|
पु. एक प्रकारचें भाजीचें फळ . ह्याचे काळा , पांढरा व तांबडा असे प्रकार आहेत . उंदराच्या विषावर काळ्या भोपळ्याचा देठ उगाळून लावतात . कडू भोपळा म्हणून एक भोपळ्याची जात आहे . वीणा , सतार यांच्या डेर्यास याचा उपयोग करतात . वीणा इ० चा डेरा . ( व ) नाट व खांबाच्या वरचें टोंक यामधील ठोकळा . ( ल . ) कमंडलु ; तुंबा . ( वाप्र . ) भ्रमाचा भोपळा फुटणें , भोपळा फुटणें - एखाद्या गोष्टींत कांहीं अर्थ असेल अशी जी समजूत ती कांहीं कारणानें त्या गोष्टीचें खरें स्वरुप उघडकीस येऊन दूर होणें . हातीं भोंपळा येणें , भोंपळा येणें - दरिद्री होणें ; भीक मागूं लागणें . भोपळ्या एवढें शून्य - अत्यंत अभाव . भोपळ देवता - स्त्री . लहान मुलाप्रमाणें खोड्या करणारी , भटक्या मारणारी वयस्क स्त्री . [ भोंपळा + देवता ] भोंपळसुती - वि . जें चालविण्यांत बंदोबस्त , व्यवस्थितपणा , बारकाई , कुशलता इ० नाहीं असें ( राज्य , कारभार , सावकारी , व्यवहार इ० ). अव्यवस्थित ; अजागळ ; निष्काळजीपणानें केलेला ( पोशाख , कामकाज ). जाडेभरडें ; राकट ; ओबडधोबड ( सामानसुमान , कामकाज ). [ भोंपळा + सूत ] भोंपळी - स्त्री . भोंपळ्याचा वेल . भोंपळी खरबूज - न . एक प्रकारचें खरबूज . भोंपळी मिरची - स्त्री . एक प्रकारची जाड मिरची ही कमी तिखट असते . हिची भाजी करतात . भोंपळ्या रोग - अंगांत मेदोवृद्धि करणारा एक रोग ; फोपसेपणा .
|