पुस्त्री . ( सांकेतिक ) ( नंदभाषा . ) ( व्यापारांत , दुकानदारांत रुढ ).
- दलाल . - शर .
- दलालास द्यावयाचे वेतन ; दलाली . )
०थाकणे ठेवणे गुप्तपणे दलाली मिळविणे .
०भाषा स्त्री. बाजारांत ( दलालाच्या ) नोकरांना , गिर्हाईकांना समजू नये म्हणून
व्यापारी लोक एक सांकेतिक भाषा उपयोगांत आणतात , तिला नंदभाषा असे म्हणतात
. या भाषेतील सांकेतिक संख्यावाचक शब्दांचे अर्थ पुढे दिल्याप्रमाणे आहेत
.
- केवली = एक ;
- आवरु = दोन ;
- उधानू = तीन ;
- पोकू = चार ;
- मुळू = पांच ;
- शेली = सहा ;
- पवित्र = सात ;
- मंगी = आठ ;
- तेवसू , लेवनू = नऊ ;
- अंगुळू = दहा ;
- एकडू = अकरा ;
- रेघी = बारा ;
- तेपरु = तेरा ;
- चोपडू = चौदा ;
- तळी = पंधरा .
तळी या शब्दांपूर्वी अनुक्रमे एक , दोन , तीन , चार या अर्थाचे शब्द
तान या शब्दाने जोडून सोळा , सतरा , अठरा , एकोणीस हे शब्द बनतात . जसे
-
- भुरका तान तळी = सोळा ;
- अवारु तान तळी = बावीस येणेप्रमाणे .
- बिटी = शंभर ;
- ढकार = हजार .
नाण्यांसंबंधी शब्द असे -
- भुरका = एक रुपाया ;
- फाटा = आणा ;
- अवारु फाटे = दोन आणे ;
- मंगी फाटे = आठ आणे ;
- तळी फाटे = पंधरा आणे ;
- दुकार = एक आणा ;
- चकार = दोन आणे ;
- पकार = चार आणे ;
- टाली = अर्धा रुपाया , अधेली ;
- ढोकळा = एक पैसा या संकेतात बरेच पाठभेदहि आहेत .
वरील सांकेतिक शब्द योजून पुढील अभंग रचलेला आढळतो .
मुळू ( ५ ) वदनाचा उधानु ( ३ ) नेत्रांचा । अंगळू ( १० ) हातांचा स्वामि माझा । १ ।
मुगुट जयाचा । केवळ्या ( १ ) आगळी काठी । ( २० ) पवित्र ( ७ ) तळवटी । चरण ज्याचे ।२।
ढकार ( १००० ) वदनाचा आला वर्णावया । जिव्हा त्याच्या चिरल्या वर्णवेना ।३।
शेली (६) वेडावली पोकू (४) मौनावली। अंगुळूमंगी (१०+८=१८) थकली नकळे त्यासी ।४।
सद्भावे शरणा अवारु ( २ ) जोडून । खेचरविसा म्हणे स्वामि माझा । ५ । [ नंद + भाषा ]