|
पु. तेल , तूप इ० ठेवण्याचें , लहान तोंडाचें चर्मपात्र ; कातड्याची बाटली . ( व . ) ज्याभोंवती आरे बसविलेले असतात तो चाकाचा मध्यभाग ; तुंबा . मुंडकें ; डोकें . [ हिं . बुदला ; तुल० इं . बॉटल ] म्ह० बुधलाभर तूप खाऊन बुधल्याचा माल नाहीं . बुधलेमार - पु . दारुनें भरलेले बुधले ओळीनें ठेवून बार उडविणें . दारु भरलेल्या बुधल्यांशीं बांधून त्या दारुस आग लावून मारणें . मोघरीमार बुधलेमार । चौखरुन डंगारणें मार । - दा ३ . ७ . ६५ . [ बुधला + मारणें ] बुधली - स्त्री . सुगंधी तेलें , अत्तरें इ० ठेवावयाचें चर्मपात्र ; लहान बुधला . मशालीवर तेल ओतण्यासाठीं तोटी असलेलें चामड्याचें किंवा धातूचें भांडें . ( सामा . ) लहान भांडें . [ बुधला अल्पार्थी ] म्ह० तोंडी तीळ गांडीस बुधली . ०उताणी , भोंवतीं येणें - ( ल . ) एखाद्याची लबाडी उघडकीस येणें . बुधलें - न . पडणें , भोंवतीं येणें - ( ल . ) एखाद्याची लबाडी उघडकीस येणें . बुधलें - न . तेल , तूप इ० ठेवण्याचें चर्मपात्र . ( व . ) बुधला अर्थ २ पहा .
|