|
स्त्री. अफरातफर . दागिने यांची तजावजा होईल त्याची खबर्दारी वरचेवर करीत जाणे . - वाड मा . १ . ११५ - क्रिवि . १ इतस्ततः विखुरलेल्या , अस्ताव्यस्त , विस्कळीत स्थितीत ; पांगापांग झालेल्या अवस्थेत ( माणसे , बेत , वस्तु इ० ); परागंदा . मिरजेतील थोर थोर मंडळी कांही तजावजा जाली अशा प्रकारच्या अवया ऐकतो . - ख १० . ५३३७ . २ गर्भगळित , घाबरलेल्या , गडबडलेल्या , भयचकित अशा अवस्थेत ( माणसे इ० ). पुण्यात लोक बहुत तजावजा जाहले आहेत . - ख १० . ५३४१ . पेंढारी दहा कोसांवर आले असे ऐकताच लोक तजावजा झाले .
|