|
स्त्री. लुगड्याचा एक प्रकार ; नकली . स्त्री. १ सतार इ० तंतुवाद्याच्या तारा छेडण्याकरितां तर्जनी , करंगळी ह्या बोटात घालण्याचे तारेचे तिकोनी वेटोळे , मुदनी . हिचे एकेरी , दुहेरी , तिहेरी , पिळाची , पोतेची , स्प्रिंगची इ० प्रकार आहेत . त्यावरुन . २ ( ल . ) गाण्यांतील उंच , चढा सूर . जसेः - नखीत गाणे , म्हणणे . ३ नागवेलीची , विड्याची पाने खुरडण्याचे , अफूच्या बोंडास चिरा पाडण्याचे एक हत्यार . ४ ( पशुपक्ष्यांचे ) नख ; पंजा . ५ वेलाच्या अंकुराचा , पागोर्याचा आकड्याच्या आकाराचा अग्रभागी असलेला अवयव ; धुमारा . ६ ( वासरुं इ० कांच्या ) खुराचा नखाप्रमाणे पुढे येणारा भाग ; खुरकी . प्रत्येक गेळाच्या शेवटी एक एक नखी असते . - मराठी तिसरे पुस्तक पृ . १२७ . ( १८७३ ). खुराचा दुभागलेला प्रत्येक भाग . ७ ( जनावरांच्या , कोंबड्यांच्या ) टांचेच्यावर असलेले शिंगाच्या आकाराचे अवाळूं , अवयव ; गेळ . ८ जनावरांच्या पायस होणारा पायखुरीसारखा एक रोग . - शे १० . १३२ . ९ निश्चय . - मनको . - शर १० आश्रय ; आधार . किंबहुना शास्त्रविखी । एकहि न लाहातचि नखी । म्हणून उखीविखी सांडिली जिही । - ज्ञा १७ . ३९ . ११ गति ; प्रवेश . ( क्रि० लागणे ). मनाची नखी न लगे । जेथ बुद्धीची दृष्टी न रिगे । - ज्ञा १२ . ४१ . १२ टांकी . तरी अभ्यासाचेनि बळे । प्रत्याहारी निराळे । नखी लागैल ढाळे ढाळे । वैराग्याची । - माज्ञा ६ . ५७ . १४ ( व . ना . ) फळाला जेथे देठ असते लागलेला असतो तो फळाचा भाग , तोंड . १५ . ( विडी धंदा ) विडी वळल्यावर वरचे तोंड मुडपून बंद करतात व खालच्या बाजूस दोरा बांधून खालच्या तोंडाला फक्त एकच नख रोवून देतात तो दाब . १६ कासाराचे ओळी करण्याचे एक हत्यार . - बदलापूर ९६ . - वि . नखे असलेला ( प्राणी , जनावर ). [ नख ] नख्या बाहेर काढणे - ( कर ) खरे स्वरुप प्रकट करणे ; ( एखाद्यावर ) उलटणे . ( वाघ , मांजर इ० प्राणी इतर प्राण्यास मारतांना आपली नखे बाहेर काढून कार्यभाग करतात त्यावरुन हा अर्थ ). नखी अर्थ ४ पहा . स्त्री. ( विणकाम ) घोतर इ० कांच्या काठांस असलेली रेशीम इ० काची आगदी बारीक धार , कड ; किनारीचा कडेचा भाग . [ फा . नख = दोरा ] स्त्री. एक सुगंधी औषधी द्रव्य ; नखला पहा . स्त्री. धुतलेले रेशीम . ०झुल स्त्री. ( कर . ) ( विटीदांडूचा खेळ ) नखाएवढ्या अंतराची झुल .
|