Dictionaries | References

भरणें

   
Script: Devanagari
See also:  ओहर , ओहरजत्रा , ओहरयात्रा , भरणी

भरणें     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : रुमडी

भरणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
bharaṇēṃ n The piece of wood which is filled in betwixt the head of a post and the पिढें or cross-piece.
fulfilled or satisfied.
. Ex. तांदूळ चार पायली भरले; नारळ शंभर भरले; खंडीभर धान्य आणलें तें ह्या मापानें बराबर भरलें. 3 To become complete or full--a term or time; as वर्ष भरलें, आयुष्य भरलें, मुद्दत भरली. 4 To become heavy and torpid;--used of knees or legs from fatigue or sitting. 5 To fill up--a well or pit with rubbish: also, or भरून येणें, to form in granulations and fill--a healing wound or sore. 6 To enter and lodge--a thorn into and in the flesh. 7 To gather, come together, fill;--used of a market. Ex. बाजार चांगला भरला म्हणजे मी येईन. Also to gather, meet, form, to fill or be held--a market or bazar. Ex. तो मोठा गांव आहे तेथें बाजार भरतो. भरून येणें To rise up bodily or in mass;--used of a boiling liquor.

भरणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   Fill. Pay in. Pour into. Cover all over. Put on. Make good.
v i   Become full. Fill up. Amount. Ex. नारळ शंभर भरलें. Fill out. Enter. Gather, come together. Ex. बाजार भरला, भरून देणें Supply (some deficiency or loss arising to another).
भरलें धरणें   Used of an idol when it makes no response to an injury, giving neither उजवी or डावी; said also of a devil in possession when he disregards the interrogatories of the देवऋषि or exorciser.
भरून पावणें   Receive in full.
भरून येणें   Form in granula.

भरणें     

टांच मारणें ; पळावयास लावणें ; भरधांव सोडणें . चौखुर सोडणें ; पिटाळणें . ' तो एक स्वार केवळ पट्टी भरीत मागून आला व त्यानें जोरानें त्याच्या पाठींत आपला भाला मारला .' - दुरं २२५ . ' जगलों तर पायाशीं पुन्हां येईन असें म्हनुन नारायणरावानें आपल्या घोड्यास पट्ती दिली .' दुरं २२७ .
स.क्रि.  
ओवरजत्रा , ओवरयात्रा , भरणी पहा .
पूर्ण करणें .
बुझविणें ; भरुन काढणें ( खळगा , रिकामी जागा , व्यंग ).
आंत , वर , घालणें , ठेवणें ( भरीत , भरताड , पूरणद्रव्य ); ठांसणें ( बार ).
आंत ओतणें ( रस , भुकटी , धान्य , वाळू इ० ). सिंधू कवण भरी । - ज्ञा १३ . ५६ .
सर्वत्र माखणें , लिप्त करणें ( तेल तूप , चिखल , धूळ , काजळ इ० - सामान्यतः अपवित्र घाणेरड्या वस्तूनीं ).
पूर्ण करणें ( कच्चे आकार , आराखडे , रकाने , घरें , तक्ते , कोष्टकें इ० ).
भरणा करणें ( देणें असलेले पैसे इ० चा ).
खूट , तोटा पूर्ण करणें ; हानिनिष्कृति करणें .
घालणें , लेणें ( मुख्यत्वें दागिना ). बांगड्या भरल्या , गोट भरले .
पुरा करणें ( नियतकाल , वायदा ). चार दिवस कमी आहेत ते भर मग चाकरी सोड .
( सुतारी ) ( खा . ) तयार करणें ( बाज , खुर्ची इ० ). रामभाऊ माझी बाज भरुन द्या .
मारणें ; भोसकणें . पळतां तदुरीं शर शीघ्र भरी । - मोरा हररमणीय रामायण २० . [ सं . भृ ] भरणें - अक्रि .
अंगानें जाड , भरदार , दळदार होणें ( शरीर , फळें , दाणे ); भरुन जाणें ( कणीस ).
बरोबर असणें ; तंतोतंत होणें ( ठराविक संख्या , परिमाण यांच्या इतकें ). तांदूळ चार पायली भरले .
पूर्ण , पुरा होणें ( मुदत , काल ). वर्ष , आयुष्य भरलें .
जड आणि बधिर होणें ( श्रमानें , बसण्यानें - गुडघे , पाय इ० )
भरुन निघणें ( विहीर , खांच ); भरुन येणें ; मठारणें व भरुन जाणें ( बरी होत जाणारी जखम , क्षत ).
रुपून बसणें ; शिरणें ; घुसणें ( कांटा , बाण इ० ). गुरुसि त्यजुनि , व्यूहीं भीम , त्रिपुरीं जसा हरशर भरे । - मोभीष्म ७ . ७ .
संचरणें . दोघे पत्री पाशीं गुंतुनि भरले उडोनि गगनींच । - मोउद्योग ५ . ५५ .
भरती येणें . कां चंद्राचेनि पूर्णपणें । सिंधू भरती । - ज्ञा १३ . १३८ .
जमणें ; एकत्र होणें , मिळणें , केला जाणें ( बाजार ). बाजार चांगला भरला . तो मोठा गांव आहे तेथें बाजार भरतो . [ सं . भृ , भरण ] भरुन येणें - अक्रि . वर येणें ( उकळणारें द्रव द्रव्य ). भरणें - उक्रि .
पात्रांत समाविष्ट करणें .
गच्च करणें .
रंग देणें ( चित्र , कोष्टक इ० कांस ). भरणें . भरत - न . भरीत पहिल्या तीन अर्थी पहा . भरताचें भांडें - न . विशिष्ट मापाचें , परिमाणाचें भांडें . [ भरीत + भांडें ] भरतक - न .
पूरण ; पुरें करणें ( संख्या , परिमाण ).
भरगत ; बारदान ; भरताड .
सामान लादणें ; भरणें ( गलबत , गाडी इ० कांत ) भरताड - स्त्री .
सामानानें लादलेला तांडा ( गलबतें , गाड्या , पशू इ० कांचा ).
वरीलप्रमाणें लादलेली , भरलेली स्थिति
( कों . ) पाणरहाटाचे भरुन वर येणारे लोटे . याच्या उलट रिताड . भरती - स्त्री .
समुद्राच्या पाण्याचा चढ . हा विशेषतः चंद्राच्या आकर्षणानें प्रत्यहीं दोनदां ( सुमारें १२ तास १५ मिनिटें इतक्या अवकाशानें ) होतो . ओहटी , सुकती यांच्या उलट .
चढाई . गिलचांची झाली भरती । - संग्रामगीतें ६९ .
पूरण ; भरण ; लादणी .
पूर्ण झाल्याची , लादल्याची स्थिति . ( गलबत , गाडी ).
नोंदणी . ( सैन्य , मजूर इ० )
( ल . ) भरभराट ; वृद्धि . भरती सुकती - स्त्री . ( कों . ) भरती व ओहोटी ; चढउतार . भरतीचा - वि .
पूर्ण करण्यास , भरण्यास लावलेला , पाहिजे असलेला .
फक्त परिमाण , संख्या पूर्ण करण्याच्या , खळगा , जागा भरुन काढण्याच्या लायक ( वस्तु ). भरतुक - न .
भरीत ; बारदान ; भरताड .
ओझें वाहून नेण्याबद्दलचें भाडें . भरतें , भरितें - न .
पुरतेपणा ; पूर्णता ; पुर्ति ( गुन्हा , पाप , अन्याय यांची ); पराकाष्ठा ( ताप , अव्यवस्था , इ० कांची ); सीमा ( शीण , आजार , दुःख इ० कांची ); सहनशक्तीपर्यंतची मर्यादा ; दाहाची पूर्ण संवेदना ( शैत्याची - मुख्यत्वें ज्वरापूर्वी होणारी ); उमाळा ; भरती ( शोक , दुःख , आनंद इ० ची ). ( क्रि० येणें ). भर अर्थ १ पहा . आलें भरतें एवढें । तें काढूनि पुढती । - ज्ञा १८ . २८९ .
समुद्राच्या पाण्याचा चढ .
वृद्धि . इतरांच्या जाळाया भरतें सुकृताधनातमा येतें । - मोमंभा ३ . १४ .
०येणें   जोर येणें ; समृद्धि प्राप्त होणें . भरला भरला वि .
चांगला भरलेला ; समृद्ध ; भरभरणारा ( संपत्ति , संतति , मित्र , कीर्ति इ० कानीं ); परिपूर्ण ( प्रजेनें राज्य , उत्पन्नानें शेत , देश व सामान , भांडीं यानीं घर ). भरला भारला - वि . पतदार ; अब्रूदार ; लायकीचा ; वजनदार ( व्यापारी , मनुष्य ); भरभरीचा ( व्यापार , काम ). [ भरणें + भार ] म्ह० भरल्या गाड्यास सूप जड नाहीं ! भरलीसरली , सवरलेली - वि . ( बायकी ) बाळंतपणाचे दिवस नजीक आलेली ; गर्भवती . भरलें कुंकूं - न . ( बायकी ) पुर्ण सौभाग्य . माझें काय वाईट होत आहे ? भरल्या कुंकवानें मी देवाघरीं जात आहें . भरलें घर - न . पुष्कळ माणसें असून भरभराटींत असलेलें इष्टमित्रांनीं व्यापलेलें असें कुटुंब . माग म्हणतांचि म्हणे भरलें घर । - राक २ . ३८ . भरलें धरणे - क्रि . गडप करणें ; देवाला कौल लाविला असतां त्यानें उजवी , डावी न देणें . देवानें भरलें धरलें . भरलें शेत - न . भरपूर पिकलेलें शेत . भरल्या ओटीनें - क्रिवि . ( बायकी ) मुलांबाळांसह सुखरुप . भरल्या ओटीनें बाळंतीण सासरीं जाऊं दे . भरल्या घोसानें , बंदांत , मरणें - तरणाताठा मरणें . भरल्या पायांचा - वि . चिखलानें इ० मळलेले पाय असलेला ; बाहेरुन आल्यावर पाय न धुतलेला . भरल्या पायीं - क्रिवि . बाहेरुन चालून आल्यावर पाय न धुतां . भरल्या पोटी - क्रिवि . पोट भरलेलें असतां . भरलेल्या आंगाची - वि . ( कों . ) गरोदर . भरान येणें - अक्रि .
( कु . ) दुःखाचे अश्रु येणें ; ह्रदय भरुन येणें .
कफानें छाती भरणें . त्यंकां खूप भरान इलां . भरवड - स्त्री .
( कु . ) ओसाड जमिनींत भर घालून तयार केलेली जमीन .
खारवट जमिनीपैकीं टणक जमिनींत रोहपेरा करतेवेळीं ती जमीन पावसाच्या पाण्यानें तुडुंब भरुन काढणें . भरवण - न .
एके वेळीं दिव्याच्या टवळ्यात , तळणाच्या कढईंत घातलेलें तेलाचें परिमाण ; एके वेळीं जमलेल्या काजळाचें परिमाण इ० .
भूत काढण्याकरितां भुतानें झपाटलेल्या माणसावरुन ओवाळलेलें द्रव्य ( कोंबडें , नारळ इ० ). भराई - स्त्री .
भरण्याची किंमत .
भरणें . भराभर - स्त्री . घाईचें भरणें . भराव - पु .
भरण ; पूरण ( खांच बुजविण्याची ).
भरल्याची स्थिति भरावण , वळ - स्त्री . ( कों . ) जमीन भाजण्याकरितां तिजवर गवत , काट्या , छाट आणि शेण इ० पसरणें . भराविणें - सक्रि .
शेणानें , घाणीनें चोपडणें , माखणें ( हात , पाय , वस्त्र ).
भरविणें पहा . भरीचा - वि .
विवक्षित माप पूर्ण भरेल इतका .
निम्मेंशिम्में पात्र भरले असतां तें पूर्ण भरेल इतका नवीन घालावयाचा ( पदार्थ ). भरीत , भरित , भर्त - न .
लादल्याची , भरल्याची स्थिति .
भरलेला , भरावयाचा माल ( पोतें इ० त ); ओझें ; बोजा . हें सामान दोहों बैलांचें भरीत आहे .
लादणी ; ओझें ; भरताड .
चिघळणार्‍या जखमा , गांठी यांची पूयमय व नासलेली स्थिति .
वांगें वगैरे भाजून दहीं घालून केलेली कोशिबीर . ( वांगीं इ० ची ).
०पत्र  न. गलबतावरील भरताची ( बारदानाची ) यादी . भरुन देणें सक्रि . खुटीची , तोट्याची निष्कृति करणें . भरुन पावणें सक्रि . पूर्णत्वानें पावणें ; पुरी करुन मिळणें ( मागणी इ० ).

Related Words

भरणें   भकाटें भरणें   कूस भरणें   दचकी भरणें   अंगीं भरणें   भूस भरणें   घडा भरणें   घडी भरणें   कानांत भरणें   अक्षत भरणें   अडभरीं भरणें   जर भरणें   चिकीं भरणें   पायली भरणें   बार भरणें   घटका भरणें   देवानें भरणें धरणें   पोटांत कांटे भरणें   खडकावर पोट भरणें   (हातांत) कांकण भरणें   आडरानांत भरणें   खिसा भरणें   गगनांत भरणें   कांकड भरणें   कान भरणें   उपराळून भरणें   उरीं भरणें   कमर भरणें   ऊर भरणें   ओटी भरणें   कुतडा भरणें   अंगावर भरणें   अखोटा भरणें   घर भरणें   घास भरणें   वेड भरणें   सई भरणें   अव्हाटे भरणें   आखोटा भरणें   गळा भरणें   दळ भरणें   दिवस भरणें   दुघाड भरणें   दंड भरणें   दम भरणें   चढीस भरणें   तर्‍हीं भरणें   तर्‍हेस भरणें   तळी भरणें   ताई भरणें   ताहीं भरणें   डोळा भरणें   डोळ्यांत भरणें   बांगड्या भरणें   बाजार भरणें   बीर भरणें   भडस भरणें   भरीं भरणें   रागास भरणें   माप भरणें   मूठ भरणें   रंग भरणें   रंजक भरणें   मनांत भरणें   फांटा भरणें   फांशी भरणें   फूफू भरणें   धाड भरणें   नगारा भरणें   नजरेंत भरणें   धडकी भरणें   नादीं भरणें   पाणी भरणें   पदर भरणें   पेव भरणें   पोट भरणें   हावभरी भरणें   हावें भरणें   हावेनें भरणें   हावेस भरणें   हो भरणें   आपली तुंबडी भरणें   आपले घर भरणें   आयुष्‍याचा घडा भरणें   कानांत वारे भरणें   (कच्च्या) घड्याने पाणी भरणें   (एखाद्या कार्याची) तळी भरणें   एखाद्याच्या घरी पाणी भरणें   अंगीं ताठा भरणें   साखरेनें तोंड भरणें   शंभर वर्षें भरणें   दिवस पूर्ण भरणें   दुसर्‍याचे बायकोस बांगड्या भरणें   तोंडाला फांटा भरणें   तोंडीं फांटा भरणें   डोळे टळटळीत भरणें   बायांचे मांड भरणें   लबाडीवर पोट भरणें   बेल्यांत मडक्या भरणें   भूसानें अंग भरणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP