Dictionaries | References

महत

   
Script: Devanagari

महत

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : महान, महानता, महत्व, सर्वोत्तम

महत

 वि.  
   मोठा ; बडा ; विस्तृत .
   ( ल . ) थोर ; वरच्या दर्जाचा ; उत्कृष्ट ; कोणत्याहि गुणांत श्रेष्ठ . जसें - महाबुद्धिमान , महालबाड ; महासोदा . महत हा शब्द कर्मधारय आणि बहुव्रीहि समासांत महा असा होतो आणि तत्पुरुष समासांत तसाच राहतो . जसें - महादेव , महाबाहु व महत्पूजा ; महत्सेवा .
   अतिशय ; फार ; अत्यंत . जसें - महाप्रचंड ; महातीक्ष्ण इ० [ सं . ] महतामहत - वि . ( व . ) मोठ्यांतला मोठा ; सर्वांत मोठा . महत्तत्त्व - न . सत्त्व , रज , तम या तीन गुणांची साम्यावस्था ; मूळमाया ; गुणसाम्य . सत्त्वगुणापासून महत्तत्व उत्पन्न झालें . - टिले ४ . ३६१ . महत्तमसाधारण भाजक - पु . दिलेल्या सर्व संख्यांना पूर्ण भाग जाईल अशी सर्वांत मोठी संख्या . महदंतर - न . फार मोठें अंतर , तफावत ; वेगळेपणा . महदहंबुद्धि - स्त्री . महत्तत्त्व ; अहंकारबुद्धि . एवं महदहंबुद्धि । मनें महाभूत समृद्धि । - माज्ञा १५ . १०५ . महदादिदेहांत - क्रिवि . महत्तत्त्वापासून स्थूलदेहापर्यंत . महदादि देहांतें । इयें आशेषेंही भूतें । - ज्ञा ९ . ६७ . महदब्रह्म - न . मूळ व्रह्म . तया महदब्रह्मातें व्याली । दैविकी इच्छा । - ज्ञा ११ . ५११ . महदभूत - वि . विलक्षण ; असामान्य ; चमत्कारिक . महद्वर्त्त - न . गोलाचें वर्तुळ ; खगोलीय वृत्त . महती - स्त्री . मोठेपणा ; महत्त्व . त्याचेनि माझी त्रैलोकीं ख्याती । मज महती त्याचेनी । - एभा १४ . २६९ . महतीवीणा - स्त्री . नारदाच्या वीणेचें नांव . महत्त्व - न . मोठेपणा ; योग्यता ; लौकिक ; प्रतिष्ठा ; किंमत . महती पहा . रायाजी पाटिल महत्त्व रक्षी । - ऐपो ३२ .
०उतरणें   योग्यता , प्रतिष्ठा कमी होणें .
०वाढविणें   फुशारकी , बढाई मारणें .
०दर्शक वि.  पदार्थांचे माप , लांबी , रुंदी इ० दाखविणारें ( परिमाण ).
०मापन  न. गणितशास्त्राचा एक विभाग ; आकारमान मोजण्याची विद्या ; मापनशास्त्र . महत्त्वाकांक्षा स्त्री . मोठेपणाची इच्छा , हांव ; जिगीषा . कर्तबगार लोकांच्या वेडाला महत्त्वाकांक्षा म्हणतात . - विधिलिखित २१ . महा वि .
   महत पहा .
   थोर ; बडा . हे एक महा आहेत . तो काय एक महा आहे .
०अर्बुद  न. एक हजार दशकोटि ही संख्या .
०ऊर  पु. ( अप . ) महापूर ; अतिशय मोठा पूर .
०एकादशी  स्त्री. आषाढशुद्ध व कार्तिक शुद्ध एकादशी .
०कंद  पु. 
   मोठ्या जातीचा कंद .
   लसूण .
०कल्प  पु. ब्रह्मदेवाच्या शंभर वर्षांचा काल ; ब्रह्मदेवाचें आयुष्य ; महाप्रलय ; कल्प पहा .
०काल    - पु .
   प्रलय काळचा शंकराचा अवतार . महाकाळ उभा चिरीन बाणीं ।
   बारा ज्योतिर्लिंगांपैकीं एक ( उज्जनी येथील ).
०काली  स्त्री. १ पार्वती . २ प्रचंड तोफ ; महाकाळी . - शर .
०काव्य  न. वीररसप्रधान , मोठें , अभिजात , रामायण - महाभारताप्रमाणें काव्य ; ( इं . ) एपिक . आर्ष महाकाव्यांत कोणकोणते गुण असावे याबद्दल पुढें विवेचन येईलच .
०काश  न. अवकाश ; अफाट पोकळी . याच्या उलट घटाकाश , मठाकाश . [ महा + आकाश ]
०कुल   कुलीन - वि . थोर , उच्च कुलांतील ; कुलीन .
०खळें  न. मोठें अंगण .
०गाणी   नी - वि . गानकुशल . उत्तर देशींच्या महागाणी । गुर्जरिणी अतिगौरा । - मुरंशु १२२ .
०गिरी  पु. मोठा पर्वत ; हिमालय . किं मक्षिकाचेनि थडकें । महागिरी पडों शके । - एकनाथ - आनंदलहरी ४२ . - स्त्री .
   तीनशें खंडीपर्यंत वजन नेणारें जहाज , गलबत ; मालाचें तारुं ; सबब त्यांजकडे दोन महागिर्‍या भरुन गवत व एक महागिरीभर लांकडे देविलीं असे , - समारो ३ . १६ .
   मोठें तारुं ; शिबाड ; बतेला .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP