|
पु. ( फिनिशियन लोकांचें मुख्य दैवत ) सूर्य . त्यानें बालाचें एक भवन शोमरोन येथें बांधलें . - रा १६ . ३२ . [ हिब्रू . बाल - प्रभू ; धनी ] न. पु. लहान मूल ; अर्भक ; अज्ञान मूल . केंस . हूं सुप्त सर्पिणीतें मेली मानूनि ओढ हे बाल । - मोसभा ५ . १८ . पु. मुलगा ( दांत आल्यापासून शेंडी राखीपर्यंतचा ). - वि . ( सामासांत ) लहान ; अल्पवयी ; अज्ञान ; कोंवळा ; नुकताच उदय पावलेला ( सूर्य इ० ). [ सं . ] म्ह० सं . बालादपि सुभाषितं ग्राह्यम । = चांगलें भाषण मग तें लहान मुलाच्या तोंडांतून निघालें असलें तरी ग्रहण करावें . ( सोनारी धंदा ) हातोड्याचा वरच्या बाजूचा पाचरीसारखा भाग ( यानें कोणताहि धातु ठोकून जलद वाढवितां येतो ). [ सं . वाल ; हिं . ] ०क्रीडा लीला - स्त्री . खेळ . ०बाल क्रिवि . केसागणिक ; पूर्णपणें . बाल बाल - गुन्हेगार - अपराधी - पापी - खूश - बोलणारा - शिवी देणारा . ०ठेवणें ( ना . ) ( इंग्रजीपद्धतीप्रमाणें ) डोक्यावर केंस राखणें . ०गोपाळ पुअव . लहानमोठीं मुलें . ०चें - न . केंसाळ कापड . ०ग्रह पुअव . लहान मुलांना पीडा करण्यांत आनंद मानणार्या देवता या नऊ आहेत :- स्कंद , स्कंदापस्मार , शकुनि , रेवती , पूतना , गंधपूतना ( अंधपूतना ), शीतपूतना , मुखमंडिका व नैगमेय . - योर २ . ६५५ . कापड - न . केंसाळ कापड . आंकडी ; एकरोग . ०बाल होणें - अतिशय प्रसन्न होणें ; अत्यंत संतुष्ट होणें . ०चंद्र पु. शुक्ल पक्षांतील पंचमी - षष्ठीचा चंद्र . [ सं . ] खूष होणें - अतिशय प्रसन्न होणें ; अत्यंत संतुष्ट होणें . ०बाल , सांगणें - एकसारखी बडबड करणें ; वटवट लावणें . ०चरित त्र - न . लहानपणच्या क्रीडा किंवा खेळ ; बाळलीला . [ सं . ] बोलणें , सांगणें - एकसारखी बडबड करणें ; वटवट लावणें . ०त्व न. बाल्य ; बालपणा . बालत्व आहे वय वाढण्याचें । ०परवेशी पर्वशी पर्वेशी - स्त्री . ०चीप फूट - स्त्री . लढाईंत पडलेल्यांच्या कुटुंबास - मुलांच्या संगोपनासाठीं सरकारानें दिलेला पगार , वर्षासन , नेमणूक इ० ; बालपरामर्ष . चौघे सरवंत पाणपतावर पडले सबब त्यांचे बायकांस बालपरवेशी सालीना रुपये ... - वाडमा २ . २५७ . ( नाणें वगैरेमधील ) केंसासारखी बारीक चीर , तड . दगडाची लांबट पट्टी . फूट , फुटका - वि . केसाइतकी बारीक चीर - भेग - तडा - फूट ज्याला आहे असें नाणें . बालबाल , बालीबाल - वि . पूर्ण ; शंका घेण्यास केसभरहि जागा नाहीं इतकी ; पक्की . बालागणीत , क - क्रिवि . बाळपणापासून जोडलेली चाकरी , मित्रत्व , आश्रितत्व इ० चा संबंध किंवा तत्संबंधीं चाकर , मित्र , आश्रित इ० . [ सं . बाल + फा . परवरिश = पालन ] केसागणिक ; प्रत्येक केसाला . ०बुद्धि स्त्री. पोरबुद्धि ; पोरसमजूत . - वि . अज्ञान ; पोरकट समजुतीचा . ( ल . ) अविरत ; एकसारखें ( शिव्या देणें , खोटें बोलणें इ० ). [ बाल + सं . गण - मोजणें ] बालाग्र - न . केसाचें टोक . - क्रिवि . यत्किंचितहि ; केंसाच्या टोंकाइतकें . [ सं . बाल + अग्र - टोंक ] ०बोध वि. लहान मुलांना देखील समजेल असें ; सोपें ; सुगम ; सुलभ ; याच्या उलट प्रौढबोध . यांतील विषयाची रचना मूळ ग्रंथकर्त्यानेंच बालबोध ठेविली . - यंस्थि १ . ०बोध बाळबद - स्त्री . देवनागरी लिपि ( मुलांनाहि