Dictionaries | References

नरडे

   
Script: Devanagari
See also:  नरडी

नरडे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : गळा, घसा

नरडे

   स्त्रीन . १ घसा ; अन्नमार्ग . २ गळ्याच्या वरल्या भागी दिसणारा , पुढे येणारा भाग ; घाटी ; गळा ; कंठमणी . बळकटसुत - शोक - व्याघ्र धरी नृपहरिणाचे नरडे । - मोरा रामायण पंचशती ४६ . हो सावध काळाने जो नाही घातले मुखी नरडे । - मोद्रोण १ . ४२ . [ सं . नर्दी = शब्दकरणारी ; हिं . गु . नरडो ] ( वाप्र . )
०घेणे   ठार मारणे . अभावाची घेतली नरडी । धाके उदर तडाडी । - दा ५ . ९ . ४६ .
०दाबणे   ( एखाद्याचा ) गळा दाबून जीव घेणे .
०धरणे   १ ( एखाद्यास ) जेवणास खोळंबा करणे . २ गळा धरणे ; संकट आणणे ; नरडीस बसणे .
०फोडणे   ( एखाद्याचा ) गळा कापणे , दाबणे , मारणे .
०बसणे   घसा बसणे , कोंदणे ; आवाज न निघणे .
०वाजणे   श्वासोच्छवास करतांना घसा घरघर वाजणे ( दमेकरी इ० कांचा वाजतो त्याप्रमाणे ). नरडीचा घोट घेणे , नरडीचे रक्त पिणे ठार मारणे ; जीव घेणे . तुझ्या नरडीचा घोट घ्यावयास कोणी उरले नाही असे कां तूं समजतोस ? - उषःकाल . नरडीला हात घालणे जीव घेणे ; ठार मारणे . त्याच वेळी बाजीच्या नरडीला हात घालावा , असा त्या मंडळींना त्वेष चढलेला होता . - स्वप १४८ . नरडीस नख देणे ( लहान मूल उपजतांच त्याचा ) गळा दाबून ठार मारणे . नरडीस बसणे खणपटीस बसणे ; पिच्छा पुरवून , तगादा करुन , सतावून सोडणे ; गळप्रह घालणे ; गळी पडणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP