|
स.क्रि. आराधणें ; पूजणें . अशा तुज न जो भजे मनुज धिक तयाचें जिणें . - केका ११ . सेवा करणें . तैसा आपलिया विस्मृती । आत्मा आपणचि प्रकृती । सारिखा गमोनि पुढती । तियेसीचि भजे । - ज्ञा १५ . ३५४ . आचरणें ; अनुष्ठान करणें . आतां ययाचि कर्मा भजतां । - ज्ञा १८ . ६२८ . आदर बाळगणें ; सत्कार करणें ; मान देणें . पैं राजमुद्रा आथिलिया । प्रजा भजे भलतया । - ज्ञा १८ . ८४९ . अवलंबणें ; आश्रय करणें . परी जे विचारुनि पुनरावृत्ति । भजतीचि ना । - ज्ञा २ . १७६ . घेणें ; अनुसरणें ; संमत होणें . भजे जसी वृषा कपिला । - मोविराट ६ . ५८ . लग्न लावणें . गांधर्वेंचि वरातें भजल्या । - मोआदि १२ . ४२ . भजनीं लागणें ; मैथुन करणें . वंध्येतें भजतां जरि फळ तरि येईल यश कुनीतीतें । - मोशल्य ३ . ५४ . ( काव्य ) कबूल करणें ; ग्रहण , मान्य करणें ( विवरण , अर्थ इ० ). वाक्यांत भावार्थ असा भजावा । [ सं . भज = पूजणें ] भजता , भजक - वि . भक्त ; भजन करणारा . भजती - स्त्री . भजनाचा मार्ग . परि ते भजती उजरी नव्हे । - ज्ञा ९ . ३४५ . भजन - न . आराधना ; पूजा ; सेवा . स्थापना करणें . करिति जनमे जयाचें अभिषेकुनि सविधि पितृपदीं भजन । - मोआदि ५ . ८९ . भक्तीचें कृत्य म्हणून देवाचें नामस्मरण करणें . देवाचें स्तोत्र , गीत . आर्जव , खुशामत , मनधरणी करणें . द्रव्यलोभें भजनसंबंधू । - एभा २६ . ४५४ . ५ ( गणित ) भागाकार . [ सं . ] भजनीं , भजनास लागणें - क्रि . नादीं लागणें . भजनपूजन - न . ( व्यापक ) पूजा . सेवा . [ सं . ] भजनफल - न . ( गणित ) भागाकार . [ सं . ] भजनशील - वि . भक्तिमान ; धर्मनिष्ठ ; सत्कर्मपरायण . कीं दैत्यकुलीं भजनशील । प्रल्हाद पूर्वी जन्मला । भजनी - वि भक्तिमान ; धर्मनिष्ठ . धर्मभोळा ; दांभिकांकडून सहज फसला जाणारा . भजनीय , भज्य - वि . पूजन , आराधना , सेवा करण्यास योग्य . जाला भृत्यु भज्थ कालोवा । भक्तिच्या घरीं । - अमृ ९ . ३० . [ सं . ] भजिनणें - सक्रि . भजनीं लागणें . आणिकही गोपपंक्ति । स्नेहेंकरिं भजिनले । - रास १ . ४६० .
|