|
न. १ दरवाजा ; ( घर इ० कांमध्ये ) प्रवेश करण्याचा रस्ता , वाट , मार्ग , द्वार ( अक्षरशः व ल . ) २ निघण्याची , बाहेर जाण्याची वाट ; दारे ; निकाल . ३ साधन ; रीत . [ सं . द्वार ; प्रा . दुवार , दुआर ; बं . दोयार ; हिं . दुआर ; झें . द्वर ; ग्री . थुर ; लॅ . फोरस ; गॉ . दौर ; भाज . तोर ; स्लॅ . द्वेरी ; लिथु . दूर्यस ; हिं . दोर - स ; इं . डोअर ] ( वाप्र . ) दारचा - वि . घरापुढे , परसांत लावून वाढविलेला ( भाजीपाला , फळे इ० ); घरचा . दारचे अळूं - न . परसूं , बाग इ० कांत मुद्दाम लागवड केलेले अळूं . पांढरे अळूं ; काळे अळूं कासाळूं ; दडगे अळूं , खाजाळूं इ० दुसरे अळवाचे प्रकार आहेत . दाराकडे जाणे - ( ना . बायकी ) मोरीवर जाणे . दारांत हत्ती झुलत असणे - एखाद्याची वैभवसंपन्न स्थिति असणे ; गजांत लक्ष्मी असणे . दारी जाणे - बसणे - लागणे - ( बायकी ) शौचास , परसाकडे जाणे इ० . दारी जाणे - दुखवटा घेऊन जाणे ; मृत मनुष्याच्या आप्तांचा समाचार घेण्यास जाणे . सामाशब्द - न. कवाड ; दरवाजा बंद करण्याकरितां किंवा लावण्याकरितां केलेलें फळी , कांबट्या , तट्टा वगैरेंचें झडप . ( सं . द्वार ) वि. ऐपतदार ; श्रीमंत . याच्या उलट नादार ; गरीब . [ फा . दार ] शांतताद्वार . ( एखादी वस्तु ) धारण करणारा , बाळगणारा , नेणारा इ० अर्थाचा फारशी भाषेंतील प्रत्यय . सामान्यतः हिंदी भाषेतून मराठीत आलेल्या शब्दास हा प्रत्यय जोडून सामासिक शब्द बनतात . जसेः - जमादार , फौजदार , चोबदार , भालदार , चौकीदार , रंगदार , गोलदार , अणीदार , जोरदार इ० . [ फा . दार ] पु. भार्या ; पत्नी ; बायको ; दारा . [ सं . ] गृह ; घर . - मुधो . ( अर .) ०ग्रहण न. विवाह ; लग्न . ०नादार वि. ऐपतदार - गैर ऐपतदार ; श्रीमंत - गरीब . याकरितां दार - नादार पाहून घेणे ते घ्यावे . - पया ५७ . [ दार + नादार = गरीब ] ०कस स्त्रीन . दाराच्या चौकटीची बाही , कुसूं . [ दार + कूस ] ०बाकी स्त्री. ऐपतदाराकडील शिल्लक येणे . त्यापैकी दारबाकी असेल ते रुजू करुन सरकारांत देतील . - समारो १ . २७२ . ०कसा स्त्री. भाद्रपद महिन्यांत गौरीप्रीत्यर्थ दाराच्या बाजूंवर काढतात त्या आकृतींपैकी प्रत्येक . ०परिग्रह पु. विवाह ; लग्न . ०कारु पु. द्वारपाळ ; द्वाररक्षक ; दौवारिक . मंत्री , पुरोहित , सेनापति , युवराजा , दारकारु ...... - पंच ३ . ७ . ०कुसूं न. दाराचे कुसूं . ०कोंड पु. १ आपले पैसे द्यावे म्हणून धनकोने ऋणकोस , त्याच्या कुटुंबीयांस दाराबाहेर व्यवहार , दळणवळण करण्याबाबत केलेली आडकाठी , प्रतिबंध . २ ( व ) कुचंबणा ; कोंडमारा . [ दार + कोंडणे ] ०कोंडी स्त्री. ( महानु . ) दारलावणी ; अडथळा ; आडकाठी . भूगोळकाचा मढी । केविं कीजे दारकोंडी । - भाए ५९५ . [ दार + कोंडणे ] ०खंडे न. मिठागर इ० च्या बांधावर ठेवलेले द्वार ; मार्ग . [ दार + खंड ] - ढवळणे न . ( कों . ) लग्नसमारंभात नवरानवरी घरांत शिरतांना स्त्रिया त्यांना थांबवितात व गाणे गातात तो प्रकार . ०धरणे णी नस्त्री . लग्नविधींतील नवर्या मुलाच्या बहिणीने करावयाचा एक शिष्टाचार . ह्याला अनुसरुन वर लग्नास निघतेवेळी , त्याची बहीण दारांत उभी राहून त्याजजवळ तुला होईल ती मुलगी माझ्या मुलास दिली पाहिजे असे मागणे मागते . [ दार + धरणे ] ०फळणी फळी स्त्री . १ ( अक्षरशः ) घरांत कोणी रहावयास न उरल्याने घर बंद करण्याची क्रिया ; दाराला कुलूप लागणे ; घर ओसाड पडणे . ( ल . ) २ दिवाळे वाजणे ; सत्यानाश , निर्वंश होणे . मागच्या दुष्काळांत कित्येकांच्या दारफळ्या झाल्या . [ दार + फाळणी बंद करणे ] ०बंद पु. ( ना . ) दरवाजावरील मातीचा गलथा , पुढे आलेला भाग . ०भाजी स्त्री. माठ ही पालेभाजी . ०बि दार क्रिवि . दारोदार . [ हिं . ] ०वंट पु. उंबरठा ; वेस . ०वटा ठा वंठा , दारिंवठा पु . १ उंबरठा ; उंबरठ्याजवळची , उंबरठ्याखालची जमीन . राहुनि दारिवठ्य़ांत हांका मारी दुरोनि राजाला । - श्रियाळ चरित्र . २ दारावरचा माथा ; कपाळपट्टी . ३ किल्ला ; गांव इ० कांचा दरवाजा , वेस . की मोक्षगडाचा दारवटा । उघडला तो । - ऋ ५९ . तैसा दारवठा उघडीला । सैन्यसमुद्रु लोटला । - उषा ११२४ . म्ह ० सोन्याचे दारवठे होतील आणि कपाळास लागतील . ०वठाकार वठेकार वठेकरु - वि . १ द्वारपाल ; द्वाररक्षक . आपण जाल दारवठेकारु । - उषा ८६२ . दारवठाकारे दार प्रतिषेधिले । - पंच १ . २६ . २ ( ल . ) उंबरठे झिजविणारा ; ( एखाद्याच्या घरी ) खेपा घालणारा . - शर ०वंड पु. ( महानु . ) दरवाजा . सोलौनि कीजेति दारवंड त्रिशाक । - शिशु ७६५ . [ दार + वंड = प्रत्यय ] ०वालॉ वि. ( गो . ) देवडीवाला ; द्वारपाल . [ सं . द्वारपाल ; प्रा . दारवाल ] ०वोटा वरात . - स्त्रीगीत ६० . ०शीक न. ( राजा . ) पदार्थ इ० ठेवण्याकरितां दाराच्या चौकटीवर बसविलेली फळी ; उतरला . ०शीग स्त्री. ( कु . ) दिवा ठेवतां यावा म्हणून दारकसास ठोकलेली खुंटी , खिळा इ० . ०संका ( महानु ) दरवाजाची कड , बाजू . सर्वज्ञ दोन्ही दारसंका दोन्ही श्रीकरी धरुनि एकु श्रीचरण वक्षेस्थळावरि ठेविति । - पूजावसर . [ द्वार + शाखा ]
|