Dictionaries | References त तुणतुणे Script: Devanagari See also: तुणतुने Meaning Related Words तुणतुणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun गोंधळी लोकांचे एकतारी वाद्य Ex. तुणतुणे काडीने वाजवतात SYNONYM:चवंडके चौंडकेnoun एक वाद्य Ex. तुणतुण्यातून तुणतुण असा आवाज येतो. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benসারঙ্গী gujતુનતુની hinतुनतुनी kasترُٛم ترُٛم kokतुणटुणें malതുന്തുനി oriତୁନତୁନୀ panਤੁਨਤੁਨੀ sanतुनतुनी urdتُنتُنی , دوتارا तुणतुणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. एक पक्षी . [ ध्व . ] म्ह ० मोर नाचे म्हणून तुणतुणे नाचे . ( मोठ्याचे अनुकरण लहानास उपहासास्पद होते यावरुन ). तुणतुणे - ने - न . गोंधळी लोकांचे एकतारी वाद्य . हे काडीने वाजवितात . यांतून साथीस उपयोगी असा तुणतुण आवाज निघतो . [ सं . तूणा ; प्रा . तुणय ; ध्व . ] ( वाप्र . )०वाजविणे लावणे ( ल . ) ऐकणारांना कंटाळा आला तरी पुन्हां पुन्हां आपलीच हकीगत सांगत सुटणे ; आपलीच गोष्ट पुन्हां पुन्हां काढणे ; स्वतःचे मत प्रतिपादणे . देशांत किती जोराने विचारक्रांति होत आहे याची या लोकांस दादच नाही , आपले प्रायश्चित्ताचे तुणतुणे ते अद्याप वाजवीतच आहेत . तुणतुण्या वि . १ तुणतुणे वाजविणारा ( गोंधळी इ० च्या मागे ). २ ( ल . ) दुसर्याची री ओढणारा ; बोलल्या गोष्टीचा मागून अनुवाद करणारा . [ तुणतुणे ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP