|
स्त्री. गुणगुण आवाज ( माशांचा इ० ). ओसाडी ; भयाणपणा ( जागेचा ). सोसाट्याचा वारा ; अशा वार्याचा आवाज . - वि . ओसाड . भणभण , भणां - क्रिवि . गुणगुण आवाजाचें , वार्याच्या सणसण आवाजाचें , अनुकरण . [ ध्व . ] ( वाप्र . ) भणभण करणें - अक्रि . शून्य , भयाण , ओसाड दिसणें ( घर , निर्जन अरण्य , गांव ). घो घो करणें ( माशा इ० ). भणभण फिरणें - स्वैरपणें इतस्ततः हिंडणें ; भटकणें . भणभणणें - अक्रि . गुणगुणणें ; घोंगावणें ( मधमाशा , माशा इ० कांचा थवा ). ( ल . ) दाणादाण होणें ; दशदिशा पळ काढणें ( सैन्य इ० नीं ). झणझपणें ; सणसणणें ( मार , रोग इ० कांमुळें कान इ० ). वाजणें ; गरजणें ( वारा , तोफ ). डोक्यांत , कानांत भणभण असा आवाज होणें . भणभणविणें - सक्रि . मोठ्यानें गुणगुणणें , घोंगावणें , सणसणणें , वाजणें , गरजणें इ० क्रिया करावयास लावणें . ( जोराच्या ठोशानें ) झणझणण्यास , भिरभिरण्यास लावणें ( कान इ० ). कानशिल भणभणे असा पदार्थ चाखविणें , डोक्यास चोळणें . भणभणाट - पु . गुणगुणाट ; कानठाळ्या बसविणारें घोंगावणें . शून्यता ; उदासपणा ; भयाणपणा ; ओसाडपणा ( रिकामें घर , गांव , अफाट अरण्य यांचा ). भणभणित , भणभणीत - वि . रिकामेपणामुळें , ओसाडपणामुळें उदास , शून्य दिसणारा ( ओसाड गांव , इमला इ० ). आश्रमांत पाहती येऊन । दिसे शून्य भणभणित । - रावि १६ . ९ . भणभण्या - वि . निरर्थक हिंडणारा ; भणभण फिरणारा . भणाटणें , भणाणणें - अक्रि . मोठ्यानें गुणगुणणें , घोंगावणें , सणसणणें , वाजणें , गरजणें इ० . भणाटा , भणाण , णा - पु . भणभणाट . पळापळ ; पांगापांग ; दाणादाण . इतुक्या उपरी भणाणा फौजेचा झाला । - ऐपो ८८ . ( विरु . भणाटा ) पराकाष्ठेची घालमेल ; अव्यवस्था ( कामाची , धंद्याची ). नाश ; ओसाडी . सात्यकि कुरुकटकांचा , पवन घनांचा तसा , करि भणाणा । - मोद्रोण १५ . २७ . भणाण - क्रिवि . भणभण शब्द करुन ; घो घो आवाज करुन . भणाण - माशा उडाल्या - बसल्या - जमल्या - दाटल्या इ० .
|