Dictionaries | References

चौदा चौकड्यांचे राज्‍य

   
Script: Devanagari

चौदा चौकड्यांचे राज्‍य

   कृत, त्रेत, द्वापरकलि या चार युगांची एक चौकडी, प्रत्‍येक मन्वंतरांत एक चौकडी होते. अशा चौदा चौकड्या होईपर्यंत टिकणारे राज्‍य. अतिशय दीर्घ काळचे राज्‍य. रावणाचे असे होते म्‍हणतात. ‘चौदा चौकडीचा लंकापति। त्‍याची कोण झाली गति।।’ -तुकाराम. ‘आणि मी जुगारांचा सम्राट म्‍हणून चौदा चौकड्यांचे माझें राज्‍य.’ -द्रौपदी. ‘तुमच्या चौदा चौकड्यांच्या राज्‍यांत रौरवाची राणी होण्यापेक्षां दुर्देवाची दासी होऊन दुःखांत दिवस कंठीत, मी या पायांजवळ अशी अष्‍टौप्रहर बसून राहीन.’ -एकच प्याला ३.४.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP