , देव व इंद्रसावर्णि . ०रत्नें नअव . देव आणि दानव यांनीं समुद्रमंथन करून चौदा मूल्यवान वस्तू काढिल्या त्या ; लक्ष्मी , कौस्तुभ , पारिजातक , सुरा , धन्वंतरी , चंद्र , कामधेनु , ऐरावत , रंभा ( आदिअप्सरा ). उच्चै : श्रवा नामक सप्तमुखी घोडा , कालकूट विष , धनुष्य ( शार्ङ ), पांचजन्य शंख , अमृत . ०लोक पुअव . चौदा भवनें पहा . तेतिस कोटि देव सकळ । चौदा लोक सुवर्णाचळ । वेष्टित राहिले । - दा ४ . १० . १४ . ०विद्या स्त्रीअव . ऋक , यजुस , साम , अथर्व हे चार वेद व शिक्षा , छंद , व्याकरण , निरुक्त , ज्योतिष , कल्प हीं सहा वेदांगें व न्याय , मीमांसा , पुराणें , धर्मशास्त्र मिळून चौदा विद्या . चौदा विद्या ज्यांचे हातीं । - भूपाळी गणपतिची पृ . ३ . चौदावें रत्न - न . १ ( चुकीनें ) चाबूक . २ ( ल . ) खरपूस मार ( चौदा रत्नें वर्णन करणार्या लक्ष्मी : कौस्तुभ पारिजातक . श्लोकांतील शंखोऽमृतं चांबुधे : या तिसर्या पादाच्या शेवटीं चांबुधे ; बद्दल चुकीनें चाबूक असें वाचल्यानें चादावें रत्न म्हणजे चाबूक असा अर्थ ; किंवा चौदावें रत्न ( अमृत ) निघाल्यावर दैत्यांना बसलेल्या मारावरून शिक्षा . ) आम्ही इतके धीट आहों कीं चवदावें रत्न आमच्या दृष्टीस पडलें कीं पुरे , आम्ही आपले पाय लावून पळत सुटलोंच . - आगरकर . २ भाबडया माणसाची केलेली खोडी , फसवणूक . चौदावेंरत्न दाखविणें - चाबकानें मारणें , खरपूस समाचार घेणें .
|