Dictionaries | References

झपाटणें

   
Script: Devanagari

झपाटणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . 2 To devour, gulp, gobble up, swallow eagerly. 3 To attack--a भूत or goblin or demon. It is a low, but a current and an expressive word.

झपाटणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v i   To despatch or strike off; to accomplish smartly. To swallow eagerly. To attack-a भूत or goblin or demon.

झपाटणें

 स.क्रि.  १ ( एखादी गोष्ट , काम ) त्वरेनें तडकाफडकीं करून टाकणें , उरकणें , जलद संपादणें . २ गट्ट करणें ; बकांबकां खाणें ; खाऊन फस्त करणें . ३ ( भूत , पिशाच इ० कांनीं ) पछाडणें . [ घ्व . झप + सं . पाटन = मोडणें , तोडणें ; हिं . झपाटना ] झपाटा - पु . १ सपाटा ; जोर ; वेग ; तडाखा . आदेश ; घाई ( यांत कौशल्याचा अंतर्भाव होतो ). उदा० चालण्याचा - लिहिण्याचा - खाण्याचा - झपाटा . २ ( शस्त्र , पदर , इ० कानीं लागणारा ) जोराचा तडाखा , घाव , फटका . ३ जोर ; आवेग ; तीव्रता ; उदा० तापाचा - वार्‍याचा - उन्हाचा - जरीमरीचा - सांथींचा - झपाटा . ४ पछाडणूक ; झडपणी ; उदा० भुताचा - पिशाच्चाचा झपाटा . ५ ( पशु , पक्षी इ० कांनीं भक्ष्यावर घातलेली ) झडप ; झपेट . ६ अतिशयितता ; अधिक्य . उदा० हाताचा - बोलण्याचा - चालण्याचा - खाण्याचा - झपाटा . ७ फटकारा ; झटक . उदा० पदराचा झपाटा . ८ किरकोळ लढाईअ ; चकमक . [ घ्व . झप . म . झपाटणें ; ] ( वाप्र . ) एका झपाटयानें - क्रिवि . एका झटक्यांत , दमांत , तडाक्यांत . एखाद्याच्या झपाटयांत सांपडणें - कचाटींत , तावडीत सांपडणें . झपाटयासरसा - क्रिवि . झटक्यासरशीं ; झटक्यांत . झपाटया - वि . चपळाईनें काम करणारा ; कामाचा उरक असलेला ; झपाटा पहा . [ झपाटा ] झपाटयाचा वारा - पु . ताशीं वीस किंवा त्याहून अधिक वेगाचा वारा . - मराठी ६ वें पुस्तक , पृ . ३०१ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP