|
न. पु. न . ( महानु . ) धनगर . रत्नप्रभेचेनि कोडें । मेंढिया शृंगारीति भारुडें । - ऋ ५४ . लांबच लांब , गुंतागुंतीची , कंटाळवाणी हकीगत , वृत्तात , कथा . ( क्रि० लावणें ). कर्नाटकांत या नांवाची एक जात आहे . भरवाड पहा . पंचाईत ; संकट ; विघ्न ; ब्याद ( क्रि० येणें ; येऊन पडणें ). त्रासदायक , कंटाळवाणा वाद . अवघड , कूट कविता , लेख , रुपक इ० एकनाथी भारुड . ( व्यापक ) कुभांड ; तोहमत . ( क्रि० आणणें , टाकणें , रचणें , काढणें ). [ भारत + रुढ ; भरडणें ? ]
|