समजण्यासारखी ) याच्या उलट मोडी लिपी . - वि . साधा ; निरुपद्रवी ; प्रामाणिक ; शुद्ध ; द्वेष ; अवगुण विरहित ( माणूस इ० ). स्पष्ट ; सरळ ; खुल्या दिलाचा ; जुन्या चालीचा ( व्यवहार , भाषण , वर्तणूक ; वळण ). मुलांना शिकण्यास सोपी ( भाषा , लिपि इ० ). ०बोध - न . ज्या घरांत सर्व माणसें सरळमार्गी आहेत व ज्यांत आधुनिक ढंग , चारगटपणा इ० शिरलेले नाहींत असें घर . याप्रमाणेंच बालबोध घराणें ; बालबोध कुटुंब हे प्रयोग रुढ आहेत . घर - न . ज्या घरांत सर्व माणसें सरळमार्गी आहेत व ज्यांत आधुनिक ढंग , चारगटपणा इ० शिरलेले नाहींत असें घर . याप्रमाणेंच बालबोध घराणें ; बालबोध कुटुंब हे प्रयोग रुढ आहेत . ०बोध - पु . सरळ मार्गानें चालणारा , छक्केपंजे माहीत नसलेला ; साधा माणूस . माणूस - पु . सरळ मार्गानें चालणारा , छक्केपंजे माहीत नसलेला ; साधा माणूस . ०ब्रह्मचारी पु. लहानपणापासून ज्याला स्त्रीसंग घडला नाहीं व ज्याचें लग्नहि झालेलें नाहीं असा मनुष्य . ०भाषा स्त्री. लहान मुलांची भाषा ; त्यांची बोलण्याची पद्धत - उदा० हम्मा = गाय . पापा = भाकरी इ० . एखाद्याची लहानपणापासून बोलण्याची भाषा ; मातृभाषा . संस्कृताची अपभ्रंश होऊन झालेली भाषा ( ही नाटकांतून स्त्रिया व हलक्या दर्जाचीं पात्रें यांच्या तोंडीं घातलेली असते ). ०मित्र पु. लहानपणापासूनचा मित्र ; लहानपणीं असलेला मित्र . नुकताच उगवलेला सूर्य ; कोंवळ्या किरणांचा सकाळचा सूर्य . ०रंडा रांड विधवा - स्त्री . लहान वयांत , नहाण येण्यापूर्वी जिचा नवरा मेला अशी स्त्री . [ सं . ] ०रोग पु. लहान मुलांना होणारा रोग किंवा विकार . [ सं . ] ०वाचा स्त्री. लहान मुलांची भाषा ; बालभाषा . [ सं . ] ०सरस्वती पु. लहानपणापासून अत्यंत बुद्धिवान असलेला पुरुष . ०सूर्य पु. उदयकालचा सूर्य . बालसूर्याचेनि उजाळें । तैसी कवळें टांचांचीं । - एरुस्व १ . २१ . [ सं . ] ०हत्या स्त्री. बालहिंसा ; बालवध ; लहान मुलाला ठार मारणें . [ सं . ] ०हत्यारा पु. लहान मुलाला मारणारा ; बालहत्या करणारा . [ बाल + हन्तृ ] ०हरीतकी स्त्री. कोंवळे कोवळे वाळविलेले हिरडे ; बाळहिरडा . [ सं . ] बालातप न . सकाळचे सूर्यकिरण ; सकाळचें कोवळें ऊन . [ बाल + आतप ] बालाभ्यास पु . लहानपणीं करावयाचा अभ्यास ; लहानपणीं केलेला अभ्यास . [ सं . ] बालाभ्यासी वि . लहानपणापासून अभ्यास केलेला , शिकलेला . [ सं . ] बालार्क पु . बालसूर्य . त्याचें कोवळें ऊन ; कोवळे किरण . बालिश , बालेश - वि . अज्ञानी ; अननुभवी ; अल्पवयी , पोरकट ; मूर्ख . स्वपर बळाबळ नेणुनि बालिश बहु बायकांत बडबडला - मोविराट ३ . ३९ . [ सं . ] बालिशता - स्त्री . मूर्खपणा ; पोरकटपणा . अस्मदहितहित इच्छिसि लाविसि आम्हां दहांत बालिशता । - मोसभा ४ . ३३ . बालोपचार - पु . लहान मुलांना योग्य असें औषध किंवा औषधाची योजना ; हलकें व सौम्य औषध ; उपचार इ० . [ सं . ] बालोपचारी - वि . सौम्य , लहान मुलांना देखील योग्य असें औषध इ० . बालोपवीत - न . लहान मुलाचें जानवें . [ सं . ] बाल्य , बाल्यावस्था - नस्त्री . बालत्व ; बालपण ; वयाच्या पांच वर्षांपर्यंतचा काल . कौमार्यावस्था ; तारुण्यप्राप्तीपर्यंतचा काल ( सोळा वर्षांपर्यंतचा काल ). [ सं . ]
|