|
पु. भूस ; तूस . चूर्ण ; भुसकट इ० ( करवतलेल्या लाकडाचें . भुसडा पहा . [ सं . बुस ; हिं . ] ०डा पु. भुसडा . भुसार , भुंसार न . क्रयविक्रय योग्य असें खाण्याच्या उपयोगी धान्य , गवत , कडबा इ० कांस सामान्य शब्द . तांदूळ भुसारांत मोडतो कीं किराणांत ? धान्याचा व्यापार . मग तें सांडी भुसार । - गीता २ . २१५५ . भुसारी लोकांचा समुदाय ; धान्याचे व्यापारी ; धान्याचे उदमी लोक . भुसारास जकात घ्यावयाचा पहिल्यापासून शिरस्ता नाहींच . - थोमारो २ . ६८ . सामाशब्द - भुसार पेठ - स्त्री . गांवांतील , बाजारांतील भुसार्यांच्या दुकानांचा भाग ; धान्याचा बाजार . भुसार माप - न . ( भुसाराचें माप ) रगडपट्टीचें , सढळ हाताचें , झुकतें माप . भुसार माफी - स्त्री . धान्य , भुसार जिनसा यांच्यावरील कराची माफी . भुसारी - पु . धान्याचा व्यापारी ; गल्लेकरी ; दाणेवाला ; दुकान ठेवून किरकोळ विक्री करणारा , खेड्यांत धान्य खरेदी करुन तें शहरच्या पेठांत नेऊन विकणारा व्यापारी . भात , तूर इ० धान्य विकत घेऊन त्याचे तांदूळ , डाळ इ० करुन विकणारा उदमी . भुसार्यानें धान्यसंग्रह केला । मोजितां व्यर्थ जन्म गेला । भूस विकणारा . भुसारीपसरॉ - पु . ( गो . ) धान्याचें दुकान . भुसारें - न . भुसाची गंजी , रास . ( सामान्यतः कडब्याच्या पेंढ्यांनीं वेष्टिलेली व वरुन आच्छादिलेली ). भुसी - स्त्री . बारीक भूस ; भुशी पहा . भुसें - न . बुरंगट ; झिमझिम पाऊस . धुकें .
|