Dictionaries | References

झिपरी

   
Script: Devanagari
See also:  झिंपरी

झिपरी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : झिंजी

झिपरी     

 स्त्री. १ झिंजी व झिपटी पहा . माथां पिंगट झिंपर्‍या , मुखबिळीं विक्राळ दंतावळी । - आपू ४२ . २ ( ल . ) अजागळ , गबाळ , गोबरी पण व्याभिचारी स्ती ; माभळभटीण ; नेभळभटीण स्त्री . म्ह० चट्टीपट्टीचे बोभाटे झिपरी मारी झपाटे = छानछोकीनें राहणारी स्त्री व्यभिचारी नसतांहि तिच्या संबंधीं लोक बोभाटा करतात . परंतु एखादी माभळभटीण व्यभिचारणी असूनहि समाजाचें तिकडे लक्ष्य जात नाहीं .
०धरणें   केंस ओढणें ; अवहेलना करणें ; प्रत्यक्ष शिक्षा करण्यास उद्युक्त होणें . नेणो केव्हां धरूनि झिपरी देव घेईल झाडे । - आठल्ये झिपरा , झिंपरा , झिपर्‍या , झिंपर्‍या - वि . ज्याचे केस लांब असून फिंदारलेले आहेत असा . सर्कशींत काम करणार्‍या झिपर्‍या पोरीसारखी उडी मारून ... - नाकु ३ . १२ . [ झिपरी ] झिंपा खेळ , झिंपापाणी खेळ - पु . एक प्रकारचा मुलींचा खेळ ; यांत दोन्ही पक्षांकडील गडी एकमेकांवर पाणी फेंकतात . झिंपा गे झिंपा रामचरण झिंपा । विषायाचे गोडी वायां नको करूं खेपा । - ब ५९२ . [ घ्व . झिप ; सं . क्षिप = शिंपणें . शिंपणें ]

झिपरी     

झिपरी धरणें
एखाद्या स्‍त्रीचे केस धरून तीस ओढले असतां जा तिचा उपमर्द होतो, त्‍याप्रमाणें अवहेलना करणें
अपमान करणें
मानभंग करणें. ‘नेणो केव्हां धरूनि झिपरी देव घेईल झाडे।’ -आठल्‍ये.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP