|
स्त्री. ( कों . ) बारीक तूस ; धान्याच्या कुसांचीं , खपल्यांचीं टोकें , तुकडे ; भुसकट . [ भूस ] भुसकट , भुसकूट , भुसकटा , भुसकुरा --- नपु . ( कों . ) भूस ; तूस . चूर्ण ( किडीनें खाल्लेल्या , करवतलेल्या इ० लाकडाचें ). [ भूस ] ( वाप्र . ) ०काढणें पाडणें - सक्रि . ( काम पाणरहाट फिरविणें दामटणें , मारणें इ० खालीं ) बेजार करणें ; जेरीस आणणें ( मनुष्य , पशु यांस ). ०निघणें पडणें वासणें - अक्रि . त्रासाच्या वागणुकीखालीं जर्जर होणें . भुसकाटणें - अक्रि . ( कु . ) बुजणें . भुसकट भुसका - वि . पुष्कळ भूस असणारें ; तुषयुक्त ( धान्य ). किडींनीं खाल्ल्यामुळें , जीर्ण झाल्यामुळें भुसभुसीत झालेलें ( लांकूड ). ( शब्दशः व ल . ) हलका ; फुसका .
|