|
पु. १ अडकवून , निरोधून ठेवण्याची , टिकविण्याची शक्ति ; ( शब्दशः व लक्षणेने ). चिकटून राहण्याची , धारण करण्याची , जडण्याची शक्ति . वायुमुळे हाताचा धर गेला . त्या आंब्याला धर नाही मोहोर येतांच पडतो . चुना जुना झाला म्हणजे त्याचा धर नाहीसा होतो . त्याचे बुद्धीला धर नाही एक श्लोक दहा वेळा सांगितला पाहिजे . २ तोलून धरण्याची , आधारण्याची , वर सहन करण्याची शक्ति ( पायांची , पायांतील वस्तूंची ); आधार . कड्यावर बांधकाम केल्यावर चांगला धर लागेपर्यंत कड्याखालची जमीन उकरुन खाली उतरावे लागते . - मॅरेट १७ . या विहिरीला धर चांगला आहे . ३ खळ ; तहकूब करण्याची , दाबून धरण्याची शक्ति ( प्राण्यांचे व्यापार , मलमूत्रविसर्जन इ० ); संयमनशक्ति . ४ कष्ट मानसिक त्रास सोसण्याची शक्ति ; तग ; टिकाव . ५ ( बोलण्यांत , वागण्यांत , विचारांत एकवाक्यता ; सुसंगति ; व्यवस्थितपणा ; मेळ . त्याचे भाषणास धर नाही , आतां एक बोलेल मग एक बोलेल . ६ धीर . ( क्रि० तुटणे ). धर सर्वांचाहि जेधवां तुटला । - मोगदा १ . २ . ७ जम ; घडी ; बस्तान . इकडे अद्यापि पक्का धर बसला असे त्यास वाटत नाही . - सूर्यग्न ८ पर्वत . जो धैर्य धरसा , सहस्त्रकरसा तेजे तमा दूरसा । - र ४ . ९ ( समासांत )) धारणकरणारा ; ठेवणारा ; पाळणारा . उदा० जल - चक्र - गंगा - धर इ० [ सं . धृ ] पु. ( महानु .) आधार ; आश्रय ; टेका ; खांब . ' अडल्यासी घर .'; ' धर्मी धर दीजे .' - सिसू . ( सं . धृ = धारण करणें ) पु. कांठ . ' राजणगांवीं एक शेतांतील विहिरीचें धरावर एक वाघ बसला होता .' - के २४ . ९ . ३५ . ( सं . धृ .) पु. १ अडकवून , निरोधून ठेवण्याची , टिकविण्याची शक्ति ; ( शब्दशः व लक्षणेने ). चिकटून राहण्याची , धारण करण्याची , जडण्याची शक्ति . वायुमुळे हाताचा धर गेला . त्या आंब्याला धर नाही मोहोर येतांच पडतो . चुना जुना झाला म्हणजे त्याचा धर नाहीसा होतो . त्याचे बुद्धीला धर नाही एक श्लोक दहा वेळा सांगितला पाहिजे . २ तोलून धरण्याची , आधारण्याची , वर सहन करण्याची शक्ति ( पायांची , पायांतील वस्तूंची ); आधार . कड्यावर बांधकाम केल्यावर चांगला धर लागेपर्यंत कड्याखालची जमीन उकरुन खाली उतरावे लागते . - मॅरेट १७ . या विहिरीला धर चांगला आहे . ३ खळ ; तहकूब करण्याची , दाबून धरण्याची शक्ति ( प्राण्यांचे व्यापार , मलमूत्रविसर्जन इ० ); संयमनशक्ति . ४ कष्ट मानसिक त्रास सोसण्याची शक्ति ; तग ; टिकाव . ५ ( बोलण्यांत , वागण्यांत , विचारांत एकवाक्यता ; सुसंगति ; व्यवस्थितपणा ; मेळ . त्याचे भाषणास धर नाही , आतां एक बोलेल मग एक बोलेल . ६ धीर . ( क्रि० तुटणे ). धर सर्वांचाहि जेधवां तुटला । - मोगदा १ . २ . ७ जम ; घडी ; बस्तान . इकडे अद्यापि पक्का धर बसला असे त्यास वाटत नाही . - सूर्यग्न ८ पर्वत . जो धैर्य धरसा , सहस्त्रकरसा तेजे तमा दूरसा । - र ४ . ९ ( समासांत )) धारणकरणारा ; ठेवणारा ; पाळणारा . उदा० जल - चक्र - गंगा - धर इ० [ सं . धृ ] ०लाहणे टिकाव धरणे ; तुलनेस येणे . मेणिका तारा उर्वशी । वोळी धर न लहाती कव्हणी दीसी । - शिशु ३३१ . ०लाहणे टिकाव धरणे ; तुलनेस येणे . मेणिका तारा उर्वशी । वोळी धर न लहाती कव्हणी दीसी । - शिशु ३३१ . ०सुटणे धैर्य नाहीसे होणे . शहाजणे केली परंतु लश्करचा धर सुटला . - भाब ८८ . ०सुटणे धैर्य नाहीसे होणे . शहाजणे केली परंतु लश्करचा धर सुटला . - भाब ८८ .
|